Mansi Joshi

Others

4.8  

Mansi Joshi

Others

जगावेगळी भाऊबिज

जगावेगळी भाऊबिज

3 mins
536


दिवाळी म्हणजे धामधूम,साफसफाई, खरेदी, फराळ बनवणं, आकाशकंदिल ,किल्ला बनवण, पांडव घालण,मेहेंदी, रांगोळ्या एक ना दोन...दसरा संपला की आमच्या घरात दिवाळीच वातावरण कन्टिन्यु व्हायच...कपडे खरेदी करुन वेळेत शिवून मिळायला पाहिजेत म्हणून शिंप्याकडे पहिली वर्णी लावायची….त्यातच शेतातली कामपण चालूच असायची,भुईमूग काढायचा,तूर,मूग,उडिद,चवळी कापायची,शेतात खेपा करायच्या,शेतमजूर बायाबापड्यांची वाड्यावर लगबग …...

      विभा खरच कामाच्या रगाड्यात एवढी बुडली होती की यावर्षी नेहमी प्रमाणे पुढाकार घेऊन दिवाळीचा शेवटचा खास भाऊबिजेचा दिवस प्लँन करायचा शिरस्ता तीने मोडलाच होता.

 तीघी बहिणी आणि एकुलता एक भाऊ….आईच्चा माघारी तीन सगळ्या भावंडांना बांधून ठेवल होत. पूर्वी भाऊबिज विभा आपल्या वाड्यात करायची...तीच्या नणंदा,बहिणी, भाऊ सगळे एकत्र जमायचे...पण सगळा वेळ कामातच जायचा म्हणून तीनं ठरवलं दिवाळी झाली की विकेंडला एखाद्या रिसाँर्टला सगळ्यांनी एकत्र भाऊबिजेचा कार्यक्रम करायचा.आणि सगळ्यांनीच ते मान्य केल त्याप्रमाणे गेले. पंधरा, सोळा वर्ष आम्ही छान शनिवारी रविवारी मज्जा करायचो,पण या वर्षी पावसानं आपली पथारी पसरली आणि जायच नावच घेईना, त्यात नदीला पूर सगळीकडे भरलेल पाणी,धाकट्या बहिणीच पडलेल घर,सामानाची वाताहात,ते पुन्हा निट करेपर्यंत होणारी धावपळ यासगळ्यात तीन रिसाँर्ट ठरवलच नाही, नेहमीच हे काम विभा करायची त्यामुळे बाकी कोणी यात लक्ष घालतच नव्हतं

        दिवाळी दोन दिवसावर आली आणि नेमक धाकली सुलू तापानी फणफणली. फोन आला तस ती धावत पळत डिग्रजला जाऊन आली.मलेरिया आहे अस डॉक्टर म्हणाले पण ताप चांगला ठाण मांडून बसला. तीचा भाऊ शशी गावातच होता त्यामुळे तीला काळजी नव्हती.

      फोनवर चारदा दिवसातनं चौकशा,सुचना चालू होत्या,जीवाची घालमेल सुरु होती,मधली बहिण कोरेगावला म्हणजे थोड लांबच होती.विभान तिला भाऊबिजेला आलीस तरी चालेल मग रहा दोनचार रोज अस सांगितल होत.यावेळी भावाकडे भाऊबिजेला जायच म्हणजे आजारी बहिण तिथल्यातीथं तासभर येऊन जाईल अस ठरल…….आणि अचानक सुलूला अँडमिट केल्याचा फोन आला .आता काय झालं बर……….

          दिवाळीचा फराळ सगळ्यांचा झाला होता…….फराळाच घेऊन मावशीकडे तिचा मुलगा निघतच होता..ती पण त्याच्या बरोबर निघाली, डॉक्टरनी आता डेंग्यू झालाय आणि चुकीच्या औषधामुळे किडनी डँमेज झाल्यात तेव्हा किडनी डोनर कुणी मिळतय का त्याचा तुम्ही ही तपास करा आम्ही ही पहातो अस सांगितलं…...पुन्हा सगळे टेंन्शनमधे……..भरदिवाळीत काय झालं हे…….पूराच पाणी ओसरल पण मागे प्रचंड घाण ठेवून…..रोगराई वाढली...तापाचे अनेक प्रकार कळेपर्यंत हे काय नविन उद् भवलं…..

     विभान मधल्या बहिणीला कळवल की आता सांगलीलाच हाँस्पिटल मधे ये आम्ही सगळे तिथेच तुला भेटू मंगळवारी……

घरी येऊन तीनं लक्ष्मीपुजन करायच म्हणून केल.पाडवा ही असाच गेला आणि रात्री डॉक्टरांचा फोन किडनी डोनर मिळालाय उद्याच आँपरेशन सकाळी होईल.    

        दरवर्षीप्रमाणे उद्या नणंदा येणार भाऊबिजेला आपल्यातर निघता येणार नाही. तीचा जीव चडफडला. झोप नव्हती रात्रभर….पहाटे उठून बैजवार स्वैपाक केला.मटनाचा रस्सा,तांदळाच्या भाकरी गोडाधोडाच केल. डोळे घड्याळाकडे होते तिच्या नणंदा दोघी आल्यावर तीनं घडलेला प्रकार सांगितला तशा त्या दोघीही म्हणाल्या वैनी तुमी जावा बिनघोर आमच आम्ही बघतो इथलं………..तिला क्षणात आपण नात्यान खूप श्रीमंत असल्याच उमगलं…….तीचा हात आपसुकच दोघींच्या डोक्यावरन फिरला.

         लेकाच्या गाडीवरन ती सांगलीला हाँस्पिटल मधे आली नुकतच आँपरेशन झाल होत. सुलु ग्लानीतच होती तीनं भावजयला भावाबद्दल विचारल तेव्हा तिच्याऐवजी तिथली नर्सच म्हणाली ….

   शेजारच्या रुममधे आहेत ते……..

अग बाई तोपण आजारी पडला….माझ्या नशिबा…..म्हणत ती भावाला बघायला गेली तर भाऊ नुकताच शुध्दीवर आला होता आणि तीला पाहून मंद हसला. अरे तुला काय झालय बाबा……

 बिपी चेक करणारी नर्स म्हणाली अहो यानीच आपली किडनी आपल्या बहिणीला दिली ना.

हे ऐकून विभाच्या पायाखालची जमीन सरकली …...तीने भावजयकडे पाहिल.अग तु ..तु कशी परवानगी दिलीस  तेव्हा मंद हसत ती म्हणाली, निर्णय तुमच्या भावाचा होता हो मी फक्त सही केली.

…..त्याक्षणी ती एका तेजस्वी देवीसारखी वाटली….तोपर्यंत तीची मधली बहिणही आली….सुमा बघ ग आपला भाऊ आपल्या नजरेत खुप मोठा झाला…..आज त्यानं जगावेगळी भाऊबिज बहिणीला घातली…..

 


Rate this content
Log in