दूर तू असताना ..
दूर तू असताना ..
1 min
8.5K
दूर तू असताना ते आभाळ तुझी जागा घ्यायचे
वेडे वाकडे तुझे आकार घेऊन
मंद मंद मला लाजवायचे.
ना एकही शब्द बोलायचे ना पापणीही पाडायचे
फक्त टक लावून ढिम्म बघायचे पण डोळ्यांत कसलेच भाव नसायचे.
कधी तू अचानक येता ते आभाळ विस्कटून जायचे
तुझे हे सोंग घेण्याची कला त्यांना कोण शिकवून जायचे. लांब निघून गेलीस तू , स्वप्नात तुला बघायचे
आभाळात दिसतेस तू प्रतिबिंब तुझे मानायचे.
आता स्वप्नात येत नाहीस सोडलेस आभाळातही दिसायचे कदाचित ठार विसरलीस तू मला
त्या आभाळाला काय दोष द्यायचे.