Sumati Tapse

Others

3  

Sumati Tapse

Others

गवस

गवस

3 mins
188


आज समिधाला ऑफिस सुटल्यावर घरी जावं वाटत नव्हतं. नेहमीप्रमाणे भाजी,मुलासाठी, सासऱ्यांसाठी आवडीच काही घेऊन जाण्याची इच्छा होत नव्हती. काल समीरच्या बोलण्याने तीच

मन अजूनही जखमे सारखं ठसठसत होत... तिने तडक बसस्टँड गाठलं. चक्री बस लागली होती ती जाऊन बस मध्ये बसली...

कंडक्टरला सुट्टे पैसे देऊन तिकीट घेतल आणि रिलॅक्स मागे टेकून डोळे मिटून निवांत बसली. पण.. कालचे समीरचे वाक्य आठऊन जणू त्याच्या प्रश्नांना उत्तर देऊ लागली....

   " तुला सरकारी नोकरी आहे , माझं काय , तुझी नोकरी सोडू म्हणते . पैसे कमावते, घरातलं करते काही उपकार करते का?

     " अरे मला तस नाही म्हणायचे, घरात तूही लक्ष घातलं पाहिजे.

     हप्त्याचे पैसे तारीख निघून गेली, हे तू मला सांगतो तूही लक्षात ठेवलं पाहिजे , नोकरी करून, मुलांच्या शाळा , त्यांची tution, अभ्यास , आईंचे,आप्पांचे मेडिसिन, त्यांचे फॉलोअप पेपर, दूधवाला, सणवार , रीतिरिवाज भाजी, बाई, गॅस, जबाबदारीनं फक्त मीच वागायचं का? आणि तुला हवं ,नको ते सर्व  करतांना माझा दिवस जातो, तू दिवसभर घरासाठी काय करतो?"  माझ्या पैशांनी महागड्या वस्तू घेतो स्वतःसाठी ,हे सर्व मी स्वीकारते..

      घरात ऐक गृहिणीप्रमाने वागते तुझ्यासाठी ह्याची थोडी जाणीव ठेव. तुझ्याकडून अपेक्षा करन तर केव्हाच सोडून दिलं मी "

      हे मी रागाच्या भरात स्पष्ट बोलले पण ते सत्य होत.

      पण नेहमी प्रमाणे त्याचा अहंकार आडवा येत होता. माझ्या कुठल्याच आनंदात तो कधीच सहभागी झाला नव्हता कारण त्याला फक्त स्वतःपलिकडे इतरांचही आनंदी जग असत ते जग कधी बघण्याचा प्रयत्नही त्याने कधी केला नव्हता जबाबदारीपेक्षा आधिकर त्याला जास्त कळत होता मी मात्र सतत.....

     अगतिक बनल होत मुलांसाठी, त्यात ऐक घरातली multi task machine सतत कार्यरत होती.

चुकीची होती त्यामुळे जिव्हाळा कधी वाटलं नव्हता. स्वतःचा विचार, गरज फक्त कळत होती त्यात तो खूश होता... तेव्हड्यात बस थांबली, तिची तंद्री भंग झाली. पुढच्या स्टॉपवर उतरायचे आपल्याला असे म्हणतच ती सीटवरून पुढे आली . स्टॉप आला ती उतरली, सकाळी तिने डबा नेला नव्हता भूक खूप जाणवत होती. समोरच पावभाजी केंद्र दिसल. थोड्यावेळ ती विचारात पडली. पण दुसऱ्याच क्षणी

ती हॉटेल मध्ये शिरली. मनात काही विचार न करता, घाई, न करता निवांत पावभाजी खाल्ली. खूप बरं वाटलं तिला. आता काय करावं, तेव्हड्यात.....आंकुर चा फोन आला. "आई ,तू कधी येते ऑफिस नाही सूटल का आजुन ?"....  "हो मी येतेच , रस्त्यातच आहे, बाबा काय करतात '.  "आई, बाबा टीव्ही लाऊन त्यांचं फाईल च काम करतात कधी यूट्यूब, watsup, kadhi facebook बघतात, त्यांच्या रूम मध्ये आहेत.

 ती परत बसस्टॉप वर आली ,एव्हाना तीच चक्री बस परत जाण्यासाठी लागलेली पाहून तिला थोड हसू आलं. ती घरी आली तर आज तिची सर्व कामे दोन्ही मुलांनी केली होती घर नीटनेटक, कपडे मशीन मधून काढून वाळत टाकले होते.  किचन नीटनेटक केलेलं होत. तिला प्रसन्न वाटले.

 तिने त्याच्याकडे पाहिलं तो हसत होता , त्याच्या डोळ्यात "तू आम्हाला सोडून जाऊ शकत नाही , आली ना " तीही हसली मनातच म्हणाली" तू अहंकार व स्रीला कमी लेखण्याने  वेळोवेळी हरला आहेस, कधीतरी मी तू बांधलेल्या माझ्या पंखांच्या दोरीच्या विळख्यातून सुटण्याची संमती स्वतःच्या आनंदासाठी मिळविनचं, "बॅचलर married life "..... तेवढयात...

 आंकुर ने ऐक पाकीट तिला दिलं,  तिने ते उघडल तर काय , चेहेऱ्यावर तिच्या स्मित होत. तिने छंद म्हणून स्पर्धेसाठी अपंग मुलांना काही हस्तकला ऑफिस च्या सुट्टी मध्ये असताना शिकवल्या होत्या व ते योगदान संस्थेसाठी किती मोलाचं ठरल व त्या बद्दल तिला सन्मान करण्यात येणार होता. तिचे डोळे भरून आले तीच सुख, तिचा आनंद तिला गवसला होता... आणि आजूनही आज तिला काही गवसल होत ,तीच तिच्या मुलांना स्री विषयी विषयी आदर, प्रेम, सन्मान ,निष्ठा , सहानुभूतीआणि सहकार्याची भावना निश्चयाने निर्माण करू शकते...


Rate this content
Log in

More marathi story from Sumati Tapse