अशी पाखरे येती...
अशी पाखरे येती...
काही दिवसांपूर्वीची गोष्ट रात्रीचे साडेनऊ वाजले होते मी आणि माझे पती जेवण झाल्यानंतर आमच्या बागेत नुकतच येऊन बसलो होतो वातावरण अगदी स्वच्छ थंड आणि रम्य असे होते तेवढ्यात चार पाच मुले आमच्या घराच्या दिशेने येताना दिसले तेव्हा नुकतेच गणपती बसले होते गणपती उत्सवाचे आरास जोरात चालली होती आम्हाला वाटलं मुले गणेशोत्सवाचे आहेत मंडळाचे आहेत परंतु ती मुले मंडळाचे नव्हती आमचे बागेचे गेट उघडून सरळ उभयतां कडे आले आणि त्यातील एक मुलगा पुढे आला सडपातळ असलेला उंचीने जरा बुटका सावळा तो तो माझ्या पतीला एकदमच म्हणाला. काका आम्हाला एक ब्याटन पट्टी तयार करून हवी आहे . .आमचे कपडे अडकविण्यासाठी किती खर्च येईल.
कारण आम्ही सुतार, माझ्या पतीने त्याला पन्नास रुपये खर्च सांगितला पट्टी तयार करून घरात फिटिंग करून देण्याचा . दुसरी मुले चार बाजूलाच उभी होती. तेवढ्यात मी म्हटलं, मुलांनो या रे बाळांनो, तुम्ही कुठे राहता तुमचं गाव कोणतं ? तुमचं नाव काय? मुले घरंदाज घराण्यातली दिसत होती. कारण ओळख नसतानाही त्या मुलाने त्यांना काका म्हणून गोड आवाजात हाक मारली. सुसंस्कृत घराण्यातील मुलं दिसत होती माझा त्यातल्यात्यात बोलका स्वभाव. कोणी आमच्या घरी आले की त्याच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारून पाच ते दहा मिनिटात त्याची कुळाची माहिती काढायची सवय माझी. मी त्या मुलांना बाहेरच्या बागेतील ओट्यावर बसायला सांगितलं . पाची मुले बसले मी त्यांना नावे विचारले. त्यातील एक मुलाने पाच जणांची नावे सांगून ओळख करून दिली. जो ओळख करून देत होता तो उमेश सु यश यश आणि राजेश नावे ऐकून जरा वेगळेच वाटले नंतर मी विचारलं तुम्ही कुठे राहता? त्यांनी सांगितले की तुमच्याच शेजारच्या पुढील बंगल्यात काय करता बाळांनो? मी. त्यावर यश म्हणाला आम्ही कॉलेजात शिकत आहे. मी पुढचा प्रश्न विचारणार तोवरच त्यांनी त्यांच्या गावाचं नाव हे सांगितलं शिंगणापूर. गप्प बसायचं ते मी पुढचा प्रश्न केला जेवण झालं का.? कुठे मेस आहे की हाताने स्वयंपाक बनवता?
नाही आतातरी हातानेच बनवतोय. आम्हाला मेस हवी आहे. मग मी पुढचा महत्वाचा प्रश्न केला. किती पर्यंत तुम्ही पैसे देऊ शकता? त्यांनी पटकन सांगितलं महिना पाचशे.
. कारण आमच्या एका कुटुंबाला मेस चालवण्या ची गरज होती त्यांची परिस्थिती फारच नाजूक .त्यामुळे चलन चालू होण्यासाठी त्यांनी मेस चा निर्णय घेतला होता. आणि मुलांनाही चांगल्या मेसची गरज होती मग मी त्यां विद्यार्थ्यांना मे स पत्ता दिला. अर्ध्या तासात या मुलां ची आणि आम्हा उभयतांची जवळीक वाढली त्या मुलांना नंतर मी चहा केला मी म्हटलं बर बर येत जा वरचेवर मंग उमेश म्हणाला हा मावशी येत जाऊ आम्ही तेवढ्यात मुले जाण्यासाठी गेटउघडू लागले
तेवढ्यात मी महत्त्वाचा प्रश्न केला अरे उमेश तुम्ही कितवी येथेच शिकत आहात उमेश ने हसून सांगितलं मावशी मी 14 वित्त यश बारावीत, राजेश बारावीत, रमेश पंधरावित त्याला वाटलं असं समजून सांगितल्यावर मावशीला कळेल तेवढ्यात उमेश यांना आणि मला म्हनाला मावशी काका गुड नाईट.
नंतर आम्ही घरात येऊन झोपी गेलो. दुसरा दिवस उजाडला मी यांना म्हणलं पोरं फारच गुणी दिसतायेत हे म्हणाले की मुलं प्रेमळ आहेत. अर्ध्या तासात मुलांनी आपल्याला मावशी काका म्हणून अतूट नातं जोडलं. ते अनमोल नातं मायन मावशी म्हणल्यावर तसं माझंही काळीज मायेन त्या कोमल हाके न पाझरल होतं. तेवढ्यात उमेश आमच्या दारात उभा दिसला मी म्हटलं का रे उमेश गुड मॉर्निंग.
. गुड मॉर्निंग मावशी जरा पाणी हवं होतं नुकतच आमच्या नळाला पाणी सुटलं होतं .उमेश ने आमच्या येथून पाणी नेलं .असं करत करत ते मुलं आमच्यात रोज बसायला अभ्यासाला येऊ लागली. माझा मुलगा आठवीत सर्वजण आमच्या बाहेरच्या खोलीत मिळून अभ्यास करत. माझे थोरली मुलगीही बारावीत असल्यामुळे त्यांच्याबरोबरच खूप अभ्यास करू लागली मुलांच्या खोलीवर वेळेवर लाइट नसायची मुलांची गैरसोय व्हायची ते आम्हाला पाहवत नव्हतं मुलांचा अभ्यास होत नव्हता. थंडीच्या कडाक्यात ही मुले नदीवर आंघोळ करायला जात ते समजल्यावर मला खूपच वाईट वाटू लागलं कारण माझे मुले सकाळी थंडीमुळे बाहेरही पडत नसत आणि हीमुले नदीवरून आंघोळी करून येऊन धून ही स्वतः धून आनत .नंतर मी त्या मुलांना आमच्या हितरवर पाणी तापवून देई आणि मुले आंघोळी करून घेत
हळूहळू आमचा नि या मुलांमधील मायेचा जिव्हाळा खूप वाढला ईत का की मुले आम्हाला सोडून जेवण देखील करत नसत जेथे मे स होती तेथून मुले पेपर मध्ये पोळ्या आणि एका जर्मनच्या पातेल्यात भाजी आमच्या घरी आणून आम्ही सर्वजण एकत्र आनंदात जेवण करीत मीही मुलांना एकही घास टाकून खात नव्हते माझा मुलांमध्ये जीव गुंतला होता .एका मातेचे प्रेम गुंतलं होतं. मी त्यांना माझ्या स्वतःच्या मुलांप्रमाणे पाहिलं होतं ज्या क्षणी ते मुलं मला मावशी म्हणाले तेव्हाच नंतर मी त्या मुलांना त्यांची कपडे धुऊन देत नसे तर मी स्वतः त्यांची कपडे धो उन टाकीत असे ही सर्व कामे करताना मला खूप त्रास व्हायचा परंतु मी माझ्याकडून ही सर्व कामे जबरदस्तीने करून घेई. यात वेगळाच आनंद मिळत असे नंतर ती मुले आमच्या सुखदुःखात भागीदार झाली. परंतु नंतर नंतर समाज जरा वाकड्या नजरेने पाहू लागला
समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो व्यक्ती तितक्या प्रकृती मला टो चन बोलण्याचा समाजाचा दृष्टीकोण काय तर हे तरूण मुले ह्याच्या घरात कशी काय गल्लीत चर्चेचा विषय रंगू लागला त्यांच्या घरात हे तरुण मुले सारखेच येतात रात्रीच पन. ऐकताना मला मनाला खूप वेदना होत होत्या. ते गलिच्छ शब्द ऐकताना काळीज तुट तूट तुटायच. आमच्या घराकडे लोक वेगळ्याच नजरेने पाहत एवढेच काय तर आमच्या गावात काही माणसांनी त्या मुलांना अंगावर धावून जाऊन त्यांच्या गचून द्याला धरले काय हा वेडेपणा .आपल्या गावात खेड्यातून शिकायला आलेल्या मुलांना मदत करायची सोडून त्यांच्याशी असा व्यवहार .उद्या आमची ही मुले शिक्षणानिमित्त बाहेरगावी जाणारच ना.
त्यांनाही प्रेम मिळावे म्हणून आम्ही त्या मुलांची व्यथा जाणून घेत .मी समाजाकडे दुर्लक्ष केले मी मुलांना मावशीच म्हणजे एका पवित्र आईचं प्रेम दिलं .माझ्या पतीने वडिलांचे प्रेम दिलं समाजाला काही गोष्टी खटकतात ते मान्य आहे .परंतु त्या गोष्टी चांगल्या असल्या तरी देखील? नाही नाही समाजाने हा दृष्टिकोन बदलला पाहिजे परगावाहून शिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलांना आम्ही थोडी माणुसकी दिली म्हणून काय बिघडलं?
.. एक दिवस माझ्या लक्षात आले की चार वाजले तर या उमेश घरी येत नाही मंग जातो कुठे? कॉलेज सकाळी सातला भरून अकराला सुटतं अन हे पोरगं गेले दोन-तीन महिने होऊन गेलं रूमवर चार ला येतोय मी बाहेरून चौकशी केली तर मला समजलं तो ट्युशनला जातो परंतु ट्यूशन चार तास. मग मी जरा उमेश बरोबर बोलायचे कमी झाले मी त्याच्यावर नाराज रहायची हे त्यांनी ओळखलं होतं पण तो गप्प रहायचा.
एक दिवस तो माझ्याकडे आला आणि म्हणाला
.. मावशी माझं काय चुकलं का? तुम्ही गप्प का असता? सांगा ना? मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही माझ्याबरोबर अलीकडे कमी बोलता. सुयश यश राजेश आणि रमेश यांच्याशी कसं चांगलं बोलता? तुम्ही सर्वजण मिळून मिसळून राहता तुम्हाला माझा कसला राग आला आहे का?
मी
मला कसला राग? मी तुमची कोण? तुमच्यावर रागवायला. त्यावर उमेश म्हणाला मावशी खरं सांगू का? मी ठरवलं की. इकडे यायचं नाही. कारण मावशी आपल्याशी पहिल्यासारखं बोलत नाही मग त्यांच्या घरी जायला नको परंतु माझे पाय तुमच्या घराकडे मला खेचून आणतात.
त्यावर मी एवढीच मावशी बद्दल माया आहे तर खरं खरं सांग माझ्या डोक्यावर हात ठेवून. तीन महिने झाले इतक्या उशिरा पर्यंत कुठे असतोस?
सांगू का खरच मावशी मग ऐका तर तुमची शपथ. मी खूप गरीब घराण्यातील मुलगा .माझे आई वडील मोलमजुरी कामाला जातात .माझ्या शाळेचा बहिणीच्या शाळेचा खर्च त्यांना झेपत नाही .मी नववी ईयत्तेत असताना माझ्या पायाला सर्प दुंश झाला होता. त्यामुळे माझ्या गरीब आईवडिलांनी कर्ज उचलले आणि मला बरे केले .ते कर्ज माझे आई-वडील आजही चाकरी करून फेडत आहेत .म्हणून कॉलेज सुटल्यानंतर मोलमजुरी करून माझा शाळेचा खर्च स्वतः भागवतो. खोली भाडे कपडे खान पिन वह्या पुस्तकं दवापाणी त्यातूनच आई-वडिलांना पैसे पाठवीत असतो.
. त्यामुळे मावशी मला रूम वर यायला उशीर होतो . माफ करा हे जर मी तुम्हाला सर्वात आधी सांगितले असते तर तुम्हाला यातना झाल्या असत्या. आन ते मला होऊ द्यायचं नव्हतं .कारण हे सर्व माझ्या आई-वडिलांना माहित नाही .मी तुम्हाला ही आईप्रमाणे समजतो. बाकीचेही चौघे यश राजेश रमेश आणि सुयश श्रीमंत घराण्यातील मुले आहेत .त्यांच्या नशिबी हे हा ल येऊ नयेत.
... अन उमेशच्या डोळ्यातून ट पकन पाणी पडले. दाटल्या स्वरात उमेश मला म्हणाला मावशी मी मजुरीत गवत काढतो. दगडे विटा वाहताना माझ्या वर्गातील कॉलेजच्या मुली मुले हसतात. परंतु मावशी मी एक दिवस मोठा होणार. मला आशीर्वाद द्या कि मी खूप शिकेन
त्यावर मी अरे मी कोण आशीर्वाद देणार .कर्ता-करविता विघ्नहर्ता आहे . . . .. .. ...
उमेश म्हणाला नाही देव नाही. देव मनुष्यात आहे. तुमच्या आमच्यात आहे दगडात नाही .देव भुकेल्या त आहे. एखादा मनुष्य भुकेने व्याकूळ झाल्यावर त्याला कोणी अण्ण दिलं तर त्या अन्न देणाऱ्याला देव म्हणावं .दगडावर डोकं आपटून घेतलं तरी दगड अण्ण देणार नाही .तुम्ही मला मुलाप्रमाणे जपून आज पर्यंत खाऊ घातलं .जसे आई बाळासाठी घासातला घास राखून ठेवते कातर आपला बाळ भुकेने व्याकुळ होईल तेवढाच घास आल्यावर तो खा आईल तुम्ही माझ्यासाठी घासातला घास राखून ठेवून आल्यावर मला खाऊ घातलं हे सर्व हे आईच करू शकते. आई म्हणजे परमेश्वर तुम्हीच माझ्यासाठी देव आहात. असं म्हणून माझ्या चरणावर मस्त क तेकवल.
.
हे सर्व हे सर्व ऐकून माझे काळीज फुगल्या प्रमाणे झाले पण मला आई होता आले नाही. मी आई पणासाठी थोडे कमी पडले होते .माझा उमेश वरचा विश्वास थोडावेळ का होईना ढळला होता परंतु त्यामागे एक आई उमेशची काळजीही करत होती पोरं अजून कसा आला नाही .
उमेश मात्र परीक्षेत पास झाला होता. त्याने एक आदर्श मुलाचं कर्तव्य केलं होतं.
मुलांच्या वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या होत्या इकडे मात्र मलाच झुरणी लागली होती ती माझ्या पाच बाळांच्या विरहाचे जशी जशी परीक्षा जवळ येईल तस-तशी मी अश्रू धालयाचे कारण मुले मला सोडून जाणार प्रत्येक जण आपापल्या घराकडे जाणार स्वतःच्या चिऊताई कडेच म्हणजेच स्वतःच्या घरट्याकडे जाणार.
एकदाची परीक्षा चालू झाली बघता बघता परीक्षा संपली पसार याची आवराआवर झाली तो क्षण आलाच. सकाळपासून मी जेवले नव्हते कारण हे पाच बाळे मला सोडून त्यांच्या घरी जाणार या भीतीने तो क्षण कधी आला कळलच नाही परंतु जेव्हा पाची मुले पाठीवर दप्तर आड कोण माझ्या चरणी मस्तक टेकवण्याचा तयारीत दिसले .तेव्हा माझं काळीज मात्र पाझरल डोळे भरून येऊन पापण्या चा बांध फुटला तोंडाचा हुंदका आजवर आवरलेला तो हुंदका टाहो फोडून बाहेर आला उमेश बाळा तू सुखी रहा वरचेवर येत जा या तुझ्या मावशीकडे येत जा.
.,. मुलांनी वळणावर जाईपर्यंत आमच्या सर्वा कडे पहात हात वर ठेवला होता.
. पाखर शिक्षण घेण्यासाठी आली नंतर घरट्याकडे वळाली आजही मुलांची आठवण क्षणोक्षणी होते डोळे मात्र त्यांच्या आठवणीने ओलेच असतात म्हणतात ना अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती.
छोट्याशा बॅटन पट्टीने हे घट्ट असं पवित्र नातं निर्माण केलं.
लेखिका - सौ राजश्री विठ्ठल सुतार
(कथा- बकुळी कथासंग्रह, प्रथमावृत्ती २०१४,प्रकाशित)