Ranjana Khedkar

Children Stories Others

3  

Ranjana Khedkar

Children Stories Others

#कर्तव्य#

#कर्तव्य#

2 mins
297


  सकाळीच सहदेव काका आमच्याकडे पैसे उसनं मागायला आले. आजीने त्याला पैसे दिले आणि तो निघून गेला लवकर परत करतो अस बोलतं.तेवढ्यात आजी म्हणाली,कसं होईल याचं माधव बघ अन हा... माधव आणि सहदेव आमच्याच वस्तीत रहायचे बऱ्याच वर्षांपासून आज माधव आपल्यात नाही पण त्याची खूप आठवण येत आहे. दोघे पण माग पुढचं आले इथं राहायला आधी सहदेव आला अन मग माधव. 

  मी विचारल का ग,मला सांग न त्यांच्या बद्दल. ती म्हणाली अगं माधव एकवीस वर्षाचा असतांना या शहरात आला खिशात तीस रुपये आणि एक जोड कपड्याचा घेवून अन किती सारं नावं न पैसा खूप कमवलं त्यानं.मी म्हटलं कसं ग. 

ती खूप आनंद डोळ्यात भरून गर्वानं सांगायला लागली. अगं आला तेव्हा मेडिकल मध्ये पेशन्ट अन त्यांच्या नातेवाईकाचे काम करायचा औषध इथं जा तिथं जा, मग त्याबदल्यात पेशन्ट ला मिळणार जेवण तो जेवी आणि मेडिकल जवळच मोठे पाईप होते तिथं झोपी. 

  BA पास माधव कामा साठी फिरला. एका मोठ्या फोटो स्टुडियो वाल्याने त्याला घरचं बाग काम दिलं. त्याचा मेहनती व प्रामाणिकपणा बघून चांगल्या कंपनीत मालकांनी नौकरी लावून दिली. माधवने रूम किरायाने घेऊन आपलं काम प्रामाणिक करत होता, आता तो कंपनीत युनियन लीडर बनला अन काही कर्मचाऱ्याच्या हितासाठी (परत कामावर)घेण्यासाठी त्यानं आवाज उठवला आणि त्याच्या सोबत तेरा लोकांवर केस सुरु झाली. निकाल लागत पर्यंत काम नाही पगार नाही. त्याच लग्न होऊन चार मुलं होती. तरी हिंमत न हारता प्रॉपर्टी शोधायची व विकायची अस करत त्याने तिथं ही यश मिळवलं. जमिनी घेवून प्लॉट पाडून विके तो. 

   अन हा सहदेव इथं आला प्लॉट घेतला घर बांधलं चेहऱ्यावर एक विचित्र घमंड होता त्याच्या पहिल्यांदा भेटला तेव्हा. मग त्याच्या बायको न सांगितलं बोलता बोलता आधी जिथं राहायचे तिथल्या सावकारीनचं कूणी वारस नव्हतं. तर वर्धा रोडवर तिची खूप शेती होती 1975 मध्ये तीन वस्तीतल्या साऱ्यांना कुणाला पाच एकर कुणाला दहा अशी दान केली. याला एकट्याला दहा एकर मिळाली. अन हे घर बांधलं प्लॉट घेवून. त्याला पण चार पोरं पण कुठं जमीन नाही घेतली का काई नाही. सारा पैसा तीर्थ क्षेत्र फिरला बायको सोबत अन मोठेपणात पैसा संपला. लेकरांले जागेवर बसवलं नाही का पैसा वाचवला नाही. दोघचं नवरा बायको फिरले लेकर इकडं तिकडं ठेवून अन आता वणवण करत फिरते तो पण अन त्याचे पोरं पण. स्वतःचे अन पोराबाराचे खूप हाल झाले त्याच्या.   

    माधव सगळ्यांची मदत करे कधी कूणी रित्या हातानं गेलं नाही. कधी पैश्याची, मार्गदर्शनाची खूप करे तो साऱ्यांसाठी. म्हणून म्हणतो देव नाही म्हणत का पोरंबार रनोबनी लावून दर्शनाला या,प्रपंच उभा केला तर आपले कर्तव्य करा. मनात पण देवाला नमस्कार केला तरी पोहचतो.आपल्याला संधी मिळत असते त्याच सोनं करायचं की माती हे आपल्या हातात असते. माधवनं संधी च सोनं केलं आपल्या सोबत कित्त्येकाचं भलं केलं.आपली सर्व कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडली. 


Rate this content
Log in

More marathi story from Ranjana Khedkar