Atul Atul

Others

1  

Atul Atul

Others

एक #पुस्तक लिहितोय

एक #पुस्तक लिहितोय

3 mins
769


एक #पुस्तक लिहितोय,

म्हणून भरपूर दिवस झाले कोणताही लेख पोस्ट नाही केला. 

अनेक लोकं मला जो एक महत्वाचा प्रश्न विचारतात.

#प्रश्न : तू हे विडिओ बनवतो तुला ह्याचे पैसे मिळतात का ?

त्यांचा हा प्रश्न विचारणं योग्य आहे.

त्याचं #उत्तर : मला ह्यातून आनंद आणि समाधान मिळतं #कलाकार असल्याचं. तो आनंद मला लोकांना वाटायला आवडतो म्हणुन मी व्हिडीओ बनवतो.

ह्या पूर्ण प्रक्रियेला आज 10 वर्ष पूर्ण होतील,

18 Nov 2009 साली,माझ्याकडे सॅमसंगचा स्लायडर मोबाईल होता,त्या मध्ये सेल्फी कॅमेरा नव्हता तेव्हा मी त्या मध्ये जे व्हिडीओ शूट केलेले होते,माझ्या कॉम्प्युटर मध्ये ते मला आता सापडले आहेत, लवकरच ते पण अपलोड करेल. ते मी कुतूहल म्हणुन शूट करत असे.


मला माझ्या देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करायचं आहे हे माझं लहानपणी पासूनचं स्वप्न आहे,आणी त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत,देश सेवा ही तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असतांना करू शकता,हे मला माहित आहे.स्वतःशी आणि देशाशी प्रामाणिक राहणं त्यासाठी पुरेसं आहे.

मित्रांनो आणी मैत्रिणींनो नमस्कार.

माझं नाव आहे #अतुल_दिलिपसिंग_चौधरी.

माझं संपूर्ण शिक्षण #इंग्रजी माध्यमातून सुरु आहे,

जुनिअर के जी पासून.लिहून,वाचून,

यु एस आणी यू के दोघी इंग्रजी मधे बोलून संवाद करू शकतो,माझी मातृ भाषा #मराठी आहे,त्याचा मला अभिमानही आहे और मै शुद्ध #हिंदी मै वार्तालाप भी कर सकता हू |

मी जन्मा पासून *कलाकार* आहे,प्रत्येक जन्मलेला माणूस हा कलाकार असतोच ह्यावर #पाबेलो_पिकासो ह्या जग प्रसिद्ध चित्रकार,कवी,मूर्तिकार,प्रिंटमेकर व नाटककार असलेल्या व्यक्तीने म्हटलेलंच आहे. "Every child is a Born Artist,but the problem is to Remain artist once we grow up." म्हणजे प्रत्येक जन्मलेलं मूल हे जन्मतःच कलाकार असते,पण अडचण आहे, मोठं झाल्यावर कलाकार राहण्यात.

तुम्ही माझे भरपूर व्हिडिओ, बघत असाल ते तुम्हाला आवडत असतील किंवा नसतीलही, हे सगळं माझ्या वयक्तिक प्रॅक्टिकल अभ्यासाचा विषय आहे व मी वेगवेगळे प्रयोग करत असतो, माझं युट्युबवर चॅनेल आहे #Drama_Lab_Films व #Atul_Dilipsingh तिथेही मी विडिओज पोस्ट करत असतो,नुकतीच मी माझी तिसरी शॉर्टफिल्म पूर्ण केली ' Turning point ' तिला खूप छान प्रतिसादही भेटत आहे.

माझं जन्मगाव भुसावळ,जिल्हा जळगाव (खान्देश) येथे माझ्याच महाविद्यालयात शूटिंग केलं,


हे माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.हे सगळं शक्य झालं माझ्या मित्र #kundan_Tawade मुळे,तो एक उत्तम कलाकार व महाविद्यालयात संगीत शिक्षक आहे,माझ्यासाठी त्याने #पु_ओ_नहाटा_महाविद्यालयात लघुपटाच्या शूटिंगची परवानगी घेतली होती.महाविद्यालयाच्या #अध्यक्ष_मोहन_भाऊ_फालक आणि #प्राचार्या_मीनाक्षी_वायकोळे_मॅडम यांनी परवानगी दिली.#नाट्यशाश्त्र_विषयाचे_आदर्श_शिक्षक,ज्यांनी माझ्यासारख्या भरपूर विद्यार्थ्यांना #कलाकार बनवलं आहे असे आमचे #Vaibhav_Mavale_sir,व माझ्या लघुपटात महाविद्यालयीन शिक्षकाची भूमिका असलेले #Satish_Kulkarni सर जे भुसावळ मधील रेल्वे स्कूलचे प्रिंसिपल आहेत ह्यांचं मला मार्गदर्शन लाभलं,माझा पुण्याचा फोटोग्राफर मित्र #Tanmay_Raskar ह्याने D.O.P म्हणुन निशुल्क काम केले,तसेच #Pranav_Bhise ह्याने Editor म्हणुन उत्तम काम केले.#Bodhisagar_Tayade, #Gaurav_sharma, #Abhir_Erkhe, #Umesh_Gordhe,ह्या माझ्या मित्रांनी कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दिवसरात्र मेहनत घेऊन ह्यांनी सेट वर #light,#sound व इतर सर्व व्यवस्था केली. महाविद्यालयातील #आमच्या_नाट्यशास्त्र_विभागाचे_विद्यार्थी जे उद्याचे #उभरते_कलाकार आहेत,त्यांनी ज्या शिस्तीने कसलाही त्रास न देता काम केलं ते खरं कौतुकास्पद आहे.भुसावळ शहरातील एक आदर्श व्यक्तिमत्व,#अंतर्नाद_प्रतिष्ठान_संस्थेचे #अध्यक्ष #sandeep_vasantrao_patil दादा हे आमच्या पाठीशी आहेत.#सकाळ #देशदूत #पुण्यनगरी #देशोन्नती #लोकमत #दिव्यमराठी ह्या सर्व #दैनिक_वृत्तपत्रांच्या_पत्रकारांचे विषेश आभार.

ह्या पूर्ण प्रकिये मध्ये मी माझी केलेली बचत लावली,

मित्रांकडून उधार पैसे घेतले व ते परत देखील केले.

व अश्या प्रकारे हा माझा #तिसरा_लघुपट यशस्वी झाला.

योग्य विचारच माणसाच्या आयुष्यात प्रगतीला कारणीभूत ठरतात ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

म्हणुन मी आदर्श विचारांच्या माणसांना #follow करतो.

माझ्या वाचनात आहेत श्री राम,श्री कृष्ण,गौतम बुद्ध,महावीर,छत्रपती शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद,महाराणा प्रताप,गुरु नानकदेवजी,गुरु गोविंद सिंघजी,डॉ बाबासाहेब आंबेडकर,डॉ ए पी जे अब्दुल कलाम,महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले ह्या सर्व महापुरुषांनी त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले आहेत,लोकांनी त्यांना खूप त्रास दिला आहे, हे सर्व महापुरुष मला ते बळ देतात आयुष्यात काहीतरी करण्याचं.

आज हा लेख लिहण्यामागचं कारण हे आहे हा पूर्ण प्रवास मी करू शकलो जबरदस्त इच्छाशक्तीमुळे,ह्या व्हिडिओ निर्मिती क्षेत्रामध्ये मध्ये सुरुवातीला घरच्यांचा आणी जवळच्या नातेवाईकांचा विरोध होता,लोकांना वाटायचं मी खोटा दिखावा करतोय,मी टाईमपास करतोय,माझी खूप टिंगल टवाळी करण्यात आली.आता ही होते फरक हा आहे आता मला फरक नाही पडत,मेहनत बघून सर्व लोक मला #कलाकार म्हणून ओळखतात.

" माझ्या विरुद्ध कोणीच स्पर्धक नाही,

आणी माझी कोणासोबतही स्पर्धा नाही.

कारण प्रत्येक कलाकाराचं आयुष्य वेगळं असते,

प्रत्येकाच्या आयुष्यातला संघर्ष वेगळा असतो "

जर हे सगळे माझ्या सोबत नसते आणी तुम्ही सर्व मित्र जर मला प्रेक्षक म्हणुन भेटले नसते तर आज मी #लेखक, #दिग्दर्शक व #निर्माता नसतो.

ह्या लेख मधे उल्लेख असलेले,नसलेल्या सर्व महानुभावांचे खूप खूप आभार,आपलं माझ्यासोबत #प्रेम आणी #आशीर्वाद असू द्या.

पुन्हा एकदा धन्यवाद सर्वाना.

31Dec 2019 पर्यंत #माझं_पहिलं_पुस्तक तुम्हाला वाचायला मिळेल.

लवकरच आपल्या समोर येईल

एक नवीन विडिओ मधून.


Rate this content
Log in