Atul Girkar

Others

3  

Atul Girkar

Others

बायको वरच प्रेम

बायको वरच प्रेम

2 mins
854


बायकोवरच प्रेम म्हणजे नक्की काय??


सकाळी सकाळी तिच्या घाई गडबडीत मदत म्हणून डब्यातल्या पोळ्या त्यानं स्वतः भरताना त्याच्या हाताला लागलेला चटका, अन तिनं त्यावर मारलेली फुंकर अन ते पाहून हळवा झालेला तो म्हणजे सुद्धा प्रेम।।


घरातले पाहुणे मंडळी गेल्यावर तो सुद्धा थकला असताना हि तिला आवराआवर करू लागण म्हणजे सुद्धा प्रेम ।।


ती आजारी असताना आज मस्त खिचडी भात खाऊया म्हणन.अन जेवल्यावर पानं स्वता उचलून बेसीन मध्ये ठेवणं, पाण्याच्या बॉटल भरन म्हणजे सुद्धा प्रेम।


दुपारी ऑफिस मध्ये मित्रांमध्ये जेवताना

ती जेवली असेल का म्हणून तिला फोन करूनच नंतर त्यानं जेवण म्हणजे सुद्धा प्रेम ।।


संध्याकाळी येताना गिरणीतल दळण घेऊन येणं. भाजी काय आणू का? अस तिला फोन करून विचारणं म्हणजे सुद्धा प्रेमच ।


सुट्टीच्या दिवशी आज तुला सुट्टी म्हणत

ती उठायच्या आत दाराबाहेरचा सकाळचा पेपर,दूध स्वता घेणं,अन तिच्या साठी चहा बनवणं म्हणजे सुद्धा प्रेम ।।


संध्याकाळी बाहेर पडल्यावर गर्दीत तिचा हात त्याच्या हातात अजूनच घट्ट होणं म्हणजे सुद्धा प्रेमच ।।


उशीर झाल्यावर ती जेवायला थांबली असताना पहिला घास तिला भरवन म्हणजे सुद्धा प्रेमच ।।


ती धडपडल्यावर तिला ओरडून स्वतः हळवं होणं म्हणजे सुद्धा प्रेम ।।


ती वैतागलेली असताना शांत राहणं,अन ती रडवेली झाली कि सगळा राग विसरून तिला मिठीत घेणं म्हणजे सुद्धा प्रेम ।।


वयाच्या पन्नासाव्या वर्षीसुद्धा तिच्या गोळ्यांची वेळ जपणं,अन ती झोपल्यावर तीच पांघरून सावरून नंतरच त्यानं झोपणं म्हणजे सुद्धा प्रेम ।।


प्रत्येकवेळी बोलून दाखवल्यावरच प्रेम सिद्ध होत अस नाहीये न. प्रेमाच्या पलीकडे असते ती काळजी,माया.

बायको तर असतेच महान जी निःस्वार्थपणे आयुष्यभर त्याची साथ देते.

 पण नवरा म्हणजे तिच्या आयुष्यातला तो ऑक्सिजन आहे जो तिच्या सोबत असतो आयुष्याच्या शेवटापर्यंत।। 


Rate this content
Log in