Gangadhar Suryawanshi

Others

2  

Gangadhar Suryawanshi

Others

गरिबांचे बालपण

गरिबांचे बालपण

1 min
3.2K


रोज जॉब वर जाताना माझी नजर त्या फुटपाथ वर राहणाऱ्या लोकांवर पडते, आणि मनात विचार येतो ही कर्मान लाचार जन्मान बेघर लोक आली कुठून यांची अशी काय मजबुरी आहे म्हणून आपली बायका पोर घेऊन त्यांना अस रस्त्यावर दिवस काढावं लागत, लहान लहान त्यांची पोर, म्हातारे आई वडील ,बायका, मळके तुटके फाटके कपडे घालून, जेवतात तिथेच , झोपतात तिथेच ऊन.. वारा... पाऊस.. साप.. विंचू... काटा याचा काही फरक पडत नाय ती घाबरतात फक्त माणसांना..पोलिसांना.. आणि त्यांच्या आयाबहिणीवर वाईट नजर ठेवणाऱ्या नराधमांना..... राहून राहून त्यांच्या मुलांबद्दल खूप वाईट वाटत.. त्यांच्या जीवनाची किंमत चुकवत असत बालपण.... कुणाच्या तरी उष्ट खाऊन भूक मिटवत असत बालपण.... बेचैन अंथरुणावर अंग टाकत फुटपाथ वर स्वप्न बघत असत बालपण.... दगडांच्या तुकड्यामध्ये खेळणी बघत निरागस जीवाची समजूत काढत बालपण... भिकेच्या कटोरी मध्ये मजबुरी भरून गरजेची तहान भागवत बालपण.... कुठे पिझ्झा, आइस्क्रीम खाऊन खुश होत बालपण, तर कुठे रोटी साठी तडपत बालपण... तरीपण बालपण किती निरागस ,प्रेमळ आणि हवंहवंसं वाटत... एखाद्याचा आनंद वाटून घेणं किती सोपं असत पण तितकच अवघड एखाद्याच दुःख वाटून घेणं. एखाद्या गरिबांची मदत करणं माणुसकी असते ,उपकार नाही गाव सोडून गेलेले लोक परत आपल्या गावी येतात कारण त्यांच्याकडे घर असत, काही लोक अशी ही आहेत, ज्यांचं कुठे घर नाही. कधी वेळ भेटलातर गरिबांबद्दल विचार करा...


Rate this content
Log in