एक अनुभवरूपी तिकीट
एक अनुभवरूपी तिकीट
चांगल्यातून चांगले निर्माण होते, वाईटांतून वाईटच.
काही वेळेला वाटतं चांगल वागणेच सोडून द्यावे. पण मग आठवतं आपले आईबाबा कसे सगळ्यांशी चांगले वागू शकतात? आपण का नाही? .
पण खरं सांगू का, मलाही चांगले वागणे आवडते पण काय आहे ना काही वेळेस आपल्या चांगलं वागण्याचा लोक गैरफायदा घेतात. काही लोकं तर आपल्याशीच सहज वाईट वागून जातात.
कुठे काही लोकं तर आपलं काही चुकले नसताना, आपल्यासोबत चुकीचे वागत असल्यावर मग राग येतो , चिडचिड होते, पायाची आग माझ्या मस्तकात जाते, पण काय करणार बोलू शकत नाही, बोलता येत नाही. कारण कधी तशी वेळच आली नाही आहे ना आजपर्यंत. पण जसजसे आपण मोठे होत जातो, बाहेर पडू लागतो, बाहेरचं जग बघतो तसेतसे जग कळू लागते. त्या जगातील माणसे कळू लागतात आणि माणसांचे विविध रंग दिसू लागतात.
आणि मग या स्वार्थी जगाचा अनुभव येऊ लागतो.
वाईट वाटतं खूप कोणी आपल्यासोबत वाईट वागतात तेव्हा. पण आईबाबांची शिकवण विसरून कसे चालणार? त्यांनीच शिकवले आहे कि कोणी कितीही वाईट वागू देत पण आपण मात्र नेहमी चांगलेच वागायचे. आपल्यातला चांगुलपणा नेहमी तसाच ठेवायचा. नाहीतर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तरी काय राहील?
शेवटी म्हणतातच ना...
"चांगल्यातून चांगले निर्माण होते आणि
वाईटातून वाईटच. "
लोकांनी आपल्यासोबत वाईट वागल्यावर दु:ख तर होणारच कारण आपण अपेक्षा ठेवून असतो सगळ्या लोकांनी आपल्याशी चांगलेच वागण्याची.
पण आयुष्यात असे सुद्धा काही अनुभव आले पाहीजेत.
असं म्हणतात....
"आयुष्य...हि एक अशी ट्रेन (Train-रेल्वे)आहे....जी जन्मापासून- मृत्यूपर्यंत सुख-दु:खाच्या.... वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर (फलाटावर)थांबते...! आणि आपल्याला... अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भाग पाडते."
अशाच एकएक करून काही स्टेशनवर उतरून, काही अनुभवरूपी तिकीटे जमा होत आहेत त्यातलेच हेही एक तिकीट. थांबते.धन्यवाद!
