बालपणाची तपश्चर्या
बालपणाची तपश्चर्या

1 min

3.6K
जन्मतःच तोंडात चांदी-सोन्याचा चमचा असलेले अतिपुण्यशील महाभाग सोडले तर मानवाला बालपण, तरुणपण ओलांडताना सुखापेक्षा दुःख आणि संकटे ह्यांचाच सामना अधिक करावा लागतो. शिक्षण संपादन हा तोंडाचा खेळ नव्हे, क्षणोक्षणी बदलणारे शैक्षणिक धोरण, शिक्षण खात्यातील असंख्य भानगडी आणि घोटाळे, शिक्षणासाठी लागणार प्रचंड खर्च आणि यासाठी करावी लागणारी पळापळ इत्यादी कारणांमुळे चालू युगातील बालपणीची खऱ्या अर्थाने तपश्चर्या होते.