दूर प्रेम..(शब्द नसलेले)
दूर प्रेम..(शब्द नसलेले)
भाग -1
23 जून 2017 तेव्हा फेसबुक नावाचा एक नवीन क्रेज सुरु झाला होता, आणि मी तेव्हा पुण्यामधे नुकताच आलो होतो नोकरी च्या शोधात मित्रान सोबत जॉब करत असताना रात्री अचानक फेसबुक सुरु केले व बघत असताना रात्री तिची प्रोफाइल दिसली मी लगेच काही विचार न करता तिला रिक्वेस्ट टाकली ती रिक्वेस्ट दोन दिवसात तिने स्विकारली. नंतर मीच तिला ऑन बघून संदेश टाकला नंतर काही वेळानी तिचा संदेश आला एकामेकाबदल खुप बोलन झाल, तेव्हा ती अकोल्याला नोवोदया मधे होती. ती अचानक गावा कड़े गेली. खुप दिवसांनी परत तिचा संदेश आला. अरे मी गावाकड़े आली आहे मी तिकडे अकोल्याला गेली की तुला संदेश करेल ,ती जेव्हा अकोल्याला आली तेव्हा तिने सांगितले की तिचे बाबा तिच्या सोबत आले आहेत आणि तिच्या कड़े मोबाइल नसनार, जर मी तुला आवडत असेल तर तू मला एका वर्षानी संदेश कर अस बोलून निघुन गेली...