कसं प्रेम
कसं प्रेम
छोट्या गावात राहणारा एक मुलगा. बाहेरच्या जगाशी संबंध त्याचा जास्त काही नव्हता कोण कोणासोबत कसे वागतो हे काही एवढे माहिती नव्हते. शिक्षण पूर्ण करून झाल्यावर तो कामाच्या शोधात शहराच्या ठिकाणी आला. गर्दीच्या ठिकाणी राहून राहून तो पण थोडा चांगला राहायला शिकला. गावाकडचा गांवडळ पणा सोडून तो शहरा सारख राहू लागला. काम काय लवकर त्याला भेटत नव्हते. खुप शोधून शोधून शेवटी एक काम त्याला भेटले. काम एकदम मन लावून आणि नियमित पणाने करत होता. खुप खुशही होता कारण महिन्याच्या पगार झाला कि घरी पैसे पाठवत होता. एकदम सर्व काही सुरळीत चालू होत. पण त्याच्या मोबाईल मध्ये एक अनोळखी नंबर सेव्ह होता, खूप दिवसांपासून तो नंबर होता पण कधी त्या नंबर फोन केला नव्हता आणि तिकडून हि आला नव्हता.
एके दिवशी असेच सुट्टीच्या दिवशी चक्क त्याने फोन करायचे ठरविले. खुप विचार करत होता कोण असेल? कोण नाही ? तरी पण वरती श्वास घेवून थोडी हिम्मत करत होता आणि थोडा घाबरत हि होता अखेर नंबर त्याने डायल केला जशी तिकड फोन ची रिंग वाजत होती तशी इकड त्याच्या काळजाची धड धड वाढत होती. फोन उचलला आणि आवाज आला " हॅलो कोन? " खुप गोड आणि मधूर आवाज होता पण त्याने हा आवाज ऐकताच फोन ठेवून दिला. खुप घाबरला होता काय होईल म्हणून कारण गावाकडं असताना त्याची एखाद्या मुलींला पाहून मान वरती होत नसे, अणं बोलण तर खुपच दुर. त्यामुळे तो खुप घाबरून गेला होता पण परत वापस त्या नंबर वरून फोन येत होता हा तर मग खुपच घाबरून गेला. काय करावे काय नाही त्याला समजत नव्हतं, स्वतःला थोड सांभाळून त्यान घेतल, पण डोक्यात एकच विचार सुरू होता कोण असेल ती..? कुठे राहत असेल..? तीच नाव काय असेल..? हे सारे प्रश्न डोक्यात खो खो खेळत होते.
एक महिन्याच्या कालावधी लगभग होत होता नेहमी हेच प्रश्न डोक्यात कोण असेल ती..? कुठे राहत असेल ती..? तीच नाव काय असेल..? हे प्रश्न त्याला खुप त्रास करत होती म्हणून त्याने परत फोन करायचे ठरवलं आणि स्वतःला सांगत होता की काहिही होऊ दे पण आता बोलायच. फक्त आपल्या कडून चुक होऊ देयाची नाही बोलण्यामधे आणि सोबतच एक चुक करत होता फोन करण्याची पण फोन केला आणि समोरून तोच गोड मधूर आवाज "हॅलो कोन..? " पण आवाजामध्ये एकप्रकारचा आदर होता. जास्त चिडचिड पणा आणि राग नव्हता त्यामुळे त्याची भिती थोडी कमी झाली. एकदम मोकळ्या मनाने बोलत होता तिकडून पण चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत होता असे बोलू लागले की एकमेकांना खुप जवळून ओळखतात. एकमेकांन विषयी माहिती झाली घट्ट मैत्री व्हावी म्हणून एकमेकांचे नंबर नावानं फोन मध्ये सेव्ह केले. कधी एस एम एस तर कधी फोन करून त्यांच बोलण सुरू होत. खुप म्हणजे खूपच घट्ट मैत्री झाली होती. ती दोघेजण एकमेकांना खुप चांगल्याप्रकारे समजून घेत होती .हळूहळू पुढे मग व्हाटस अप वर व्हिडीओ काँल मधून बोलण सुरू झाले. त्या मुलाला तिची खुपच सवय झाली होती आणि ती त्याला खुप आवडत पण होती. हे सगळं सांगायचे कसे हा विचार करत होता हा विचार सुरू असतानाच तिचा फोन आला आणि ती म्हणे '" बोलायचं नाही काय आज "'
तो म्हणाला हा बोलायचे आहे पण आज मनातलं तु रागावणार नाहिस ना..?
ती म्हणाली नाही रागावत बोल तिच्या बोलण्यात प्रेम दिसून येत होते...
तो तीला म्हणतो '" मला खूप आवडते तु, माझ्याशी लग्न करशील...? हे सगळे ऐकून ती एकदम शांत झाली पण ह्याला भिती होती कि ती सोडून तर नाही जाणार ना..? आता पुढे काय होणार हे कोणालाच माहिती नव्हते.
ती थोडी लाजली हसली आणि म्हणाली हा करेल लग्न तुझ्यासोबत
पण तो म्हणाला तू मला पाहिला नाही मी तुला नाही मग तु हा लग्न करेल कस बोलत आहेस
तीच उत्तर खुप मनाला लागणार होत
""ती म्हणाली मला या अगोदर पण खुप सार्या मुलांनी विचारलं की माझे तुझ्यावर प्रेम आहे पण तू एकटाच आहेस कि जे तु सर्वांपेक्षा वेगळे बोललास मनलास माझ्याशी लग्न करशील का म्हणून मी हो बोलले ""
हे ऐकून तो खूप खूश झाला त्याचा आंनद गगनात मावेनासा झाला .
मग काय पुढे त्यांच बोलण दिवस रात्र सुरू झाल हा कामावर असताना पण तीला बोलत होता ती पण त्याला केव्हाही बोलत होती. त्यांनी खूप सारे स्वप्न पाहिले होती की आपण आपला असा संसार करू तसा संसार करू,दोघेही खूप खुश होती .
दोघांनी मिळून एकत्र विचार केला फोन वरूनच की आपण आता एकमेकांना एकदा भेटलं पाहिजे त्यामुळे त्यांनी एकदिवस निश्चित केला म्हणजे तीला पण वेळ असेल कारण ती पण आपल नर्सिंगच शिक्षण पूर्ण करत होती आणि ती वस्तीग्रहात राहत होती त्यामुळे तिथली नियमावली थोडी वेगळी होती 5 वाजेनंतर बाहेर जाता येणार नाही त्यामुळे वेळ आणि जागा निश्चित केली, दोघांचे अंतर कमीत कमी 400 किमी. होते त्यामुळे ह्याने थोडी जास्त दिवसाची रजा टाकली होती, आणि निघाला एक प्रेमी आपल्या प्रेयसीला भेटायला तो खूप उत्साही होती आणि ती पण खुप उत्साही होती पण ह्याला भेटायला येण्याच्या आधी ती आपल्या घरी जाऊन आली होती,काहितरी वेगळचं घडल होत आणी समोर वेगळच घडणार होत. तो खूप खूश आणि आनंदी होता तीला भेटण्यासाठी पण हा आनंद जास्त काळ राहणार नव्हता हे त्याला माहित नव्हतं. खुप विचार करत करत आला होता ती भेटल्यावर तीला काय म्हणायचे काय नाही हे सगळं डोक्यात सुरु होत . तो बस मध्येच होता आणि तीचे खुप फोन वर फोन येत होते, ""कुठे आला? किती वेळ लागत आहे ? तिच्या मनातल नेहमी ओळखणारा अस काय होत ती एवढ्या फोन करण्यामागे तो ओळखू शकला नाही कारण तो दुसर्या विचारानी व्यस्त होता. शेवटी तो तिच्या शहरात येवून पोहचला आणि बूक केलेल्या हाँटेल च्या रुमवर जाऊन एकदम फ्रेश होऊन, डिओ वैगेर मारून तिला भेटण्यासाठी आला तिच्या सांगितलेल्या पत्यावर पोहचला आणि तीला फोन करून बोलावून घेतलं पण ती जेव्हा त्याच्याकडे चालत येत असताना, तीच्या चालन्यामध्ये काही तरी कमी दिसत होती पण त्यान त्या गोष्टीला दुर्लक्ष केले. जेव्हा ती जवळ आली आणि विचारत होती कसा आहेस कसा नाही?
त्यांच बोलण सुरू झाल काही वेळ बोलल्यानंतर ती म्हणाली तुला एक गोष्ट सांगायची आहे "तु मला माफ कर मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही " हे ऐकताच तो निशब्द झाला पुर्ण तुडून त्याला जिवंत राहण्याची इच्छा नव्हती पण तीचे दुसरे वाक्य ऐकून तो थोडेफार शुद्धीवर आला
ती म्हणाली की '"आपण जन्मास येण्याच्या अगोदर आपल्या आई बाबांनी आपल्यासाठी खुप सारी स्वप्न पाहिलेली असतात आणि या दोन तीन दिवसाच्या प्रेमासाठी आपण त्यांची स्वप्न तोडतो हे मला मान्य नाही "' हे सगळं ती रडुन सांगत होती हे बोलल्यानंतर ती म्हणाली स्वतःला काही इजा करून घेवू नको, माझ पण तुझ्यावर खूप प्रेम आहे पण आई बाबांना मी धोका देऊ शकत नाही हे बोलून ती आलेल्या वाटेने परत निघून गेली
तो फक्त तिच्याकडे पाहतंच राहिला पाहतंच राहिला....!
