खेळ दैवाचा
खेळ दैवाचा


शामला आणि मी शाळेपासूनच्या खास मैत्रीण. आम्ही एकमेकींना सोडून कधीच राहीलो नाही. मैत्रीणी तर आम्ही जोडगोळी ठरलो. आठवी ते अकरावी आम्ही एकाच वर्गात होतो शेवटपर्यंत. अकरावीची परीक्षा संपली आणि महीन्यातच माझे लग्न ठरले आणि झाले पण. चांगल स्थळ चालून आलं म्हणून आई बाबांनी माझ लग्न उरकून टाकल.
सासर मुंबईत होत. घट्ट असलेली मैत्री उसवली आमची. आज अचानक फोन आला नंबर माहितीतला नव्हता पण घेतला हॅलो! म्हटले तसा पलीकडून आलेला आवाज एकून कानावर विश्वासच बसला नाही. आवाज शामलाचा होता. ती मुंबईत आली होती आणि मला भेटायला येणार होती. आजचा दिवस कधी संपेल अस झाल होत मला.
तो दिवस उजाडला आणि मी शामलाची वाट पाहू लागले. मनात खूप प्रश्नांची गर्दी झाली. कशी असेल शामला. माझ्यासारखीच संसारात आनंदी असेल का ?
एक ना अनेक प्रश्न मनात घोंघावत होते. माझी प्रतीक्षा संपली आणि शामला समोर हजर बघून मन आनंदाने बावरून गेलं. दिवसभरातील सगळी कामं उरकली आणि रात्री आम्ही गप्पा मारायला बसलो. दोघींनी एकमेकींच्या बद्दल जाणून घ्यायला सुरूवात केली. मी लग्नापासून आत्तापर्यंत माझा जीवनपट उलगडला. सगळ एकत असताना शामला शांत होती. कुठेतरी हरवलेली वाटली.
शामलानी तिच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. मला शाळा संपल्यावर वडीलांनी कॉलेजला जावून नाही दिले. शिकायची खूप इच्छा होती मग मी टाईपींगचा क्लास लावला. तिथे रोहिणीची मैत्री झाली. एकदा मला तिने विचारले कबड्डी खेळायला आमच्या संघात येशील का विचारल. मीही तयार झाले. तुला माहितीच आहे सर्वच खेळात माझा भाग असायचा.
संघात खेळायला गेले. काही महिन्यांनी बाहेरगावी स्पर्धा खेळायला गेले. आम्ही फायनल मारली बक्षीस म्हणून ब्रीफकेस मिळाली, बाबांना आईला खूप कौतुक वाटल. मग असच रोज टायपिंग क्लास , रोजचा मैदानावर सराव यात मी रमले. संघातील वंदनाने मला कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला सांगितला. मीही प्रवेश घेतला. पण घरात बाबांना सांगितले नव्हते. आईला माहिती होते. पण बाहेरगावी खेळायला जाते बक्षीस मिळवते म्हणून बाबा खूश असायचे. एकदा त्यांना कॉलेजला जाते सांगितले.
दिवसामागून दिवस गेले एम ए चे पहिल वर्ष संपले आणि दुसऱ्या वर्षाला असताना बॅंकेत नोकरी लागली.
एकदा संघातील सगळ्यांनी पोहायला जायच ठरवल आणि आम्ही रोज पोहायला जावू लागलो. मला येत नव्हते पोहायला. एक मुलगा मला शिकवू लागला पोहायला. मे महिना संपला आणि तो मुलगा बंद झाला. एकदा बॅंकेत आला आणि तो ट्रेनिंगला परत चाललो म्हणून सांगितले आणि पत्ता दिला.
आम्ही सगळ्या पोहायला जायचं बंद केल. पुण्या सुट्टीला आला की कुशल भेटून जायचा. नंतर दोन महिने झाले तो आलाच नाही मग मी पत्र पाठवले त्याचही उत्तर आलं. हळूहळू पत्रातून आमच प्रेम व्यक्त होऊ लागल कळलच नाही.
शामला तू आणि प्रेमात पडशील कोणाच्या हे मी स्वप्नात पण नाही विचार करू शकत. अगं तू मुल मागे लागली तर तू त्यांना बदडून काढलेस. तुला मुलांची मैत्रीही चालत नव्हती. असो पुढे काय ? रात्र जसजशी सरत होती तसतशी आमची बोलणी लांबत होती. शामलाचा मूढ एकदम बदलला आणि ती गंभीर झाली.
अगं एकदम गंभीर का झालीस मी विचारले तेंव्हा तीने तिच्या जीवनातल्या घडामोडी सांगायला सुरूवात केली. आणि त्यांच्यातला संवाद सांगायला सुरूवात केली.
माझ्या घरातल्या वातावरणाला मीही कंटाळले होते. कुशलला सगळ सांगत असे मी. एकदा तोच मला म्हटला आपण लग्न करूया. पण तो खेडेगावात रहाणारा होता. आमच्या दोघांची जात वेगळी होती. मी त्याला सांगितले तु आई वडीलांना विचार त्यांना चालणार असेल तर मी तयार आहे म्हणून सांगितले. शिवाय तुझ्या बहिणीचे लग्न होऊ दे आधी. त्याला माझी अट नाही पटली. मला म्हटला किती दुसऱ्यांसाठी स्वत:ला बंधनात बांधून घेणार तू. सगळ्यांसाठी जगतेस स्वत:साठी कधी जगणार तू. पण मला मान्य नव्हतं. वडीलांनी मला परवानगी दिली होती पण मला त्याच्या आई वडीलांचा होकार हवा होता. मला माणसं हवी होती. माणस तोडायची नव्हती.
शामला तू कधीच बदलली नाहीस. तू आणि प्रेम हे समीकरण मलाच समजल नाही. दैवाचे खेळ असतात गं. पुढे ऐक माझी वाट बघून त्यानी लग्न केले पण मला आमंत्रण नाही दिले. मला त्याच्या मित्राकडून कळाले. त्याचे लग्न ठरलेले मला कळू नये हीही खबरदारी घेतली त्याने. मला हे कोडच उलगडल नाही.
मीही सोडून दिल सगळ. अचानक एके दिवशी मला भेटायला आला.मी अजून लग्न केले नाही म्हणून लग्न करण्यासाठी विनंती केली.
झाल मीही घरच्यांवर बोज नको म्हणून लग्नाचा निर्णय घेतला. लग्न पण झाले. एक मूल पण आहे. पण... पण काय शामला. सुधा मी काय पाप केल असाव गं पूर्वजन्मी. मला स्वत:ला जगायलाच नाही मिळाल गं. माझ लग्न झाल पण नवरा माणसिक रुग्ण. मोठा भाऊ त्याच्याशी बोलत नाही. कोणी मित्र परीवार नाही त्याला. सोडून द्याव तर सासू सासरे वयस्कर ,रडले माझ्याजवळ आमच्यासाठी रहा म्हटले. शेवटी त्यांच्यासाठी अडकून पडले.
मला काहीच समजल नाही फक्त आणि फक्त शामलाला घट्ट मिठीत घेवून रडले मी, तीही एक प्रेम कहाणी पण सफल नाही झाली तिची.