एक किस्सा
एक किस्सा
ही काही गोष्ट नव्हे ही एक आठवण आहे, मुळात ही माझ्या वडिलांनी मला सांगितलेली आठवण होय, तर आपल्या मायभूमीत लेखक व कवि यांना खुप संघर्ष करावा लागला, व नवनवीन स्त्री शिक्षण व लेखन सुध्दा समाजाला पचनार्य गोष्टी नव्हत्या असो
तर माझे वडील हे लहानपणी कवी सुरेश भट यांच्या जवळील होते , तर प्रसंग असा होता की सुरेश भट यांना एका कार्यक्रमात बोलवण्यात आले व कार्यक्रम संपल्यानंतर काही नवनवीन कवी त्यांना आपआपल्या कविता दाखवून सल्ला घेत असत व त्यांच्या बाजूला घेराव रहायचा. असाच एक स्त्रियांचा घेराव त्या कार्यक्रम संपल्यानंतर झाला होता. तेव्हा तेथे उपस्थित काही मान्यवरांच्या नजरेत ते खटकत असल्याने ते काही कमेंट कराय
चे त्यातील एक बोलला "चारो तरफ राधा बीच में कन्हैया" आणि तेव्हा त्याचे वाक्य सर्वांनी ऐकले आणि सुरेश भट हे कविता कशी करावी हे सांगत होते, त्याचे शब्द ऐकून ते म्हणाले,
"मी राम ही असा की, माझ्या हजार सीता
आलाही असेल किस्सा, रामायणात माझा"
हे असेच काव्य केले जाते, थोडक्यात महत्त्वाचे म्हणजे की मी ह्या किस्स्यातुन काय शिकलो ???????