siddheshwar patankar

Others

2  

siddheshwar patankar

Others

देव आहे कि अजून कोण ?

देव आहे कि अजून कोण ?

8 mins
818


नमस्कार,,

आम्हाला गाव नाही आहे .. आम्ही मुळातच कोयना प्रकल्पग्रस्त असल्याने जी काही मजा केली ती कोकणातच .. मामाच्या गावी ... चिपळूणमध्ये ... चिपळूणमधून वर कुंभार्ली घाट चढला कि घाटमाथा चालू होतो .. तिथून थोडी गावं पार केली कि आमची ग्रामदेवता पद्मावती नव्याने बसली आहे .. तिचे दर्शन तसं म्हंटल तर वर्षातून एकदा तरी घेतो कुटुंबासमवेत ... कधीकधी मनात आलं आणि एकटाच चिपळूणला गेलो असेन तर मामेभावाची बाईक काढून देवीच्या दर्शनाला जाऊन येतो ...

कोयना एक निसर्गरम्य ठिकाण .. घनदाट झाडी ... भरपूर प्राणी आणि झुळझुळ वाहणारे अखंड पाणी ... खरंच हेवा वाटावा असं ठिकाण ... माझ्याकडे आता इथे फोटो नाही आहेत आणि कसे टाकायचे ते माहीत नाहीत .. पण जर टाकले ना तर कुठे तरी हिरव्या धुक्याच्या देशात आलो आहे असे वाटते ... हे धुकं तिथे जवळजवळ उन्हाचे दोन एक कडक महिने सोडले ना तर ठाण मांडून असते ...

एक काही वर्षांपूर्वी जवळजवळ २००९ साल असेल ते ... मी होंडा सिटी ( जुने मॉडेल ) घेऊन जायचे ठरवले .. अपेक्षित होताच पण कडाडून विरोध झाला .. सौ ने हात टेकल्यावर तिने सर्व जबाबदारी घरच्यांवर टाकली .. बाबांना कळल्यावर त्यांनी यथेच्छ समाचार घेतला .. जेव्हढा विरोध झाला तेव्हढा मी प्रतिकार केला .. कारणही तसेच होते मला माझ्या आईच्या आईला म्हणजेच माझ्या आजीला काही दिवस घरी मुंबईला राहण्यासाठी आणायचे होते .. कुणालाही ना जुमानता मी तारीख ठरवली आणि जाहीर केली .. बाबानी पण या रणसंग्रामात जाहीर करून टाकलं कि तू एकट्याने जायचं नाहीस आणि जर गेलास तर परत माघारी यायचं नाहीस तिथेच राहायचं आजीसोबत .. आली कि नाही पंचाईत ... यक्ष प्रश्न उभा होता ... मग मी तहाची बोलणी सुरु केली .. मी त्यांना विश्वास दिला कि आमच्या कंपनीतला एक ड्रायव्हर मी सोबत नेट आहे .. मिस्टर संतोष खांडेकर ... त्याच्याबद्दल आणि त्याच्या अनुभवाबद्दल त्यांनी जातीनिहाय चौकशी केली ... आधीच ते पोलीस अधिकारी .. त्यांनी व्यवस्थित चौकशी करून मग परवानगी दिली .. मी भरपूर खुश होतो .. मग बाबानी मध्येच एक घाट घातला .. तू कुणीतरी बाईमाणूस सोबत घेऊन जायचं .. आईने मावशीला आणि तिच्या मुलाला तयार केलं ... माझी त्यांच्याशी व्यवस्थित गट्टी असल्याने विरोधाचा प्रश्नच नव्हता ... झालं ठरलेल्या वेळेनुसार मी खांडेकराला ठाण्याहून उचललं आणि मावशी ठाणे स्टेशनालाच येणार असल्याने आम्ही तिची वाट पाहत होतो ..

तुम्हाला सांगू .. मावशी सकाळी ११ वाजता येणार होती ती आली दुपारी ३ वाजता .. खांडेकरांच्या नागाची संतापाने नुसती लाही लाही झाली होती .. तो जाम वैतागला होता .. एकतर मी नवीन मारुती ना आणता जुनी गाडी घेऊन आलो होतो .. इतक्या लांबचा प्रवास आणि तोसुद्धा इतक्या उशिरा ... झालं मी कसाबसा त्याला शांत केला आणि प्रवास सुरु झाला .. त्याने गाडी भर ट्रॅफिकमधून जोरात हाकायला सुरु केली ... माझ्यापण जीवाची घालमेल सुरु झाली ... मी त्याला दोन तीन वेळा बजावूनही सांगितलं कि बाबारे आपल्याला काहीही घाई नाही जरा दमाने घे ..

त्याने एका दुचाकीवाल्याला असे काही दाबले कि तो बिचारा पडला .. मावशीने सरळ हरिपाठ बाहेर काढला आणि वाचण्यास सुरुवात केली .. बहुधा तिला पुढे येणाऱ्या अनामिक संकटाची चाहूल लागली असावी .... गाडी १२५ च्या स्पीडने चालली होती .. मध्ये एकदा बैल गाडी डायरेक्ट आडवाटेने हायवेवर आली .. गाडी कशीबशी खांड्याने कंट्रोल केली .. पुढे जाऊन बघतो तर ट्रिपल सीट घेऊन एक फॅमिली मध्ये आली .. ती देखील कशीबशी वाचली .. मावशीने पूर्ण प्रवासादरम्यान श्वास रोखून फक्त एकाच प्रश्न विचारला .. तुझ्या कंपनीत हे विमान चालवतात का ? मी फक्त हसलो आतून जाम धास्तावलो होतो ...

कोलाडच्या अलीकडे एक गाव होत .. त्या गावात पलीकडे गावकरी मंडळी कुणाला तरी सोडायला आली होती .. ते दुचाकीस्वार आमच्या रस्त्याच्या पलीकडे होते आणि हात दाखवत दाखवत अचानक गाडीच्या मध्ये आले ... खांड्याने जोरदार करकचून ब्रेक मारला .. पण फार उशीर झाला होता .. लाईफमध्ये पहिल्यांदा याची देही याची डोळा एक भीषण अपघाताला सामोरा गेलो होतो.. तो बाइक वाला अक्षरशः आमच्या गाडीच्या पुढच्या काचेवर आदळून मागे फेकला गेला .. गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत हे खांड्याने लगेच सांगितले .. लोकांनी गाडीला वेढा घातला .. मी जरा बाजूला व्हा गाडी लावायची आहे म्हणून सांगितले .. त्यांना खरे वाटले आणि त्यांनी थोडी जागा दिली .. मी खांड्याला लगेच गाडी पळवायला सांगितली ... आणि मग एक भीषण पाठलाग सुरु झाला .. आम्ही पुढे कोलाडला जाऊन एका जागी विश्रांती घेतली .. मी खांड्याला सांगितले आता काळोख झाल्याशिवाय निघायचं नाही ... खंड्या आधीच घाबरलेला होता .. थरथर कापत होता .. मी त्याला शांत केले आणि धीर दिला ... मग त्याने मला एक सत्य सांगितलं .. तो म्हणाला डॉक्टरसाहेब कंपनीत सांगू नका .. पण मला अंधारात काहीच दिसत नाही .. आता मात्र मी पुरता धास्तावलो .. सालं ज्याच्या जीवावर ब्रेकफेल गाडी हाकायच ठरवलं तोच साला फुसका निघाला .. मावशीने परत मागे फिरण्याचा घोषा चालू केला .. मी चिडून सर्वाना शांत केलं ... मी मग नेहेमीप्रमाणे संकटसमयी माझी स्तोत्रे चालू केली ... खांड्याला मी थोडा संधिप्रकाश असताना जमेल तशी गाडी हळूहळू चालवायला सांगितली ... मला का कुणास ठाऊक कोणीतरी मागावर असणार याची पुरेपूर खात्री होती .. गावकऱ्यांचे अनुभव यापूर्वीही गाठीशी होते .. पण खांड्या मात्र एकदम निवांत होता .. जणू संकटातून साहेबानी व्यवस्थित बाहेर काढल्याप्रमाणे .. जे वाटत होत तेच काही क्षणात घडलं .. जवळ जवळ पंधरावीस दुचाकी स्वारांनी आम्हाला मध्येच गाठलं .. गाडी थांबवणं आता भागच होत .. मी खांड्याला आताच बसून राहण्यास सांगितले .. तीस ते पस्तीस लोकांनी आम्हाला खाली उतरायला सांगितलं .. खांड्याला बाहेर जाऊ नको सांगितलं तरी तो त्वेषाने बाहेर गेला .. बाहेर पडताक्षणी लोकांनी त्याला तुडवायला चालू केलं .. मग मात्र मी मध्ये पडलो .. मी जोरदार आवाज चढवून म्हणालो .. जर मांडवली करायची असेल तर हाणामारी चालणार नाही आणि खपवूनही घेतली जाणार नाही ... एकदम हुकमी डाव लागला होता .. माझं हे वाक्य तो जो काळा शर्ट घातलेला म्होरक्या होता त्याने बर्रोब्बर पकडलं आणि सर्वाना शांत केलं .. आमची मांडवली झाली ती अवघ्या १५०० रुपायामंध्ये .. चला सुटलो एकदाचे म्हणून आम्ही निघालो ... खंड्याने सरळ गाडी माझ्या हातात दिली आणि म्हणाला आजचे तारणहार तुम्हीच आहात तेव्हा आता जो आपण निर्णय घेतला आहे त्याला चिकटून बसा आणि गाडी व्यवस्थित किनार्याला लावा .. मी गाडी हातात घेतली .. ब्रेक नसल्याकारणाने मी कशीबशी हँडब्रेक वापरत वापरत चिपळूणला नेली ...

मावशीच्या जीवात जीव आला पण तिने घरी गेल्यावर जो गोंधळ घातला त्याला तोड नव्हती .. मी खांड्याला दुसर्या दिवशी गाडी नीट करून आणायला सांगितली .. माझा मामेभाऊ पण त्याच्या सोबत जाणार होता ... मी अमितला (मामेभावाला ) सांगितलं आता एवढ्या लांब आलोच आहे तर पद्मावती देवीचं उद्या दर्शन करून येईन म्हणतोय आणि असं पण गाडी दुरुस्त व्हायला वेळच लागणार आहे मग निवांत निघेन परतीला .. अमितने मुकदर्शक होकार दर्शविला .. मी त्याच्याकडे त्याची बाईक मागितली दर्शनाला जाण्यासाठी .. त्याने सांगितलं बाईक आजकाल जास्त चालवली नाही त्यामुळे नीट चेक करून घायवी लागेल मगच तू घेऊन जा ... मी सकाळी उठून निघणार एवढ्यात मावशी म्हणाली मी पण तुझ्यासोबत येतेय .. एकटा जाऊ नकोस .. मी जरा निराशपणेच तिला होकार दर्शविला ... तिलाही ते कळत होतं ...

झालं बाईक वर तिला घेऊन मी निघालो .. जाताना वाटेत खेर्डीमध्ये नारळ हार तुरे घेतले आणि निसर्गाचा रम्य अनुभव घेत निघालो .. थोड्याच वेळात कुंभार्ली घाट चालू झाला ... मस्त मस्त पक्ष्यांचे आवाज येत होते मध्येच मुंगुसाने दर्शन दिले ..माकडं तर चिक्कार होती ... कुंभार्ली घाट हे खरतर एक निसर्गरम्य ठिकाण आहे पण कोकणातून घाटावर जाण्याचा मार्ग असल्याने तिथे रहदारी फार कमी असते ... आम्ही पुढे पुढे जात होतो आणि अचानक बाईक पंक्चर झाली .. आता मात्र बिकट प्रसंग उभा ठाकला होता .. हातात पिशव्या आणि ती भली मोठी चढण ..मावशीने सरळ तोंडाचा पट्टाच चालू केला .. कुणाचं तोंड बघितलं आणि इथे आली ते कळत नाही .. निघाल्यापासून हि संकट आवासून उभी आहेत .. कुठे कोण गाडी ठोकतय तर कोण अडवतंय आणि कुत्र्यासारखं मारतंय आणि आता काय तर हे असं जंगलात येऊन माकडांच्या गराड्यात पडायचं ... मी मावशीला शांत बसायला सांगितलं .. मी तिला सांगितलं कि तू परत माघारी जा मिळेल त्या गाडीने आणि अमितला त्याची चारचाकी घेऊन पाठव .. तोपर्यंत मी हि गाडी ढकलत ढकलत वर निघून जातो .. बहुधा वरघाटमाथ्यावर कुणीतरी पंक्चर काढणारं मिळेल.. मावशी म्हणाली," हे बघ सिद्धी आपले दिवस काही योग्य जातायत असं वाटत नाही तेव्हा तू देवीला जाऊ नको हेच बरे " मी तात्पुरती मान हलवली ". बर्याच वेळाने एक गाडी थांबली आणि त्यात मी मावशीला बसवून दिली परतीसाठी .. मोबाईलला रेंजपान नव्हती नाहीतर तिथल्यातिथे सार मिटवून टाकलं असत .. असो ... मी परत वर चढू लागलो .. हळूहळू कसाबसा .. चढत होतो .. एवढ्यात पोटात काहीतरी गडबड असल्यासारखं वाटू लागलं .. आतामात्र खरेखुरे संकट आवासून उभे राहिले होते .. मी अक्षरशः स्तोत्रांचा मारा चालू केला .. कारण त्या घाटात बसायची काही सोयच नव्हती .. एका साईडला रस्ता तर दुसर्या साईडला खोल दरी.. मग मात्र मी तात्काळ मागे फिरायचा निर्णय घेतला .. लांबूनच देवीला पाया पडलो आणि खाली चिपळुणात जाण्यासाठी उताराचा रस्ता असल्याने गाडी ढकलण्याचा प्रश्नच नव्हता .. कशीबशी ती पंक्चर गाडी मी हळूहळू चालवत उतरवू लागलो .. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा कि पंक्चर गाडी चालवणं तेही उतारावर आणि अशा लक्षभेदी वेदनांमध्ये फार कठीण असत .. याची पुरेपूर जाणीव मला येत होती .. मी आपला मध्येच स्तोत्र पाठ आणि मध्येच देवाचा धाव करत करत मार्ग कापत होतो .. बऱ्यापैकी घाट उतरून आल्यावर एकाठिकाणी फार असह्य झाले इतके कि आता सर्व " संस्कार म्हशीच्या ह्याच्यात गेले म्हणून बाईक तिथेच रस्त्यावर टाकली आणि थेट खाली व्हालेत धावत सुटलो .. साल जे पण होईल आणि जे पण मिळेल त्यानेच धुवायचे ठरवले आणि बाजी मारायचीच.. "

खाली त्या निर्बीड झाडात मी आत घुसलो आणि बघतो तर काय ... तुम्हाला विश्वास बसणार नाय राव ... दोन चक्क पाण्याच्या बाटल्या .. त्याही भरलेल्या .. पुढे काय झाले असेल ते सांगायला नकोच ..

आता मला सांगा .. त्या निर्जन जागेत पाण्याच्या बाटल्या कुठून आल्या ? आल्या त्या आल्या पण योग्य वेळी माझ्याच कामाला कश्या आल्या ? बर्याच लोकांना हे सर्व पटणार नाही .. पण मी ह्या घटनेचा साक्षीदार आहे .. आणि अशी घटना कि जिथे आपले संस्कारपण काहीही करू शकत नाहीत .. ह्या अश्या संकटाचा मुकाबला करायचा असेल तर शेवटच्या टोकापर्यंत वाट पाहावी लागते आणि मग सारी लाज सोडून द्यावी लागते .. मी पण शेवटच्या टोकापर्यंत वाट पाहिली आणि अखेर बाईकाशीच सोडून दिली रस्त्यावर आडवी आणि थेट धावत सुटलो खाली ..

शेवट असा सुखाचा असेल तर त्या अमानवीय शक्तीला प्रणाम करणे आलेच .... त्या बाटल्या तिथे कश्या आल्या .. कुणीतरी ठेवून गेलं असेल ... इथे देवाचा काय संबंध ? असे कैक प्रश्न उठू शकतात .. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही .. पण मी मात्र यातून सहीसलामत बाहेर पडलो होतो आणि जे काही घडले ते माझ्यासाठी एकदम अपरिचित होते ..



Rate this content
Log in

More marathi story from siddheshwar patankar