STORYMIRROR

santosh parulekar

Others

5.0  

santosh parulekar

Others

भ्रष्टाचार आणि आपण

भ्रष्टाचार आणि आपण

2 mins
3.2K


मी स्वतः कॉर्पोरेट ऑर्गनायझेशनमध्ये ऍनिमेशन डिपार्टमेंटमध्ये टीमलीडर म्हणून कार्यरत होतो तेव्हाची ही गोष्ट. येथे मी ईलार्निंग सॉफ्टवेअरवर काम करत होतो. ई-लर्निंग हे ध्वनी व चलचित्राचे सादरीकरण. या कामासाठी ध्वनी मुद्रण केले जाते. मी टीमलीडर असल्यामुळे script writer, voice artist व रेकॉर्डिंग स्टुडिओ यांच्याशी कोऑर्डिनेशन करावे लागे.

एके दिवशी मला दादरमधील एका स्टुडिओचा पार्टनर किंवा एम्प्लॉयी यांनी फोन केला व म्हणाला तुम्ही आमच्या स्टुडिओला रेकॉर्डिंगचे काम द्या आम्ही तुमचा विचार करू. अर्थात लाच देऊ केली. त्यांना त्यावेळी मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अजून project pipeline मध्ये आहे असे सांगत वेळ काढली.

परंतु ८-१० दिवसानंतर पुन्हा मला मोबाइलवर फोन आला व पुन्हा तेच बोलू लागला (लाच देण्याबद्दल). परंतु मी त्यांना

तुम्ही पैसे दिल्यानंतर मी कसा त्यांच्या ताटाखालचा मांजर होणार हे पटवून दिले. म्हणजेच साऊंडमध्ये करावी लागणारी तडजोड, त्यामुळे product quality घसरेल, साऊंड डिलिव्हरीच्या तारखा पाळल्या जाणार नाही. त्यामुळे प्रोजेक्ट लेट होऊन organization suffer होणार अर्थात त्याची झळ प्रत्येक कर्मचाऱ्याला होणार असे त्यांना पटवून दिले. या सगळ्या संभाषणानंतर त्यांनी मला दोन शब्द बोलून दाखवली “तुम्ही लोक जीवनात प्रगती करू शकणार नाही.” अर्थात त्यांनी कॉर्पोरेट भाषेत शिव्याच दिल्या व त्यानंतर कधीही फोन केला नाही.

या सर्व गोष्टीतून असा संदेश देतो की अशा लोभ दाखवणाऱ्या लोकांपासून दूर राहून आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे. कष्टाने आणि प्रामाणिकपणे मिळेल यामध्ये समाधान मानावे. यामुळे समाजात आणि नंतर देशात होणारा भ्रष्टाचार याला आळा बसेल.


Rate this content
Log in