The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Bhagyashri Chavan Patil

Others

3  

Bhagyashri Chavan Patil

Others

हितगुज स्वतःशी

हितगुज स्वतःशी

4 mins
11.6K


खुप दिवस झाले ग आपण बोलुन म्हणून आज म्हटलं की बोलावं बघुन आता तरी कशाचा शोध लागतो का ते? कारण मनाला टोचणी बोचली की मी तुझ्यापाशी येते बोलते आणि मन मोकळे झाल्यासारखे वाटते या वर्षात खुप काही घडून गेलं घडतं आहे आणि त्यावरच उत्तर म्हणजे फक्त डोळ्यातलं पाणी आणि बाकी काहीचं नाही कारण आपण जसं राहतो विचार करतो तसा तो कोणीच करतं नाही कारण प्रत्येक जण हा वेगळा असा माणूस असतो आणि जे समोर घडतं ते उघड्या डोळ्यांनी पाहत राहणं हे आपल्या हातात असतं खुप येऊन बोलावंसं वाटलं तुझ्याशी पण परत अस वाटलं की बोलणार तरी काय? तेव्हा मनात विचार आला विचार करून कधीच बोलत नाही आपण मनात काहीतरी साचत म्हणुन मी मन मोकळे करते तुझ्यापाशी मग थोड का होईना बर ही वाटतं खुप माणसे आयुष्यात आली काय आणि गेली काय सारखंच आपण मात्र तिथेच उभे आहोत पण नवीन बदलांबरोबर नवीन काहीतरी शिकतो आहोत आता कोणाशी मनातलं गुपित सांगावं आणि त्याची मजा आता उरली नाही आहे सगळी जण आता आज मध्ये जगत आहेत..

        

  आणि तस बघायला गेलं तर हेच बरे आहे आधी खुप अपेक्षा आशा असायच्या आणि तीच जादूची दुनिया जिथे सर्वच काही आपल्या मनासारखं घडत असतं आणि तेच खर हाउदेत म्हणून प्रत्येक माणूस हा असा विचार करून वागत असतो आधी मला ही असच वाटायचं कोणी काय बोलल की लगेच राग यायचा आणि वाईट ही वाटायचं सगळे आपलेच कसे राहतील याचा नेहमी प्रयत्न असायचा पण खरं तर तसं काहीच नसतं कारण कोणी मनात स्वार्थ ठेवून नात निर्माण करतो तर कोणी काहीतरी हवं म्हणून त्या नात्याचा उपयोग करतो.. आणि मैत्री म्हणजे काय तर, आयुष्याच्या वळणावर जुळून आलेली एक अनामिक ओळख आणि ज्याची सुरुवात अनोळखी म्हणुन होते आणि मन गुंतत जातं पण शेवटी जशी सुरुवात तसाच त्या नात्याचा शेवट ही अनोळखी म्हणूनच होतो फक्त आलेली ती वेळ आपल्या कडून हे सगळं करून घेत असते हेच ते मैत्रीचं नात कोणी एक जण आयुष्यभर एकतर्फी टिकवून ठेवत. तर कोणी अगदी सहज कायमच मागे टाकून पुढे निघून जातात अशी ही दुटप्पी माणसं जी मैत्री सांगून एवढ रामायण घडवून निघून जातात 

    

    बरं फक्त मैत्री असच काही नाही पण हे एकच नात आहे जे आयुष्यात खूप सारे बदल घडवून आणत असतं आणि या सगळ्या लोकांमध्ये ही लोक ही असतात जी बोचाणी सारखी टोचत असतात म्हणुन या नात्याचा उल्लेख करावासा वाटला बाकी काही नाही कारण याच नात्याच्या लेबल ने खुप माणसे आयुष्यात डोकावूं पाहवत असतात आणि त्यातली काही जण सफल ही होतात त्या लोकांचीच दोना ची चार होतात आणि मग काय मग सांगायला च नको म्हणून मी स्वतःला या पुढे ही मी नेल आहे एक पाऊल का होईना पण माणसांपासून थोड दूरच राहायचं उगाचच बोलायला जायचं नाही आपण भलं आणि आपल काम भलं हा मंत्र ठरवला आहे आणि तोच उपयोगी पडतो आणि मागे जे काही घडून गेलं त्याचा तसू भर ही परिमाण पुढे होणार नाही याची काळजी मी घेणार आहे कारण आजपर्यंत जी जी करून पदरी निराशाच पडली आहे आणि त्यातलं ते एकटेपण आणि त्यामुळे होणारे शारीरिक त्रास वाढत जातं आहे म्हणून आधीच काळजी घेतलेली बरी बरं कोणला आयुष्यात यायला आणि जायला त्याचा तो ती रिकामा आहे पण आपण एक मनाशी पक्क केलं आहे आज आला आहे अथवा आली आहे उद्या नक्की जाणारं 

    

      म्हणून आपण आधीच तयारीत असलेलं बरं आणि रक्ताची नाती तशी बरी वाटतात कारण इथे नातीच नात्यांना नवीन नाव सुरुवात देत असतात आणि जी काही वचनांची देवाण घेवाण होते तेव्हा आपलीच चार माणसं तिथेच उभे असतात म्हणुन तर या नात्याची वीण घट्ट पकडून ठेवायला मला नक्कीच आवडेल इथे ही थोड्या कुरबुरी असतात पण कोणी अर्ध्यावरती डाव सोडून जाणार नाही याची खात्री असते म्हणूनच आपली ती आपली बरी आणि रक्ताची नसून नावांनी जी नाती जवळ येतात ती काहीच जणांच्या बाबतीत खूप उपयोगी ठरतात तेव्हा ही नाती मुबलक वाटतात पण हा नशीब असेल तरच नाही तर नाही तेव्हा विश्वास ठेवायला हरकत नाही पण फक्त अश्याच वावड्या उठणाऱ्यांवर विश्वास नकोच ठेवायला हो ना बरं झालं बोलले खुप बरं वाटलं आपल कोण आणि परक कोण हे आज समजलं आणि थोड तरी का होईना खुप हलकं आणि बर ही वाटलं आता यापुढे गफलत नाही होणार भवतेक हीच टोचणी मनाला बोचत राहिली असणार म्हणूनच मनानी तुझ्यापाशी धाव घेतली तसचं आपल्या लोकांचं आयुष्यातून निघून जाणं हे ही दुःख आहेच पदरी पण आपली माणसं आहेत सोबतीला होईल सगळ काही नीट आणि यातून फक्त एकच शिकायला मिळालं की नको ती अपेक्षा कधीच करायची नाही जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळाल्या शिवाय राहणार नाही आणि जे आपल नसत ते कधीच आपल्याला मिळतं नाही कारण देवांनी त्या पेक्षा काहीतरी चांगल आपल्या साठी बनवून ठेवलेलं असतं म्हणूनच तर बाप्पा आहे ना तो करेल नीट सगळं आपण काळजी करायची नाही जे काही होत असतं ते चांगल्यासाठीच होत असत आणि जे काही चांगल आहे तेवढेच तो ही सगळ्यांना ते देत असतो आणि ही सारी त्याचीच तर किमया आहे आणि वस्तुस्थिती कशी ही असली तरी शेवट ही नेहमी गोडच होतो..


Rate this content
Log in

More marathi story from Bhagyashri Chavan Patil