भाषेचे महत्त्व
भाषेचे महत्त्व
" काय गं, दमली नाही की परदेशात जायचं म्हणून अंगात अधिकच जोर आलाय. किती आणि काय काय बनवायला घेतल तू." - असे संपतराव म्हणाले.
" नाही हो, माझ्या बाई गुढघ्यांना कसला आलाय जोर. जितकं जमते तितकं करायचं. पण या वेळेस आनंद फार होतोय." - त्यांची बायको, सुरेखा म्हणाली .
" का नाही मिळणार. या वेळेस छपंनभोग नातवंडांसाठी ! आता काही दिवस त्यांचाच लाड. आता आम्ही कोण बुवा ? नातवंडांपुढे कोण दिसतंय. साधा चहा नाही दिला कोणी . बसतो आता गुपचूप. बायको पुढे कोणाचं चालतय. " - संपतराव म्हणाले
" हा आता पुरे, मला इतके लाडू वळण्यात मदत करा मग मिळेल हो तुम्हाला बिन साखरेचा चहा " - सूरेखाबाई हसता हसता म्हणाल्या.
" बिन साखरेचा ?" , "हो कारण लाडू गोड आहेत. "
"पण मी कुठे लाडू खाल्ले ", " ते वळतांना बघू " आणि दोघे ही हसायला लागले .
अश्या गमती जमती करीत हे दाम्पत्य आपले आयुष्य सुखात जगत होती. आता त्यांच्या आनंदात आणखीनच भर पडणार होती. ते आपल्या नातवंडांना भेटायला अवघ्या एक वर्षांनी अमेरिकेला जाणार होते. त्याचीच ही तयारी.
संपतराव आणि सुरेखा यांचा एकुलता एक मुलगा, सुबोध अमेरिकेला स्थाईक झाला. त्याला एक मुलगी,ओवी आणि एक मुलगा,अंकुर असा संसार त्याने अमेरिकेत नटवला. तसे सुबोधचे आपल्या आई वडिलांवर अतोनात प्रेम. त्यानी ' अमेरिकेला राहायला चला ' असा आग्रह केला, नेहमी करीत आलाय पण संपतराव आणि सुरेखाचं आपल्या मातीतून पाय काही निघत नाही. सुबोध मातीशी जुळूनही नव विचारांना धरून ठेवणारा आहे पण ते दोघे काही परक्या देशात राहायला तयार नाहीत. त्यांचा श्वास आपल्या मातीतच, आपल्या लोकांमध्येच.
वर्षभरातून जात असतात अमेरिकेला. पण तिथचं त्यांना काही मानवत नाही. कसं मानवणार, सकाळी त्यांचा दिवस भक्तीगितांन पासून ते रात्री कुसुमाग्रजाच्या पुस्तकान वाचून होतो. मराठी बोलणारे, मराठी परिधान करणारे दिसे नासे झाले की 'दुसऱ्याच्या घरी परक्याचे धन ' असे अनुभूती होते .
अमेरिकेच्या तयारीत त्यांचे दिवस कसे गेले काही कळलंच नाही. शेवटी दिवस आला आणि ते निघाले. सुबोध आणि मंजिरी त्यांना घ्यायला एअरपोर्ट वर आले होते. मंजिरी फार गुणी, हुशार आणि मनमिळाऊ सून.
मंजिरी - " सुबोध, फ्लाईट लेट आहे का रे ? I am so excited to meet them. So happy ."
मंजिरी ला आईवडील नसल्याने ती सुबोधच्या आईवडीलांना फार जीव लाव्हायची. सासुसासऱ्यांचा देखील हाच स्वभाव.
सुबोध - " keep patience. They will come. See flight here ." इकडे तिकडे बघता बघता, मंजिरीला ते दोघे येतांना दिसतात.
मंजिरी - " ते बघ आले."
सुबोध त्यांना हात दाखवतो. संपतराव आणि सुरेखा जवळ येताच त्यांना मिठी मारतात आणि पाया पडायला जातात.
संपतराव - " अरे, व्हा ! अमेरिकेत देखील भारतीय संस्कार विसरला नाही याचा आनंद. सुखी रहा. "
सुरेखा -" हो, गुणाची आहेत माझी मुल. सुखी रहा. खूप मोठे व्हा."
सुबोध - "चला आता लवकर घरी, little monsters are waiting ."
मंजिरी - "correct , let's go."
चौघे गाडी मध्ये बसून घरी जातात. वाटेत मंजिरी- " काय आईबाबा किती दिवसांनी आले तुम्ही आणि आम्हाला अर्जी देऊन किती दिवस झाले? But you both are ignoring us. We also want your precious love."
संपतराव - " काय पोरी, सासुसासरे हवे म्हणते, रहा ना बिंधास्त. ' सासूविणा सून सुखी ' अस म्हणतात बर."
संपतराव हसायला लागले.
" तस बघितलं तर तुम्ही बरोबर बोलताय बाबा." मंजिरी हसून म्हणाली .
सुरेखा - " बघतोय ना सुबू, या बापलेकी सुरू झाले, मला छडायला."
सुबोध - " mom, they are just kidding. But no worries, I am always on your team.
सुरेखा - "that's like my good boy."
अश्या मज्जा मस्तीत घर आले . घरी पोहचताच, सुबोध -
" Hey kiddos, look who is here."
ओवी आणि अंकुर - "yeah, आजी, आजोबा . Welcome.we are waiting for you, for around 1 hour. Why are you so late ? We are not talking to you."
सुरेखा - अग बाई कोणी तरी रुसले वाटते. बर मग मी आणलेला लाडवाचा डब्बा शेजारी देऊन येते .
"No." - मुले ओरडली आणि धावत आजीच्या कुशीत शिरली.
ओवी - " Aaji, ladu are so delicious. I love it. I love you."
" सगळ आजीच काय, आजोबा कुठे गेले" - संपतराव म्हणाले .
ओवी - "आजोबा, you are my hero . My story teller. I want to hear some stories."
आजोबा - "बर बाबा, आता नाही ह. रात्री सांगेन. जा पळा खेळायला."
ओवी - "okay Aajoba, come on ankur, let's play. Aajoba, You also come na . We will have fun."
अंकुर - " Aajoba, yes. I want to show you something. I have so many toys. Cartoon comics. I want to show you. Come with me."
संपतराव विचारात पडले. लगेच सुरेखा - " अहो जा ना त्यांच्या बरोबर . ते असे काही थांबणार नाही."
काहीच प्रतिसाद आला नाही म्हणून सुरेखा मोठ्या आवाजात म्हणाली - " अहो, जा ना , कसला विचार करीत आहात."
संपतराव अचानक जागे झाले. " हो हो येतो. चला "
मुलांबरोबर खेळता खेळता दिवस कसा निघून गेला ते त्यांचं त्यांना समजल नाही. रात्री जेवण झालं, जेवतानाही मस्त गप्पा रंगल्या.
सुबोध - " okay baba, तुम्ही शतपावली करायला जाताय ना तो पर्यंत आम्ही आमचे ऑफिस चे काम पूर्ण करू. ओवी - "Dady, what is meant by शतपावली ? मंजिरी - "Baby, it means, walk after dinner.
अंकुर - " so I also want that शतपाली."
सगळे हसायला लागतात.
सुरेखा - " बेटा, शतपाली नसते ते शतपावली असते. शत म्हणजे शंबर आणि पावली म्हणजे पाऊल. शंबर पावले चालायची. यामुळे आपली प्रकृती एकदम ठा होते.
ओवी - "I want to come."
मंजिरी - "No. All day, you both are playing. Now you have to complete your homework.
Go to your room and finish it .
मुले नाराज होऊन ,
अंकुर - "ohk. mommy."
संपतराव काही ही न बोलता शतपवलीस निघाले.
सुरेखा - " अहो, थांबा आले मी . काय हो, कसला विचार करताय तुम्ही. मगास पासून बघतेय. तुमचे मन जरा विचलित आहे ."
संपतराव - "आपली मुलं, कदाचित परदेशी झाली."
सुरेखा -" नाही हो. असं का बोलताय तुम्ही?"
संपतराव - " आल्यापासून बघतोय, ते फक्त इंग्रजीतूनच संभाषण करताय. ओवी, अंकुर यांना मराठी काय, मायबोली काय याची जरा ही कल्पना नाही. मंजिरी, सुबोध देखील त्यांच्या बरोबर इंग्रजीतूनच बोलतात, रागावतात.
महाराज कोण, महाराज काय होते, त्यांनी आपल्यासाठी काय केलंय ते त्यांना समजायला हवं आणि ही जबाबदारी सुबोध आणि मंजिरीची आहे. पण ते ही कदाचित आपले संस्कार, आपली मायबोली विसरू लागले आहेत. असच सुरू राहील तर मग त्यांच्यातून मराठी, महाराष्ट्र, आपला देश नाहीसा होईल. आपली माती त्यांच्या पायातून घसरून जाईल. मी तर नेहमी सगळ्यांना सांगत आलोय मराठी चे महत्त्व. आज आपल्याच मुलांना शिवण्याची गरज आहे. त्यांच्यातली मराठी मशाल पेटवायची वेळ आली आहे .
सुरेखा - " अगदी बरोबर बोलत आहात तुम्ही. माझ्या लक्षातच आले नाही. माझे ही चुकले. आपण त्यांना उद्या तस समजावून सांगू. "
संपतराव - " उद्या तशी मुलांनी सुट्टी टाकली आहे. सुरेखा, अमेरिका दर्शन राहूदे बाजूला .उद्या आपण महाराष्ट्र, भारत देशच फिरू .
सुरेखा - " आले माझ्या लक्षात तुम्हाला काय म्हणायचे ते."
स्मित हास्य देऊन दोघे घरी गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे बसले असतांना अचानक संपतरावांनी मराठी गीत लावले .
" लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
"या बसा सगळे. आज सूबोधच्या लहानपणाची गंमत बघुया."
संपतराव, टीव्ही वर मोबाईल कनेक्ट करतात. त्यात सुबोध, आई आणि बाबा सोबतच महराजांचे किल्ले यांच्या आठवणी असतात. त्यात बाबा, छोट्या सुबोधला महाराजांचे धाडसी कथा सांगतात, महत्व सांगतात, मराठी गीते शिकवितात आणि खूप काही. सगळे शांत बसून ऐकतात. ओवी, अंकुरला ही उसुक्ता लागते, महाराजांबद्दल, आपल्या मराठी भाषेबद्दल, महाराष्ट्राबद्दल .
सगळ बघून झालं की सुबोध म्हणतो, " बाबा किती छान आठवणी जपून ठेवलाय तुम्ही. पण आज अचानक का हे सगळ आम्हाला दाखवलं ?"
संपतराव - " सांगतो सगळ सांगतो. सुबोध, मंजिरी तुम्ही पालक म्हणून चुकताय. अरे तुम्हीच मराठी भाषेला विसरला तर या पिल्लांना काय कळणार? ते कशे शिकतील मराठी, महाराजांचे गुण त्यांच्या अंगी कसे काय बसणार? आल्यापासून बघतोय तुम्ही फक्त इंग्रजीतूनच बोलत आहात. मुल ही आपल्या मोठ्यांनाच बघून शिकतात. कोणतीही भाषा ही बोलण्याची साधन असते पण आपली मराठी ही आपल्यासाठी केवळ भाषा नाही, ती अभिमान आहे, संस्कार आहे. इंग्रजी तर ते शाळेत, परिसरात शिकतीलच पण आपली मायबोली ते परदेशी राहून कसे काय शिकतील. याची जाणीव तुम्हाला करून द्यायला मी हे आज इथे दाखवले."
"अरे बाळांनो, आपण महाराजांच्या जन्मभूमिवर राहणारे माणस. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मराठी भाषा जिवंत ठेवण्यात जे योगदान दिले ते असे विसरून चालणार नाही. महाराजांमुळे आपले महाराष्ट्र, आपली मराठी आजवर टिकून आहे आणि ती यापुढे ही टिकून राहावी म्हणून आपणच प्रयत्न करावे. पुढच्या पिठीला त्याचे महत्व समजावून सांगणे हे आपले काम आहे."
" मराठी भाषा लवचिक आणि प्रचंड शक्तिशाली आहे . आपण तर परदेशात ही तिची प्रसिद्धी करायला हवी. इतर लोकांना ही कळू दे की मराठी ही ममतेच सागर आहे, ज्ञानगंगा आहे. "
मंजिरी - " बाबा, चुकलो आम्ही. आम्हाला माफ करा. आता या पुढे अस करणार नाही. आम्ही घरी असताना मराठीच बोलू आणि लेकरांना ही शिकवू. "
सुबोध - " अगदी बरोबर बोलली मंजिरी. मी ही एक निर्णय घेतला. आपण दर वर्षी एकदा तरी आपल्या मातीत जायचं आणि आपली संस्कृती अनुभवायची. ओवी,अंकुर तुम्ही तयार आहात?"
ओवी - " हो बाबा . मला तयार आहे."
सुरेखा - "मला नाही, मी तयार आहे ."
अंकुर - " मी मी."
अंकुर - "आजोबा, महाराजांची गोष्ट सांगा."
सुरेखा - "माझ्याकडे एक उपाय आहे. सुचवू का ?"
सगळेच - " हो"
सुरेखा - " रात्री जेवण झालं की आम्ही व्हिडिओ कॉलवर लेकरांना नवीन नवीन गोष्टी सांगू . मराठी शिकवू, महाराजबद्दल कथा ऐकवू."
ओवी - " मला चालेल. "
अंकुर - yeah !
संपतराव - " ठरल तर मग. आज पासून एकच मोहीम मराठीला जागवू, जग भर पसरवू."
असे बोलून ते आपल्या आपल्या कामाला लागले. भारतात परत आल्यावर त्यांनी ठरल्या प्रमाणे रोज एक गोष्ट सांगण्यास सुरवात केली. तिकडे मुल हळू हळू शिकू लागले. मंजिरी, सुबोध ने आपल्या ऑफिस मध्ये आईबाबाची ही कल्पना सांगितली. तर इतर भारतीयांना ही कल्पंना फार आवडली. ते ही बोलू लागले, आमच्या मुलांनाही व्हिडिओ कॉल जॉईन करू द्या असा आग्रह धरला. करता करता आज असे अमेरिकेतली 26 मुले मराठी शिकू लागली. कदाचित हेच एक पाऊल नवीन पिढीला मायबोली भाग्य लाभण्याचे कारण ठरेल आणि आपली मराठी ही आमरण जिवंत राहील महाराजांच्या इच्छे प्रमाणे.
