Shraddha Kulkarni

Others

2.9  

Shraddha Kulkarni

Others

झोका

झोका

2 mins
650


काही काही गोष्टींचा वयानुरूप त्याग करावा लागतो.त्या कीतीही आवडत असल्या तरीही त्यापैकीच हा झोका .

   मला आठवतं मी ५ते६ वर्षाची असेन.त्यावेळी एकत्र कुटुंब पदधत होती.त्यामुळे कुणाचं ना कुणाचं एक लहान बाळ घरी असायचं. त्यामुळे हा पाळणा नेहमी एका खोलीत ठेवलेला असायचा. त्यामुळे त्या पाळण्यातील बाळ कधी एकदा उठतय आणि मला पाळण्यात बसायला मिळतंय अस होऊन जायचं.खूप आवडायचं त्यावेेळी.पण हे पाळण्यात बसणं थोडे दिवसच सुरू राहिलं.मला ७ वर्ष लागलं आणि पहिलीला शाळेत घातलं आणि शाळा सुरू झाली. तरीही तो पाळणा मला खुणावत राहायचा.मी त्यामध्ये चढायचा प्रयत्न केला तर मागून पाठीत दणका बसला.आता बसायचं नाही ह. पाळण्यात तुझ वय नाही त्यात बसायचं. पाळणा मोडून जाईल. इथ मला वयाची पहिली जाणीव झाली.

     त्यानंतर रानोमाळ बहीण भावंडे फिरताना मला साद घातली ती वड पारंब्यानी.या वड पारंब्या खेळताना इतक्या लांब जात की वाटायचं आपण हवेत तरंगत आहोत.त्यावेळी तो छंदच लागला.पारंब्या खेळण्यासाठी मुद्दाम फिरायला जायचं.वरचेवर पारंब्या खेळायला जाण घरच्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही.घरात थोडी कामात मदत करायची सोडून हे काय सारखं पारंब्या खेळत बसणं.

      त्यानंतर वय असेल ११-१२ आमच्या घरी बांबूचा माळा होता.ज्याच्या वरती शेणी(गोवऱ्या), गवत,लाकडे पावसाळ्यासाठी रचून ठेवली जायची.त्यासाठी शिडी लावावी लागे. त्या बांबूना लोंबकळण्याचा मी प्रयत्न करू लागले.त्याच काळात कुठे जुने वाडे असतील त्यांच्याकडे जाणे झाले तर चौरंगी मोठा झोपाळा हमखास असायचा.त्याच्यावरही बसण्याचा मोह मी टाळू शकत नसे.

काही दिवसांनी बागेतील झोपाळ्याचा शोध लागला.आणि झोपाळ्यासाठी बागेच्या फेऱ्या वाढू लागल्या.कधी बहिणीला घेऊन कधी मैत्रिणी बरोबर झोपाळ्यावर बसण्यासाठी बागेत जाऊ लागले .हेही जाणे फार काळ टिकले नाही. सारखं कसलं बागेत जायचं. आईने एक दिवस फर्मान सोडलं घरातलं काम टाकून बागेत झोका खेळायला नाही जायचं. हे काय वय आहे का सारखं खेळत बसायला. झाल त्यानंतर दहावी,कॉलेज झाले. नंतर नोकरी यामध्ये माझ्या आयुष्यातून हा झोका माझ्यापासून कधी लांब गेला ते माझे मलाही कळले नाही.

     काही वर्षांनी लग्न झाले.सासरी एका गावी गेले. तेथे एक झोपाळा दिसला. मोह आवरला नाही.मी झोपाळ्यावर 

बसणार इतक्यात आवाज आला.या वयात झोका घेतेस हे काय वय आहे का झोका खेळायच .

नंतर माझ्या पदरात एक गोंडस छकुला आला. मी आई झाले. इतकी वर्ष दूर गेलेला माझा झोका माझ्या अगदी जवळ आला.पण माझ्यासाठी नव्हे तर माझ्या गोड छकुल्यासाठी.

मुलाबरोबर का असेना काही वर्षे झोपाळा माझ्या सोबत राहिला.आता मुलगाही मोठा झाला. पुन्हा एकदा माझा आवडता झोपाळा माझ्यापासून दुरावला तो दुरावलाच.त्याला बरीच वर्षे झाली.

       आयुष्याच्या या वळणावर अजूनही झोका मला खुणावतो आणि वाटते आपल्या घराला गॅलरी असावी. तिथे एक झोपाळा असावा. त्यामध्ये निवांत पडून रहावे. कधी निवांत क्षणी चहा पीत पीत स्वतः शीच संवाद साधावा. नाहीतर एखादे छानसे पुस्तक घेवून निवांत वाचत पडावे.


Rate this content
Log in

More marathi story from Shraddha Kulkarni