The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Alka Deshmukh

Others

3  

Alka Deshmukh

Others

दान

दान

3 mins
448


डॉक्टर आले धावतपळत त्यांनी नचिकेत ला तपासलं नाडी हातात घेतली मग गळ्याला हात लावला नाकाजवळ हात ठेवून पाहिलं गळ्यातल्या स्टेथो छातीला लावला...एक निमिषभर आम्हा सर्वांकडे पाहिलं सगळ्यांचे श्वास थांबलेले होते ....त्यांचा शब्द जीवाचा कान करून ऐकण्यासाठी...

ही इज नो मोअर...सॉरी थोडा उशीर झालाय....

आणि मग एकच गोंधळ सगळ्यांचे हंबर्डे आणि आईंची किंकाळी....त्या भोवळ येऊन पडतांना पाहिलं होतं तीन .... तिचीही स्वतःची काहीच वेगळी अवस्था नव्हती...

सगळं ब्रम्हांड गरगर फिरतंय का आपल्या भोवती असं वाटून गेलं....पण...

फक्त एकच क्षण आणि मग तिने केबिनकडे जात असलेल्या डॉक्टरांची वाट अडवली काहीतरी बोलणं झालं दोघांत कुणाचंही लक्ष नव्हतं ...अचानक हालचाली सुरू झाल्या भराभर सगळ्या फॉर्मालिटीज पूर्ण झाल्या...

आणि डॉक्टरांनी बॉडी ऑपरेशन थिएटर परत मध्ये नेली पुढचेसगळे सोपस्कार पार पडल्या नंतर मृतदेह ताब्यात भेटला...

पुढले सगळे विधी झालेत नातेवाईकांनी भरलेल्या घरात हळहळ आणि फारच वेगळं वातावरण होतं 

काल सकाळी हसत खेळत ऑफिसमध्ये गेलेला नचिकेत असा परत आला होता सगळ्यांनाच खुप वाईट वाटत होतं ..

सृष्टीची तर सगळी दुनियाच विराणी झाली होती जेमतेम दोन वर्षे झालीत लग्नाला.... लहानग्या वेदांत ला घेवून शून्यात नजर लावून बसली होती...तिचे मन ह्रदय डोळे रडत होते..पण आत कुठेतरी एक समाधानही होतं त्याची शेवटची ईच्छा पूर्ण केल्याचं...

मागच्या महिन्यातच त्याच्या वाढदिवसाला दोघेच डिनर ला गेले तेंव्हा त्याने तिचा हातात हात घेवून ही ईच्छा बोलून दाखवली होती जणू पुढचं भविष्य कळलं होतं का त्याला...?त्या संध्याकाळी दिलेलं वचन पूर्ण केलं होतं तिनं...त्या सगळ्या आठवणींनी गलबलून आलं तिला ती हमसून हमसून रडत होती..सगळ्याजणी तिला समजावत होत्या दैवगती नशिबाचे खेळ बाई ...मन घट्ट कर आता या छोट्या जीवाला तुलाच बघायचं आहे आता ..!!

हळूहळू पाहुणे गेले सगळं घर रिकाम झालं आपापल्या कामात सगळे व्यस्त झाले घरी ती आणि सासूबाई त्या तर अजूनही दुःखातच होत्या...

तिचीही सुट्टी संपत आलेली...काय करावं ऑफिसमध्ये जावं की नको सोडून देऊ जॉब...?

तेवढ्यात पोस्टमन आला दोन पत्र होती...

एक तिच्या कंपनी कडून तिला जॉबवरून काढून टाकलं काहीही न सांगता जवळपास तीन आठवडे रजेवर होती म्हणून ...!

तर दुसऱ्या पत्रात नवीन नोकरीची ऑफर होती एक मोठया नावाजलेल्या कंपनीची 

तिने लेटर उघडलं वाचलं आजच इंटरव्ह्यू साठी बोलावलं होतं दोन वाजता ...साडे अकरा वाजलेले ...तिने निर्णय घेतला सासूबाईंना विचारलं त्या काहीच बोलल्या नाहीत.. .त्यांच्या कडे दुर्लक्ष करत तिनेपटापट सगळं आवरलं पर्स फाईल घेवून ती निघाली...!

लिफ्टने वर गेली सहाव्या मजल्यावर ऑफिस होतं ...आत गेली दुसरं कुणीही दिसलं नाही ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू साठी काही गर्दी वगैरे नव्हती शुकशुकाट होता ती बसली थोड्यावेळाने प्युन ने तिला आत बोलावलं म्हणून सांगितलं...धडधडत्या उराने आत पाऊल ठेवलं एक रुबाबदार सुंदर तरुण खुर्चीत पाठमोरा बसलेला...बसा भारदस्त आवाज आला ती थँक्स म्हणत बसली आणि गर्रकन खुर्चीवर फिरली ते डोळे पाहून झटकन उठून आश्चर्यचकित होऊन पाहू लागली...तिच्या डोळ्यातून अश्रु धारा वाहात होत्या....होय तिच्या नचिकेतचेच डोळे होते ते.... टपोरे बोलके हसरे...तिच्याकडे पूर्ण प्रेमळ भावनेने पाहणारे....तिला भोवळ येतेय का असे वाटले ती मटकन खुर्चीत बसली...होय तेच डोळे होते ते....

 आणि ओक्साबोक्शी रडायला लागली...!

तिला मनभरून रडू दिले त्याने मग खुर्चीतून उठून येऊन म्हणाला मी अनिकेत भोसले....या भोसले अँड भोसले कंपनीचा ओनर...आणि तो पुढे तिला अतिशय आपुलकीने  समजावत बोलू लागला...बरोबर ओळखलंत आपण, माझे डोळे ही तुमचीच देण आहे हा तुमचा उपकार आहे...त्या वेळी तुम्ही वेळेत डोनेट केलेले डोळे मला जीवनदान देऊन गेलेत...!!

नचिकेत नचिकेत म्हणत ...

न बोलता नुसते अश्रू झरत होते....!!


Rate this content
Log in

More marathi story from Alka Deshmukh