Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Chhaya Khalkar

Others

4.0  

Chhaya Khalkar

Others

हक्काचा मदतगार

हक्काचा मदतगार

2 mins
675


जीवनात अशी काही माणसं साथ करतात की जीवनात दुःख असली तरी ती सहजपणे पेलण्याची ताकद देतात. रागावर मात करून सत्कार्य करण्याची प्रेरणा देतात. खंडू तात्या हे पण अगदी असचं व्यक्तिमत्व. परोपकार करणे हा त्यांचा मूलभूत स्वभाव आहे. गावतल्या कोणत्याही माणसांवर संकट आले की पहिलं वाक्य असतं खंडू तात्या कुठयं ? हे वर्णन वाचून तुम्हांला वाटेल खंडू तात्या म्हणजे गावातील कोणी गर्भश्रीमंत शेतकरी असेल. पण जरा थांबा तुम्हांला धक्का बसेल खंडू तात्या म्हणजे आदर्श विद्यालय या गावातील शाळेचा शिपाई. पण आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सतत मदत करण्याच्या तयारीमुळे खंडू तात्या शाळेपासून गावातील सर्व लोकांचा हक्काचा मदतगार आहे.

खंडू महादू शिंदे असे खंडू तात्याचं पुर्ण नाव. खंडू तात्या माहीत नाही असा माणुस गावात सापडणे दुर्मिळच. माझी आणि तात्यांची ओळख खूप जुनी अगदी मी शाळेत असल्यापासूनची. आजही मला तो दिवस आठवतोय मी सातवीला होतो. शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेलो असल्याने शाळेत वझे सरांचे जादा तास असायचे या जादा तासाला जात असतांना मी सकाळी सकाळी सायकलवरून पडलो. लागलही भरपुर. वाटेत चक्कर येवून पडलो, ही बातमी तात्यांच्या कानावर गेली तात्या लगेच गावातले टर्ले डॉक्टर घेवून हजर त्यांनी माझ्या तोंडावरून पाणी मारून मला जागे केले. डॉक्टरांनी औषधोपचार केले. मला तात्यांनी घरी पोहचवले. तसेच माझा अवतार पाहून घाबरलेल्या घरातील आई आणि ताईला समजावले.

हा प्रसंग आठवला की वाटतं की खरचं काय नातं होतं माझं आणि तात्याचं ? ते ज्या शाळेत काम करत होते त्या शाळेतील मी एक विद्यार्थी होतो. पण आपला मुलगा जणूकाही पडलाय या भावनेने त्यांनी मला मदत केली. नात्याच्या पलीकडे जावून सर्वांना मदत करावी हा संस्कार त्यांच्याकडून आत्मसात करण्यासारखा आहे. खंडूतात्या आणि माझे ऋणानुबंध अगदी तसेच आहे. जेव्हा जेव्हा मी गावी जातो तेव्हा खंडू तात्यांना भेटतो. आता तात्या सेवानिवृत्त झालेत पण त्यांचे मन मात्र अगदी तसेच तजेलदार आहे आणि अडल्या नडलेल्यांच्या मदतीसाठी ते आजही तयार असतात तेही अगदी पुर्वीच्या जोमाने.



Rate this content
Log in