STORYMIRROR

Sarika Sarkale

Others

2  

Sarika Sarkale

Others

बालपणीच्या आठवणी

बालपणीच्या आठवणी

1 min
165

सुखद काळ म्हणजे बालपण होय.


बालपणीचा काळ सुखाचा

पडे विसर साऱ्या दुःखाचा

ठाव न लागे मनाचा

असे प्रत्येक क्षण आनंदाचा


         खरंच बालपणीच्या आठवणी किती सुखद असतात. ना कशाची चिंता ना काही भिती वाटते आपल्याला हवे ते करता येते. तेव्हा कोणतेच बंधन नसते. जणू सर्वांचे लाडके आपणच असतो.बालपण केवळ खेळणे बागडणे स्वच्छंदी जगणे असते. कोणतेही जबाबदारीचे ओझे नसते.


           बालपणी खूप लाड कौतुक केले जाते.जणू आपण बालपणी सर्वांच्या गळ्यातील ताईत असतो. जरा जरी आपण नजरेआड झालो तरी सर्वजण काळजी करतात. आज बालपण आठवले तर बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.बालपणी प्रत्येक क्षण आनंदाचा असतो. दुःख, निराशा,स्पर्धा,ईर्ष्या जणू या संकल्पना माहितच नसतात.बालपण हे सुंदर,निरागस असते. म्हणून आजही महणावे वाटते,


बालपण पुन्हा मिळावे

नव्याने एकदा जगावे

बालपणीचे सुंदर दिवस

देवाकडे परत मागावे...


Rate this content
Log in