जीवन
जीवन

1 min

79
जन्म आणि मृत्यू यांमधील काळ म्हणजे आयुष्य का ? असा ही प्रश्न त्याला सतत पडत असतो. खरंच आयुष्य म्हणजे काय ? व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यू पर्यंतचा वाढत गेलेला कालावधी की कमी होत गेलेला एक- एक क्षण म्हणजे आयुष्य ? खरे तर आयुष्य म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनुभवाची शिदोरी. व्यक्ती मध्ये असणारे राग, लोभ, मद, मोह, मत्सर या गुणांची गोळा बेरीज म्हणजे आयुष्य हो!
आयुष्य आनंदात, सुखाने आणि समाधानाने जगावं असे प्रत्येक व्यक्तीला वाटतं असत. त्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील असतो. जगातील सर्व सुख, आनंद आपल्यालाच मिळावे. यासाठी तो अथक परिश्रम घेतो. हे सर्व सत्य असले तरी त्याला एक प्रश्न नेहमी सतवत असतो. तो म्हणजे, “ आयुष्य म्हणजे नेमके काय ? ”