अनुभव एक वाटचाल
अनुभव एक वाटचाल
प्रत्येक व्यक्तीच्या मनातील भावना कल्पना विचार मत वेगवेगळे असतात. आणि या सर्व गोष्टीतून निर्माण झालेली एक जी गोष्ट असते त्याला आपण अनुभव असं म्हणतो.
बऱ्याच वेळा अनुभव हा व्यक्तीला खूप काही शिकवून जातो.
चांगलं असो किंवा वाईट असो कधीतरी चांगल्या माध्यमातून एक वेगळा मार्ग निवडण्यासाठी प्रेरित करतो. तर कधी वाईट गोष्टींपासून एक चांगलं काहीतरी शिकण्यासाठी मिळते.
ऐक विचार इतिहास घडवू शकतो. असं म्हटलं तरी चालेल.
कारण विचार आहे तर मार्ग सुचेल आणि जर मार्ग सुचेल तर ऐक चांगले ध्येय निश्चित करण्यात आपल्याला यश प्राप्ती होईल यात कसलीच चिंता न्हाई.
असं म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
म्हणून तर म्हणतो की अनुभवला अत्यंत महत्त्व आहे. कोणतीही गोष्ट जर अनुभवातून शिकत किंवा साध्य करत असू तर त्याला अनुभव घ्यावेच लागेल.
आपण लहानपणापासून ते आज पर्यंत खूप काही गोष्टी शिकत आलो आहोत.
मग त्यामध्ये चांगल्या गोष्टी असो अथवा वाईट गोष्टी असू यातून काही गोष्टींच्या बद्दल बोलायचं झालं तर एकूणच त्यातल्या काही गोष्टी ने झालेल्या किंवा अनुभवलेल्या काही चुकांमधून प्रेरित सुद्धा केलं जात होतं.
चुकीचा अनुभव हा सुद्धा आपल्या मनाला एका वेगळ्या प्रवाहाकडे खेचून नेतो.
प्रत्येक व्यक्तीची झेप घेण्याची उंची ही अगदी पर्वताहून उंच नसेल परंतु त्याची मनू अवस्था ही त्याच्या कर्तुत्व आणि कार्यप्रणाली नुसार चालत असते.
आपण कार्य करत असलेली एखादी गोष्ट जी की आपल्याला येणाऱ्या वर्तमान काळासाठी कुठल्यातरी अनुभव आला सामोर जाण्यासाठी प्रेरित करत असते.