Prajakta Rudrawar

Others

3  

Prajakta Rudrawar

Others

अवघा रंग एकच झाला

अवघा रंग एकच झाला

4 mins
951


"मम्मा...मला पण लिपस्टिक लावायची.. टिकली पण..."छोट्या सलोनीचा हट्ट सुरु होता.नेहमी साध्या सिंपल रहाणारया वंदनाला आज लिपस्टिक लावताना पाहुन सलोनीला पण सगळं हवं होत.वंदनाने हसत तिच्या हातात टिकल्यांचे पाकिट दिले.रंगीबेरंगी टिकल्या पहाताच सलोनीचे डोळे मस्त चकाकले.तिचे ते रुप डोळ्यात साठवताना वंदनाला भुतकाळ आठवला...


आँफिसमधुन घरी येताना नेमकी गाडी बिघडली.बरेचदा किक मारुनही गाडी सुरु होत नव्हती.घर जवळ होतं तरी गाडी ओढत नेणं शक्य नव्हतं.हलक्या पावसाच्या सरी सुरु असल्यामुळे वंदनाची त्रेधा उडत होती.गाडी बाजुला घेऊन काही मदत मिळेल का पहात असताना मागुन आवाज आला,"मी काही मदत करु शकतो का?...".

तिने मागे वळुन पाहिले तर तिच्याच वयाचा एकजण विचारत होता.ती मानेनेच हो म्हणत बाजुला सरकली.त्याने दोन तीनदा किक मारली आणि गाडी सुरु झाली.लहान मुलीसारखा तिच्या चेहरयावर आनंद दिसत होता.

"थँक्यु..."म्हणत तिने त्याच्याकडे बघुन स्मितहास्य केले.त्याने डोळ्यांनीच वेलकम म्हंटले व तो निघाला.ती पण आधीच उशीर झालाय म्हणत घराच्या दिशेने निघाली.

दुसरयादिवशी सकाळी गाडी सुरु करताना तिला कालच्या प्रसंगाची आठवण आली.अन तो आठवुन गेला.नाव नाही गाव नाही माहीत पण वेळेवर कामी आला असे स्वत:शीच म्हणत तिने गाडी सुरु केली.आँफिसमधुन येताना लिफ्टमधे नेमका तो दिसला.तिला आश्चर्य वाटले हा इथे कसा.त्याने ओळखीने स्माईल दिली म्हणुन ती पण हसली.घरी आल्यावर समोरच्या टेरेसवर त्याला पाहिल्यावर तिला आठवले की मागच्याच आठवड्यात समोर कोणीतरी रहायला आलेत म्हणाल्या होत्या मावशी.

आज सुट्टी म्हणुन बागकाम काढुन बसली होती ती.नेमकी त्याला समोरच्या टेरेसवर ती दिसली.एकदम साधी रहाणीमान होते तिचे.गळ्यात चेन सारखे काही तरी,कानात नाजुकसे डुल,एका हातात बांगडी,छोटीशी काळपट टिकली असा साधा पेहराव होता.लिपस्टिक काजळ काहीही नाही तरीही खुपच आकर्षक दिसत होती ती.तो आपल्याकडे बघतोय हे तिला माहिती नव्हते.

सोसायटीतील कार्यक्रमामधे,कधी वाँकिंगला, तशी नजरभेट होत असे. कुठेतरी स्वत:त स्वत:ला गुरफटुन घेतलेली ती समोरासमोर दिसल्यास स्माईल देत असे.पण संवाद असा कधी घडला नव्हता.

आज सोसायटीच्या महिलांनी हळदी कुंकु करायचे ठरवले होते वाटत.तो आँफिसमधुन आला तेव्हा खाली सुरु असलेली लगबग त्याला दिसली. नेमकी ती पण तेव्हाच घरी येत होती.खाली लाँबीमधे सगळ्याजणी एकमेकींना हळदी कुंकु लावत होत्या.गप्पा गोंधळ बायकांचे हसण्याचे आवाज येत होते.

"अगं वंदना ये ना..."कोणीतरी आवाज दिला.

"नाही गं...तिला कसे काय घेता येणार हळदी कुंकु..."पटकन कोणीतरी म्हणलं.

आपण काही ऐकलंच नाही असं दाखवत ती आत निघुन गेली व तिने लिफ्ट काँल केली.पण लिफ्ट सुरु झाल्या बरोबर आपल्या डोळ्यातले पाणी ती काही लपवु शकली नाही.लिफ्टमधे दोघेच होते.त्यान खिशातुने रुमाल काढुन समोर देताच तिने तो घेतला व डोळे पुसले.तेवढ्यात त्यांचा सहावा मजला आल्यामुळे दोघेही लिफ्टमधुन बाहेर आले.तिने थँक्यु म्हणले.तेवढ्यात तो म्हणाला,"काँफी घेऊयात...छान बनवतो मी..."

ती हसली व म्हणाली,"मी पण छान बनवते हा..."

"पण माझ्या हातची सर येणार नाही बघा..."तिला हसलेली पाहुन तो म्हणाला.

"बघुयात कोण छान बनवतं..."असं म्हणत तिने घराचं लाँक उघडलं.त्याला बसा म्हणत ती पाणी आणायला आत गेली.तिने घर खुपच छान आकर्षक पद्धतीने सजवलं होत.प्रत्येक वस्तुमधे तिची कलात्मक नजर दिसत होती.बाजुच्या मोकळ्या भिंतीवर एका तरुण माणसाचा हार घातलेला फोटो लावला होता.

"राजीव...माझा नवरा...सैन्यात होता...दोन वर्षांपुर्वी सीमेवर लढाईत शहिद झाला..."हे सांगताना तिच्या डोळ्यातुन पाण्याच्या धारा वहात होत्या.त्याला गलबलुन आलं.

"साँरी..."तो म्हणाला.

"इट्स ओके...सवय झालिये आता...अश्रुच येत नाहीत आता...जरा हळदी कुंकुचे ऐकुन वाईट वाटले...आज राजीव असता तर मीही मस्त तयार होऊन गेले असते असं वाटुन गेलं...चुक आहे असं वाटणं,मला माहितं आहे..."ती खाली नजर ठेवुन म्हणाली.

"नाही..काही चुक नाहिये असं वाटण्यात..."तो पटकन बोलुन गेला.

"अहो तीन वर्षांच्या मुलीची विधवा आई आहे मी...असं वाटता कामा नये..."हे बोलताना तिचे डोळे भरुन येत होते.त्याला गलबलुन आलं.कसाबसा आवंढा गिळत त्याने तिचे डोळे पुसले व तो दार उघडुन तसाच निघुन गेला.तिला खुपच आश्चर्य वाटलं त्याच्या ह्या वागण्याचं.पण काय म्हणुन विचारणार त्याला आपण असा का वागलास म्हणत ती गप्प बसली.

दुसरया दिवशीआँफिस मधुन घरी आल्यावर दारावर एक चिठ्ठी लावलेली दिसली तिला.

"वंदना...

तुला आश्चर्य वाटले असेल किंवा रागही आला असेल मी काल असा तुझ्याशी न बोलता निघुन आलो त्याचा.त्याबद्दल आधी मी माफी मागतो.साँरी...काय माहिती तुझ्या डोळ्यातला तो एकटेपणा बघुन खुप वाईट वाटलं.कुठेतरी हेल्पलेस फिल झालं.कालपासुन सगळा विचार करुन पाहिल्यावर कळलं की का असं झालं तर मी प्रथमदर्शनी तुला पहाता तुझ्या प्रेमात पडलो आहे.पण ते बोलायला,व्यक्त करायला,एकमेकांना जाणुन घ्यायला वेळ मिळाला नाही आणि अचानक कालचा हा प्रसंग घडला.तुझ्या भुतकाळाबद्दल मला काहीच माहीती नव्हतं.पण आज तु जशी आहेस तशीच मला हवी आहेस.आपल्या छोट्या बाळासह आपण जोडीने संसार करुयात.

तुझ्यासाठी हे सगळं अचानक आहे.त्यामुळे वेळ घेऊन सांग.सोबत माझी सगळी सविस्तर माहिती पाठवत आहे.

आजपर्यंत रंगाला मी विशेष महत्व देत नव्हतो पण कालच्या हळदी कुंकवाच्या प्रसंगातुन कळले की काळ्या,लाल रंगाच स्त्रीच्या आयुष्यात काय महत्व आहे.माझ्या नावाच कुंकु लावशील का तु??.."

सदैव तुझ्या उत्तराच्या अपेक्षेत...

-समीर

वंदनाला आपण काय वाचतोय हे क्षणभर कळलंच नाही.डबडबत्या डोळ्यांनी समोरचे अक्षर दिसत नव्हते.

हे सगळे आठवताना आजही तिचे डोळे भरुन आले.पण तेवढ्यात आरशातुन आपल्या मागे उभा राहुन तिच्याकडे एकटक बघणारा समीर तिला दिसला.लाल टिकली,भांगात कुंकु,लिपस्टिक,काजळ लावुन अजुनच सुंदर दिसणारया वंदनाकडे बघत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

तेवढ्यात "पप्पा...आता माझी पण पप्पी घ्या ना..."म्हणत सलोनी कधी त्याच्याजवळ उभी येऊन ठेपली दोघांनाही कळले नाही.वंदनाला एकदम लाजल्यासारखे झाले.समीरने हसत,"ये ग माझी राणी.." म्हणत सलोनीला उचलुन कडेवर घेतले व तिच्या गालावर ओठ टेकले.त्यांच्याकडे बघत वंदनाला वाटले,अवघा रंग एकच झाला....Rate this content
Log in

More marathi story from Prajakta Rudrawar