Aarti Ayachit

Others

2.5  

Aarti Ayachit

Others

हसवणारे काका

हसवणारे काका

1 min
2.8K


माझे मुंबईचे सर्वात लहान काका दिवाळी सण साजरा करायला इंदोरला आले होते, दोन काका तिथेच राहायचे. आम्ही सर्व एकत्र झालेलो दिवाळी साठी आणि मी लहानच होते तेव्हां. सर्व काम आटोपल्यानंतर मस्ती, मज्जा, गम्मत करत बसायचो रात्री.

फिल्मी कलाकारांच्या बाबतीत इतकी माहिती नसायची पूर्वी. तेव्हां इंदोरचे काकांनी लहान काकांना विचारले की तू राजेश खन्नाला पाहलय का रे ? हे ऐकून काका एकदम म्हणाले अरे तो एवढा मोठा फिल्म स्टार असा रोड वर थोडी फिरत असतो, हे ऐकून आम्ही सर्व इतक्या वर्षांनंतर जोरात हसलो आणि मी लहान आणि माझ्या चुलत बहीणी पण. आम्ही राहून राहून इतके हसलो की सांगू नाही शकत. आता माझे लहान काका नाहीयेत पण त्यांची ही गोष्ट अजूनपर्यंत आमच्या मनात आठवणीच्या रूपात बरोबर आहे.


Rate this content
Log in