कोरोना संकट...
कोरोना संकट...
1 min
45
तो दिवस, ती भिती, ते क्षण...
२२ मार्च 2020 रविवार, सकाळी ७ ते रात्री ९
ते कोरोनाचे संकट... (जनता कर्फ्यू)
काय चालुये, कशामुळे काय होणार पुढे
त्या दिवसाची निरव शांतता...
रविवार असून टाचणी पडेल एवढी शांतता
ना गाड्यांचे आवाज, ना बायकांचे कुजबुजणे,
ना मित्र-मैत्रिणींचा घोळका, ना कुकरच्या शिट्ट्यांचे आवाज...
ती बाहेरच्या वातावरणाची भीती
फक्त झाडांची हालचाल, पक्ष्यांची कुजबुज आणि कुत्र्यांची भुंकणे... कारण यांनाही प्रश्न पडलेला या परिस्थितीचा...
त्या दिवस प्रत्येकाची धावणारी पावले थांबलेली
त्याचदिवशी ५ वाजून ५ मिनीटे याचवेळी ती पाऊले कणखर, निर्धास्त होऊन
भारतवासी एक आहोत ही भावना देते...