Dipali Vaze

Others

1  

Dipali Vaze

Others

कोरोना – कळयुगाचा काळ

कोरोना – कळयुगाचा काळ

3 mins
556


कोरोनात कवारंटाइन रहावे लागते कारण चीन्यांने दिलेला भयंकर आजार, आज जगाभरात पसरलाय, लोक मरतायेत असंख्यतेत नाईलाजाने तेव्हा सर्व आप आपल्या परीने प्रयत्न तर करतायेत पण त्याला रोकणे म्हणजे गरजा शिवाय घरा बाहेर न पडणे, स्वतःला घरात कोंडून घेणे, बाहेरून आलात जरी तर शीवा शीवी न करता आधी हातपाय स्वच्छ धुवून घेणे ह्या कडक शिस्तीत स्वतःला बसवणे आणि ज्या त्या परिस्थितीत मनाला जपत राहणे ह्याला पर्याय नाही. बाकी कोरोना मूळे झाले जे नुकसान त्याची भरपाई करणे सहज सोपे नाही.

    

बघा ना हा आल्यापासून किती माजलाय, वाटतं नुसता नावाचा वायरस नव्हे तर कोरोना कळयुगाचा काळ बनून आलाय. आपल्या देशात, विदेशी आक्रमण तर बरेच झाले परंतु ह्या वेळी मात्र संक्रमण करून जाणार. आजार पसरवायला कोरोना आलाय तो चाइना, इटली, अमेरिकेतून येणारे फोरेइन रिटर्न स्टेटस मधे शंकेचं बीज घेऊन व भरल्या वाहतूकीत उधम मचवायला. तेव्हा चेहर्‍यावर मास्क, हातात ग्लोव्स घालून लोक आता फिझीकल डिस्टन्स ठेवतायेत.


    जगात सर्वत्र नकारात्मकता, दूषण काय कमी वाढलय वर निरागस प्राण्यांची उट सूट हिंसा, रासायनिक प्रदूषण, निसर्गाला दूषित करणे, वन जाळणे, नव नवे प्रयोग आणि उपकरण बनवणे. मात्र नी मात्र प्रगतीच्या जोमात आपल्या सोयी सुविधा जपत राहणे नी प्रकृतीच्या सानिध्यात राहून त्याला त्रस्त करणे. अहो, डार्विन च्या उत्क्रांती वादाला अनुसरणारे वर्ग तर चक्क दुर्बळां वर सबळांचे प्रहार ह्या वर उत्कृष्ट मत मांडतात आणि मांसाहार वर त्यांचा जन्म सिद्ध हक्क बजावतात ही. तेव्हा मूक पशुंची दया वगैरे त्यांना कुठे? वेगवेगळे उप व्याप करायला अबोधांचे गळे मोडले जातात ह्याची खंत वाटते कुठे?

    

वर्गखंडात सुद्धा मनुष्य एक जनावर आहे हे शिकवले जाते पण बौद्धिक पातळी वर उच्च असा मनुष्याचे स्थान तर देवाभावाचे आहे. स्वतःचे पोट भरायला त्याला कुणाचं अधम करणे आवश्यक नाही. आदिमानवा पासून मानव झाला तेव्हा त्या वर अनेक संस्कार झाले, तेव्हा अनेक ऋषींने केले जे प्रयत्न, वेद संस्कृती चे बोध आता आठवते कुठे? मानवात दया, करुणा, धैर्य, वात्सल्य आणि बरेच काही गुण अवतरले तेव्हा जीवात शिव आहे ही शिकवण विसरलात? तुमच्या सारख्या वेदना त्याला ही होतात ना तो ही ओरडतो, कींचाळतो, जगण्या साठी लढत रहातो. जीवात्माचे असे हाल केल्यावर ते ही नकारात्मकता पसरवणार चं. या वेळी कोरोना च्या माध्यमाने अद्रुष्य रुपात येउन तो केव्हा संक्रमित करेल ते अनाकलनीय आहे.

    

प्राण्यांवर केली जाणारी घातक प्रवृत्ती आणि त्याला दोशी थोड्या फार प्रमाणात आपण सर्व च आहोत. मी तर म्हणेन जनावरां पेक्षा जास्त क्रूर, त्यांचा व्यापार मांडत आपण नूस्ता आपला फायदा करताना नी त्याची कतलेआम बघताना अगदी खुशाल दिसतो. मानवाचे असे नराधमी पणे वागणे पातकी नाही? पाश्र्तात्या कडे वळणारे आणि इश शक्ती वर विश्वास न ठेवणारे, वैभवात रमणारे स्वतःचे चोचले पूरवायला निर्बळ, निरापराधींचा जीव घेण्यात त्यांचे काही बिघडत नाही असे वाटते वर तसे कायदे ही नाही व कुठे ही रोक नाही ह्याची च लाज वाटते.

    

कर्माच्या सिद्धांतानुसार केलेले कर्म परिणाम तर दाखवणारच. तेव्हा जपून पण समजून कर्म करायला हवेत नाही का? प्रकृतीच्या विरुद्ध जाण्यात फायदा नव्हे हानी च हानी होते. आत्तापर्यंतचे अनेक अपराध जोडले जरी तरी ते भरायला आपले पुण्य काही शिल्लक उरत नाहीयेत. आज कोरोना करोडो लोकांचा जीव घेतोय, त्याला थांबवणे म्हणजे कडक शिस्तीत स्वतःला बसवणे. त्याला रोकला जरी काही क्षणा साठी तर दुसरं काही मागे लागणार नाही त्याची शाश्वती आपण तरी कुठे देऊ शकतो?


मला वाटते आजाराला डांबण्यापेक्षा त्याचे उद्गम जाणून घ्या. आत्तापर्यंत झाल्या गेल्या गोष्टी कडे दुर्लक्ष न करता पुन्हा पुन्हा ते च ते घडण्याची संधी येऊ देऊ नका. कारण दरवेळी निसर्गाशी लढायला आपण तरी उरले पाहिजे. कारण त्या शक्तीला सामोरी जाण्याइतके सक्षम आपण नाही होत.


Rate this content
Log in