एक व्हा जय लहूजी
एक व्हा जय लहूजी
* " एक व्हा ! जय लहूजी "*
आज भारत स्वतंत्र होऊन 75वर्षे पुर्ण होत आली आहेत. पण आज ही आपल्याला पाहिजे ते हक्क आणि न्याय मिळाले नाहीत.आज ही समाजामध्ये " तू - तू , में - में " ची भावना आहे. समाजाला एक करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाहीत.
जो जो पुढे आला तो तो मोठा झाला .पण समाज माञ तेथेच राहिला. पाहिजे ते नेतृत्त्व (अण्णा भाऊ साठे नंतर) मिळालं नाही. आजवर आपल्या समाजाची अधोगती झालेली आहे. आज गरज आहे एक व्हायची, आता नाही तर कधीचं नाही. नसता फोर क्लासच्या पण खाली जावे लागेल ! त्यासाठी सावध राहा आणि सावध राहून समाज हितासाठी , समाज रक्षणासाठी एक व्हा! जय लहूजी.
आपण ज्या समाजात जन्माल आलो ,
त्या समाजाचा अभिमान बाळगला पाहिजे,,
नुसते समाजाला दोष न देता ,
त्या समाजाला पुढे नेण्यासाठी
प्रयत्न केला पाहिजे...
जर आपल्याच्याने कुणाचे चांगले करणे होत नसेल तर कुणाचे वाईट ही करू नका आणि त्यांचे मन दुःखवू नका. प्रत्येकाला स्वतंत्र पणे जगण्याचा अधिकार आहे. कुणाकडे ही बोट दाखवू नका.आपल्याच्याने समाजाचे पाच विद्यार्थी घडत असतील तर त्यांना घडवा ते भविष्यात समाजातील पंचवीस विद्यार्थी घडवतील ! समाजाची प्रगती होईल आणि या आपल्या भारत देशाची पण.म्हणून मी म्हणतो , " एक व्हा! जय लहूजी "
आता वेळ आली आहे. एक व्हायची नेक व्हायची.आता नाही झालो एक तर मागील 75 वर्षे प्रमाणे संघर्षातचं घालावी लागेल ! आणि न्याय व हक्क मिळणार नाहीत. इतर समाज किती पुढे गेला आहे. त्यांच्या न्याय व हक्कासाठी वेळोवेळी एक होत आहेत आणि संघर्ष करत आहेत. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी, प्रगतीसाठी व विकासासाठी , मागण्यांसाठी खंबीरपणाने उभं राहवं. जेणे करुन पंतप्रधान,राष्ट्रपती,राज्यपाल,सुप्रीम कोर्ट यांना ही आपली दखल घ्यावी लागेल !
त्यांनी ही म्हणावं जे 75 वर्षात झालं नाही ते या काही महिन्यांत करून दाखवलं. कारण एकीचे बळ हे सर्वश्रेष्ठ असते. तेंव्हा केंव्हा " एक व्हा! जय लहूजी" ची किर्ती अखंड जगभर पसरत राहिल आणि इतरांना ही संघर्ष करण्यासाठी बळ देईल !
सर्वांनी एक व्हा ! जय लहूजीचा नारा देऊन , एकञ येऊन , एकमताने, एक दिलाने समाजाला उच्च स्तरावर न्यावं आणि नाव करावं. म्हणून मी म्हणतो की, " एक व्हा ! जय लहूजी ". धन्यवाद