Vaishali Ayya

Others

4.1  

Vaishali Ayya

Others

एका प्रेमाची गोष्ट

एका प्रेमाची गोष्ट

4 mins
253



ही आहे सांगावीशी वाटलेली एका प्रेमाची गोष्ट!

 

एका बेटावर दु:ख, आनंद, श्रीमंती, मौजमज्जा आणि प्रेम ही सारी मंडळी राहत होती. त्यांचे सर्वांचे जीवन ते तेथे सौख्याने घालवत होते. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण ते लुटत होते. गेले बरेच वर्षे ते एकत्रच राहत होते. आपल्या ऐपती प्रमाणे कुणी महालात तर कोणी झोपडीत राहत होते. मर्त्य मानवाला असतात तशा चिंता, वैताग, व्यथा असे काही काही त्यांना नव्हते. जीवनातले गहेरे रंग संथ गतीने उधळता उधळता एकूण सारे सौख्य ते अनुभवीत होते.

 

आपले आयुष्य संथ-सुरळीत चालता चालता जसे एखादे वाईट विचारांचे आवरता यावे, संकटांचे वादळ यावे - तसे एकदा त्या बेटावर एक संकट आले. समुद्राने तांडव सुरु केले. महाभयंकर प्रलय सुरु झला. झ्हाडे उन्मळून पडू लागली. वाडे जमीनदोस्त होऊ लागली. प्राण वाचविण्यासाठी सारे जीव सैरावैरा पळू लागले. आजवर कशाचे ददात नव्हती. शिथिल दिनक्रम सुरु होता... पण अचानक दु:ख, आनंद, श्रीमंती, मौज-मज्जा आणि प्रेम ह्यांना देखील ह्या अनपेक्षित संकटांचा तडाखा बसला. त्यांचे तर भानच हरपले. सामुत्राचे हे अक्राळ - विक्राळ रूप त्यांनी कधीच पहिले नवते. भीतीने सर्वांची गाळण उडाली. म्हणता म्हणता ते सुबक - आटोपशीर बेत बुडायला लागले. प्रत्येकाचीच अवस्था दयनीय होती. काय करावे हे कुणाला उमजत नव्हते. असल्या संकटांचा ते सारे पहिल्यांदाच सामना करीत होते.

 

प्रत्येक जण आपला जीव वाचाविण्यासाचा प्रयत्न करीत होते. सापडेल त्या साधनाचा सहाय्याने ते प्रलायापासून दूर पळू लागले. काही मिळाले नाहीतर, इकडे धाव ठीकडे धाव. नुसती धावाधाव चालू होती. बेटातील राजमहालाच्या सर्वात वरचा मजलावर प्रेम राहत होते. त्याचे सर्व काही ठेतच असल्याने ते सरळ धाव घेत आपल्या खोलीत गेले. आणि पार्थना करू लागले कि हे थंडाव थांबावे. "देवा, हे थंडाव थांबव" अशी अजीज ते करू लागले. पण काही उपयोग झला नाही. प्रेमाची पार्थना देवालाही ऐकू गेली नाही. प्रेम आपल्या खिडकीतून उभे राहिले. हळू हळू पाण्याचा कड प्रेमाचा खोलीपर्यंत यून ठेपली. प्रेमाला वाटले आता आपला अंत निश्चित आहे. पण आपल्या विश्वासावर त्याचा विश्वास होता. म्हणून त्याने आपल्या सर्व मित्रांना मदतीची हाक मारायला सुरुवात केली. मोठमोठ्याने प्रेम आक्रंद करू लागले.

 

एका छोट्याशा नावेतून त्याला "दु:ख " जाताना दिसले. त्याने "दु:ख "ला हाक मारली आणि विचारले, 'हे दु:ख मला तुझ्हा बरोबर नावेत घे', पण दु:खाची नाव लहान असल्याने त्याने सांगितले कि, 'प्रेम मी तुला नावेत घेऊ शकत नाही' आणि निघून गेले. मग प्रेमाला एका मोठ्या अवाढव्य नावेतून 'श्रीमंती' जाताना दिसली. त्याने 'श्रीमंती'ला हाक मारली, आपल्या बरोबर नावेत घेण्याची विनंती केली. श्रीमंतीचे सर्व वैहाव, आणि पैसा त्या नावेत होता, आणि तिला वाटले कि जर आपण प्रेमाला आपल्याबरोबर घेतले तर हे गमवावे लागेल कारण नावेला जास्त वजन पेलवणार नाही. त्यामुळे आपल्या बरोबर न घेण्याचे कारण श्रीमंतीने प्रेमाला सांगितले आणि ती निघून गेली.

 

पाण्याची कड आता खिडकीजवळ आली. आता आपला जीव आपणच वाचावू शाकत नाही असे प्रेमाला वाटले. अचानक त्याला विमान्मार्गी 'आनंद' जाताना दिसला. प्रेमाने त्याला खूप खूप हाक मारल्या. पण त्याचा काही उपयोग झला नाही. आपला जीव वाचला ह्या आनंदात तो इतका मश्गुल झला कि त्याला प्रेमाची हाक ऐकू आलीच नाही. प्रेम अगदी निराश झाले. खंतावले. पण मग पुन्हा एक आशेचा किरण प्रेमाला दिसला. त्याला 'मौज-मज्जा' जातांना दिसले. प्रेमाने त्यांना करुणेने हाक मारली. आणि आपला जीव वाचविण्याची विनंती केली. पण मौज-मज्जा त्यांचा मध्ये इतर कोणीच नको होते. त्यामुळे ते सुद्धा तेथून निघून गेले.

 

हताश प्रेमाने दमून एक दीर्घ नि:श्वास टाकला. आता आपली जगण्याची उमेद संपली आहे, असे त्याला वाटले. आता काहीच पर्याय नाही असे त्याला जाणवले. त्या समुद्राचा उग्र तांडवाला प्रेम घाबरत होते. त्याला कुठलाच मार्ग दिसत नवता, पण तरीही परिस्थितीला थोंड तर द्यायचे होते.

 

मग अचानक ध्यानी मनी नसतांना एक बोट आली. त्यातून एक हाक आली. 'माझाबरोबर ये' एवढा आवाज ऐकल्यावर प्रेमाने ताबडतोब त्या बोटीत उडी घेतली. कारण वेळच नव्हता. पाणी वर चढले होते, त्याची खोली पाण्याने भरलेली होती....

 

प्रेमाने आपले प्रेय बेत बुडतांना पहिले. आपले मित्र, त्यांचा सहवास त्याला आठवत राहिला. झल्या प्रकाराने जबर मानसिक आघात त्याला पोहोचला होता. ते इतके घाबरली होते कि डोळ्यातले पाणी गळाता गळाता त्याला ग्लानी आली. ते झोपी गेले.

 

एका किनाऱ्यालगत एक बोट येऊन थांबली त्यातून प्रेम उतरले. अजूनही ते पुरते सावरले नव्हते. काही काळ गेल्यावर प्रेमाला जरा तरतरी वाटू लागली. ह्या नव्या बेटावर पूर्वीचा बेतपेक्षा जास्त चैतन्य होते. पूर्ण हुशारी वाटू लागल्यावर, शुद्धीत आल्यावर प्रेमाने तिथल्या एका व्यक्तीला विचाले कि, "ह्या प्राणघातक संकटातून मला कोणी वाचविले?" त्याने सांगितले ती वेळ होती!

 

खऱ्या प्रेमाची ओळख 'वेळच' संगु शाकते. ह्या जीवनात आनंद, श्रीमंती, दु:ख, मौज-मज्जा आपले नाहीत. ते येतात नि जातात. आपल्याला खरी साथ दिली ती 'वेळ' होती. प्रेमाला आपले खर माणू कोण ते आता कळून चुकले होते. वेळेला गाठण्याची योग्य वेळ कुठली ह्याचा आता प्रेम विचार करीत होते....


Rate this content
Log in