STORYMIRROR

Pankaj Kamble

Others

3  

Pankaj Kamble

Others

कोवीडयोद्धा

कोवीडयोद्धा

4 mins
30


     रमाकांत भान हरवील्या सारखा जंगलाचे दिशेने सुसाट धावत सुटला होता.घरून निघतांना जनावरं बांधायचा दोरखंड त्यांने कमरेभवती लपेटून आणला होता. गाव मागे पडले तरी तो सारखा धावत होता. धावता धावता तो मागे वळून पाहत होता व कुणी आपल्या मागे तर पाठलाग करत येत नाहीत ना याची खातरजमा करून घेत होता. त्याला दम लागून धाप लागली तरी तो थांबत नव्हता.आयुष्यभर जगण्याच्या धडपडीत तो भौतीक आणि दिखावू सुखाच्या मागे धावत होता.आणि आज मरण जवळ करण्यासाठी सुद्धा आपल्याला धावावेच लागत आहे याचेच त्याला हसू आले होते. स्वताच्या पंगूपणावर तो धावत धावतच विकृतपणे हसत होता.हसत हसत धावत होता की धावत धावत हसत होता हे त्याला काहीच कळत नव्हते तरी त्याला त्याची फिकीर नव्हती आज त्याला कुठल्याच गोष्टीचा अर्थ जाणून घ्यायचा नव्हता.फक्त आपण मेल्यानंतर आपले प्रेत कुणाच्याही हाती लागू नये हे एकच उदीष्ट डोळ्यासमोर ठेवून तो घरून निघून आला होता.कोरानामुळे मरण पावलेल्या आपल्या आईवडीलांचे प्रेताची अवहेलना त्याने जवळून पाहिली होती.त्याला ते असह्य झाले होते. म्हणूनच त्यांने लोकांपासून दूर जावून मरण्याचा निर्णय घेतला होता.

      धावत धावत तो जंगल्याच्या पार आतपर्यंत शिरला होता.आज त्याला कशाचीही भीती वाटत नव्हती. जंगलात मसोबाच्या डोंगरापासच्या डोहाजवळ वाघ येतात हे तो ऐकून होता. परंतू आज त्याला वाघाचे अथवा जंगलातील विषारी सापाचे पण काहीच भय वाटत नव्हते. आपण जगण्याची आशा सोडल्यावर आपण ऐव्हढे निडर व धाडसी कसे झालो याचे त्याला नवल वाटत होते. मसोबाचे एकदम घनदाट जंगल लागल्यावर तो थांबला. इकडे जनावरांचे भीतीने माणसे फिरकत नाहीत हे त्याला माहीत होते.तो थांबला तेव्हा त्याच्या कानात किरकिरयांचा कर्णकर्कश किर्र असा आवाज पडत होता तर कधी एखादया पक्ष्यांचे किलकिलाट ऐकू येत होता.

      त्याने आपल्या कंबरेचा दोर सोडला आणि फास बांधण्यासाठी तो झाड निवडू लागला. झाड निवडतांना एका झाडाच्या बुंध्याजवळ त्याला कुठल्यातरी प्राण्याचा सापळा दिसला आणि त्याला एक भन्नाट कल्पना सुचली.आपण आयुष्यभर कुणाच्या उपयोगी पडलो नाही निदान मेल्यानंतर तरी कुणाच्या उपयोगी पडावे हा विचार त्याचे डोक्यात आला आणि त्याला एक अकल्पीत समाधान मिळाल्याचा भास झाला. तो स्वताचे शरीर जंगलातील प्राण्यांची भूक शमविण्यासाठी सोपविणार होता. आपला सापळा पडल्यानंतर आपल्या कपड्या वरून आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून त्याने त्याचे अंगावरील पुर्ण कपडे उतरवीले आणि तो  संपूर्ण निसर्ग अवस्थे मध्ये आला. त्याने कपडे आणि दोर एका मोठ्या दगडाखाली लपवून ठेवले. स्वताचे संपूर्ण नग्न गोरयागोमट्या व रेखीव देहाकडे पाहून त्याला स्वताचेच शरीराचा हेवा वाटू लागला. एखादी सुंदर रानपरी ह्यावेळी भेटली असती तर...........,त्याला आपले न संपनारया वासनेची कदर आली. डोक्यात मरणाचा विचार घोळत असतांनाही वासना त्याचा पिच्छ्या सोडायला तयार नव्हत्या. वासना माणसाला इतक्या का चिकटून असतात.? त्याला त्याचे सुंदर शरीराची व भावना चेतवणारया अवयवाची चिड आली.स्वताचे अवयव कापून दूर भिरकावून दयावेत असे त्याला वाटले.आता त्याला कुठल्याच मोहाजालात अथवा भोतीक सुखात अडकायचे नव्हते.

     तो कितीतरी वेळ मसोबाचे डोहाजवळ खडका

वर बसून पाणी पिण्यासाठी येणारया प्राण्याची वाट पाहत थांबला परंतू अंधार पडत आला तरी एकही प्राणी डोहाजवळ फिरकला नव्हता.धावून धावून थकल्यामुळे तो त्या खडकावरच झोपी गेला.मनात कुठलीच भीती व अपेक्षा शिल्लक नसल्याने त्याला गाढ झोप लागली होती.सकाळी पाखरांचे किलबिलाटाने त्याला जाग आली.सकाळचे सुर्यकिरणे झाडीतून झिरपत डोहापर्यंत पोहचत होती.ते अप्रतिम सोंदर्य पाहतच राहावे असे त्याला वाटले.राञभर आपल्याला कोणत्याच प्राण्याने स्पर्श कसा केला नाही ह्याचेच त्याला आश्चर्य वाटत होते.राञ भर आपल्याला कुठलेच स्वप्न कसे पडले नाही? हाच त्याला एक मोठा प्रश्न पडला होता.हळुहळु मरणाची वेळ जशी टळत गेली तसे त्याला अनेक प्रश्न छळू लागले.

     जगावे की मरावे? हा प्रश्न त्याने स्वताला विचारून पाहीला.तो संभ्रमात पडला होता.त्याला निश्चित उत्तर सापडत नव्हते.त्याने मांडी घालून शांतपणे डोळे मिटले आणि तो स्वताचे अंतरंगात खोलवर शिरून विचार करू लागला. कितीतरी वेळ तो तसाच ध्यानस्थ बसून राहीला. त्याने स्वताचा भूतकाळ आठवून पाहीला. भूतकाळात त्याचेवर झालेला अन्याय, त्याने केलेल्या चुका आणि आयुष्यात आलेल्या सर्व सुखदुखांची त्याने उजळनी करून पाहीली पण हाती काहीच लागत नव्हते. बराच वेळ ध्यानस्थ बसून राहील्यावर त्याचे कमजोर भोळचट विचार हळुहळु गळून पडू लागले आणि तो निश्चित निर्णयापर्यंत पोहचला. त्याने मोठ्या विश्वासाने व थंबीरपणे स्वतालाच ठाम उत्तर दिले. आपण कधीचेच मेलो आहोत. ज्यावेळी आपले मनात आत्महत्येचा विचार आला त्यावेळीच आपण मेलो आहोत.आता स्वतासाठी जगायचे नाही.आता जगायचे ते फक्त दुसरयासाठी. दुखीत पिडीतांचे सेवेसाठी. त्याला सिद्धार्थ गौतमासारखा नवीन जीवनमार्ग गवसला होता. त्याला हिम्मतीने ड्युट्या करत कोरोनाशी दोन हात करणारे ,दिवसराञ झटणारे कोवीड योद्धा पोलीस आणि डाॕक्टर आठवू लागले.त्याला आता स्वताचे जीवाची पर्वा उरली नव्हती.त्याने स्वयंसेवक कोवीड योद्धा म्हणून कोरोना विरूध्दचे लढाईत भाग घेण्याचा निर्णय घेतला.

     सुर्य बराच वर आला होता त्यामुळे जंगलात सर्वदूर प्रकाश पसरला होता.नवा जीवनमार्ग सापडल्याने आपलेही मनात एक तेजोमय दिप तेवत असल्याचा भास रमाकांतला झाला.तो डोहापाशी गेला आणि त्याने ओंजळभरून पाणी आपले चेहरयावरून मारले आणि दोन ओंजळ पाणी प्राशन केले.त्याला तरतरी आली होती.मनावरचे मळभ गळून पडले होते.त्याने पाण्यात आपले नग्न प्रतिबींब पाहीले तसे त्याला स्वताचे नग्नतेची लाज वाटू लागली.त्याने कपडे लपविलेला दगड शोधून काढला. आणि पाहतो तर काय राञभरात वाळवीने खावून त्याचे पुर्ण कपडयांच्या चिंध्या करून टाकल्या होत्या.अंगावरील जुन्या कपड्यांचे ओझे नष्ट केल्याबद्दल त्याने वाळवीचे आभार मानले.

     पळसाच्या फांद्या तोडून त्याने कंबरेभोवती गुंडाळल्या आणि तो खूल्या अंतकरणाने परतीची वाट चालू लागला. कोवीड योद्धा म्हणून दुसरयाचे सेवेत तो स्वताला गुंतवणार होता.त्यामुळे त्याचे अंतकरणात एक सुखाचे किरणांचा उगम झाल्यासारखा त्याला भास होत होता.त्याचा पुर्ण थकवा गळून पडला होता आणि त्याची पावले झपाझप पडत होती. मरण जवळ करू पाहणारा नकारार्थी रमाकांत कधीचाच संपला होता.

     रमाकांत मध्ये एका नवीन कोवीड योध्दयाचा जन्म झाला होता.


Rate this content
Log in

More marathi story from Pankaj Kamble