Babu Disouza

Others

3.5  

Babu Disouza

Others

कोरोना काळ

कोरोना काळ

1 min
15


कोरोना मुळे सर्वांचे जीवन ढवळून निघाले. माझा मोठा मुलगा डॉक्टर अभिनंदन आणि मी एक महिना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये त्यामुळे. प्रथम व्हेंटिलेटर नंतर ऑक्सिजन आणि शेवटी आय सी यु मध्ये होतो. ना बोलणे, ना संवेदना!

घरी आल्यावर कळले घरातील सर्व जण होम आयसोलेशन मध्ये होते. संपूर्ण सोसायटी ला कार्पोरेशन ने फवारणी केली होती. यायला जायला लोक घाबरत होते. टाळ्या, थाळ्या सारख्या कुचकामी सल्ल्याने काही झाले नाही. सारी दैना झाली देशातील गरीबांची.

मी अस्वस्थ होतो. कोरोना इफेक्ट जाणवला. प्रथम अँजिओप्लास्टी नंतर बायोप्सी झाली. बिछान्यावर पडून राहताना येणारे विचार मनात पिंगा घालत होते.

कविता लिहिल्या पण, छपाई, प्रकाशन अवघड होते.

"अस्वस्थ वर्तमानातील मी " ललित पाटलांनी छापले.

ऑनलाईन प्रकाशन त्यांनी केले. पण, समाधान नव्हते. ना बातमी, ना गाजावाजा.

नवयुगचे राज आहेरराव यांनी सहकाऱ्यांसमवेत येऊन घरीच प्रकाशन केले. माझ्या मिसेसने अनुभवांवरून कथा बेतल्या. "एक खंत".

स्वानंद महिला संस्था आणि ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स तर्फे माझ्या पुस्तकास २०२२चा पुरस्कार मिळाला" चंदन दर्डा साहित्य दीप पुरस्कार ".

हाच मोठा सुखद अनुभव म्हणेन मी. 


Rate this content
Log in

More marathi story from Babu Disouza