Pradip Hiwarkhede

Others

3  

Pradip Hiwarkhede

Others

इंटरनेटच्या या जगात

इंटरनेटच्या या जगात

1 min
347


इंटरनेटच्या ह्या जगात

खुप भूलभुलैया आहे,

समजला तो हुशार, ना समजला तो बिनडोक आहे,

इथे येणारा प्रयेक जण सुरुवातीला असंच म्हणतो, 

टाईमपास म्हणुन वापरायचे नेट,

इथे कुठे आपल्याला जास्त वेळ असतो...

पण एकदा का कुणी ह्या जगात पाऊल ठेवले,

तो परत लवकर माघारी गेला नाही,

हा ही एक इतिहास आहे.

इंटरनेट हे एक मायाजाल आहे, 

वायर चे तर कधी विना वायर चे जंजाळ आहे,

करमत नाही वापकर्त्याला,

काहीच सुचत नाही.

जर कधी बंद पडले इंटरनेटचे हे भुत, 

हे भुत मानगुटीवर बसले आहे,

आज सगळ्यांच्याच संपूर्ण जगात, 

कसे उतरावे ह्याला, कसे ह्यातून बाहेर पडावे, 

प्रश्न एक अनुत्तरित आहे.. 

आज सगळ्यांचे बोलणे बंद झाले, 

पण चाट मात्र भरपूर सुरु आहे,

जवळचे असे कुणी राहिले नाही, 

दूरचे मात्र खुप जवळ आले,

तासंतास चाट वर बोलणारे, 

एकमेकांसमोर आले कि शब्द सुद्धा बोलत नाही, 

हाय, हॅलो पासुन बोलायला सुरुवात होते, 

कधी लग्न जमते अन कधी तुटते हे ही कुणाला कळतं नाही, 

सोशल मीडिया, व्हिडीओस, सॉंगस पासुन दिवसाला सुरुवात होते, 

बर्थडे चे स्टेटस टाकल्या शिवाय अन पहिल्या शिवाय हल्ली कुणी झोपत नाही..

परिस्थिती खुप वाईट आहे, 

लिहलं तितकं कमीच आहे, 

फक्त नुकसान आहे इंटनेटचे, 

असं मी म्हणणार नाही, 

पण माणसाने योग्य त्या ठिकाणी, 

योग्य त्या वेळेस वापरले तर, 

आधुनिक जगाचे हेच एक वरदान आहे...



Rate this content
Log in