Malini Sawdadkar

Others

2  

Malini Sawdadkar

Others

* जगन्माता अंबाबाई *

* जगन्माता अंबाबाई *

2 mins
66


माझी वहिनी सौ सुनीता जाधव बुलढाणा, यांनी आजच सांगितलेला एक किस्सा इथे सांगावासा वाटतोय....

त्यांच्या मोठ्या मुलाला आणि सुनेला त्यांच्या लहान सूनबाईंच्या वडिलांकडून त्यांच्या नवीन दवाखान्याच्या उद्घाटना निमित्त दोन चांदीच्या समया मिळाल्या होत्या, आणि तिच्या स्वतःच्या आईकडून नेकलेस...

उदघाटन झालं तो दिवस होता 22 मे......त्यानंतर त्या आलेल्या नेकलेसशी तिला काहीच काम पडलं नाही.

पण आता नवरात्रीच्या उत्सवात गरब्यामध्ये मोठ्या सूनबाईला म्हणजे डॉ रुधिराला नेकलेसची आठवण आली पण शोध शोध शोधूनही तिला तो नेकलेस सापडत नव्हता.

नवरात्रीमध्ये घराची साफसफाई बायकांकडून करून घेण्याचं काम अर्थात माझ्या वहिनीचंच, कारण त्यांची मुले व सूना डॉक्टर असल्यामुळे घराची सुव्यवस्था, देखरेख पूर्णपणे माझ्या वहिनीच्याच अधीन.

हा नेकलेस न मिळाल्यामुळे दादासहित सर्वांचा रोष अर्थातच वहिनीकडे, कारण त्यांनी साफसफाईसाठी घरात ज्या बायका बोलावल्या त्यांच्याकडेच संशयाची सुई जात होती. 

त्या दिवशी वहिनीने देवीकडे सांकडे घातले..."आई, नेकलेस घरातच मिळू दे आणि तो ही मलाच सापडू दे"

आरती संपल्यावर त्या मनोमन निश्चय करून वर गेल्या...

सूनबाईंच्या कपाटातील एकूणएक ठिकाण त्यांनी पिंजून काढलं....

आणि नंतर त्यांना आठवलं, की 22 मे ला उद्घाटनाच्या दिवशी भेटलेल्या ह्या दोन समयांच्या बॅगमध्ये कदाचित तो नेकलेस ठेवल्या गेला असेल.....

रुधिरा त्या बॅगवर मुंबईचं नाव असल्यामुळे ती बॅग दरवेळी उचलून बाजूला ठेवून कपाट चेक करत होती, त्या चेकिंगची बरीच आवर्तने झाल्यावर तिने नेकलेस मिळत नाही असं जाहीर केलं होतं....

पण माझी वहिनी ब्रेन स्टोर्मिंग पद्धतीने विचार करणारी....

तिने सर्वात अगोदर समयांचीच बॅग तपासायला घेतली...

आणि 'अहो आश्चर्यम'....तो नेकलेस तिला त्याच्या सुरेख पॅकिंगमध्ये दिमाखात विराजमान झालेला आढळला..

ह्या प्रसंगानंतर अर्थातच सर्वांनी वहिनीतील स्त्री शक्तीलाही मनोमन वंदन केलेच असेल पण सर्व कुटुंबिय देवीसमोर मात्र अत्यंत श्रद्धेने नतमस्तक झाले...

तर अशी ही माझ्या दुर्गेची महत्ता आणि तिच्यावरील तिच्या भक्तांच्या विजयाची एक सत्यकथा....

अगदी माझ्या माहेरात घडलेली कालचीच गोष्ट...


तर ही अशी आदिशक्ती, 

भोळ्या भाविकांसाठी वत्सला।

महिषासुर मर्दिनीसुध्दा तीच

तिला श्रद्धेने पुजू या चला ।।


Rate this content
Log in