गणपती बप्पा
गणपती बप्पा
*बाप्पास निरोपाचं पत्र*
गणपती बाप्पा मोर् या
पुढच्या वर्षी लवकर या
असा निनाद आज सकाळपासुन कानात घुमत आहे. आज सकाळपासुन सगळ्याची लहान मोठ्याची, घरादारात गणपती बाप्पा तुम्हाला निरोप देण्यासाठी सगळीकडेच धामधुम सुरु आहे. कोणी तुम्हाला गाडीत बसवण्यासाठी गाडीची सजावट करत आहे. गुलाल उधळण होत आहे. तर कोठे तुम्हाला तुमचे आवडते मोदक तयार होत आहेत.
आज तुम्ही एक वर्षासाठी आमच्या पासुन दुर जाणार खर तर तुम्ही येऊन दहा दिवस झाले. तुमच्या सोबतचे हे दिवस किती आनंदात गेले. रोज तुम्हाला मोदक तयार करणे तसेच तुमचे आवडते फुल तुम्हाला देणे. जसे काय तुमचे सर्व लाड पुरवण्यात दहा दिवस संपुन गेले. तुम्ही घरात आल्यावर खुप आनंदाचे वातावरण तयार झाले होते .सर्व वाईट विचार संपले होते मुलांना तर तुमचा खुपच लळा लागला होता. आज तुम्हाला निरोप देणे फार जीवावर येत आहे. माझ्या झाडावरची फुले तुमची वाट पहात रहातील. घरातील तुमची रहाण्याची जागा येण्याची वाट पाहिल. त्यामुळे तुम्ही लवकर या. आम्ही तुमची दहा दिवस केलेली सेवा गोड मानुन घ्या व जाताना तुम्हाला नमस्कार करत आहोत आम्हाला आशिर्वाद देऊन लवकर या.
वाट पहात आहे
