कलर
कलर


तो खूप उशीराने जागा झाला . काल रात्रभर जागरण झाल्याचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता . अगदी गोरापान आणि स्मार्ट दिसणारा तो आज एखाद्या खंगलेल्या जनावरासारखा दिसत होता .
तो उठला आणि अंथरूणाची घडी घातली .आणि लवकर तयार होण्यासाठी तो किचनकडे निघाला . तेवढ्यात शेजारच्या खोलीतून त्याला एका स्त्रीच्या रडण्याचा आवाज अस्पष्ट ऐकू येऊ लागला . आवाज टीव्हीचा असेल असे वाटून त्याने त्या आवाजाकडे दुर्लक्ष केले . परंतु जसा जसा ती एकेक पाउल पुढे सरकू लागला ,तसतसा आवाज स्पष्ट आणि मोठा येऊ लागला .
त्याने शेजारच्या खोलीत जाण्याचे ठरवले . तो हळूच शेजारच्या खोलीत गेला . खोलीचे दार नुसते ढकललेले होते .तो दारापाशी जाऊन उभा राहिला आणि त्याने दाराला ढकलले ..........
आतील दृश्य बघितल्यानंतर त्याच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला .आतील खोलीच्या भिंती रक्ताने पूर्णपणे माखलेल्या होत्या . आणि " ती" मात्र हातात लालभडक चाकू घेऊन त्याच्याकडे पाहत रडत होती ...................
" अरे , काय झालय , कसला विचार करतोयस तू ? तुला आज ऑफिसला जायचं नाही का ? काहीतरी खाऊन घे . मग निघ ."
तिच्या बोलण्याने तो भानावर आला . आज आपण जे पहिले ते स्वप्न होते कि सत्य ? असू दे . ANYWAY. होत अस कधी कधी .
पण त्याला ऑफिसला जाताना आठवले कि तिच्या हातात आपल्याशी बोलत असताना रक्ताने माखलेल्या चाकूसारखे काहीतरी ...........
म्हणजे ...........