Mahesh Raikhelkar

Children Stories

2.6  

Mahesh Raikhelkar

Children Stories

अनोखा वाढदिवस

अनोखा वाढदिवस

6 mins
139


“अहो आज ऑफिसमधून लवकर यायचं लक्षात आहेत ना? ” पल्लवी ने गिरीषला विचारले “अगं हो बाई आज ओम चा वाढदिवस आहे हे माझ्या चांगलं लक्षात आहे” गिरीषने सांगीतले. “नाही मार्च एन्ड आहे, कामाच्या गडबडीत विसरून जाल म्हणून सांगीतले” “मी करेक्ट सात वाजता हजर आहे, चल बाय मी आता निघतो”. गिरीष सोलापूर येथे सी.ए.ची प्रॅक्टिस करत होता तर पल्लवी स्टेट बॅकेत प्रोबेशनरी ऑफीसर म्हणून काम पाहात होती. ओम हा त्यांचा एकूलता एक ९ वर्षाचा मुलगा जवळच्याच एका इंग्रजी शाळेत ३ री मध्ये शिकत होता. गिरीष व पल्लवी देाघेही बाहेर कामानिमीत्त व्यस्त असल्याकारणाने ओमला सांभाळण्याची जबाबदारी ओमच्या आजोबा आजींकडे होती. घरात इतर कामासाठी बाई होतीच. ओम शाळेतुन आल्यानंतर त्याला खायला देणे, त्याच्यावर लक्ष ठेवणे व त्याला छान छान गोष्टी सांगणे ही कामे ओमचे आजी व आजोबा आनंदाने पार पाडत असत. ओम या दोघांचा जीव की प्राण होता. ओमला देखील त्यांचा चांगलाच लळा होता. ओम या सर्वांचा लाडका असला तरी त्याच्या वर चांगले संस्कार होतील याची पल्लवी व गिरीष कटाक्षाने काळजी घेत असत.

ओमच्या बंगल्याजवळच शांताबाई एका पत्राच्या खोलीत रहात होत्या. शांताबाई ला राजु नावाचा ओमच्याच वयाचा एक मुलगा होता. शांताबाईचा नवरा बुधाराम राजु १ वर्षाचा असतानाच एका दुर्धर आजाराने वारला होता. चार घरची कामे करून गुजराण करत ती राजुला शिकवत होती. राजु अतीशय चुणचुणीत मुलगा होता. शिकुन राजुला मोठा ऑफीसर बनवायचं हे शांताबाईचे स्वप्न होते. तो चित्र ही चांगले काढत असे. पल्लवी शांताबाईला काहीवेळेस घरातील अतीरीक्त कामासाठी बोलावुन घ्यायची. कधी कधी राजु देखील तिच्या सोबत यायचा. शांताबाई गरीब असली तरी कष्टाळु व प्रामाणिक होती. पल्लवीचा तीने विश्वास संपादन केला होता. ओम व राजु एकाच वयाचे असल्याकारणाने त्यांची लवकरच गट्टी जमली. ओम च राजु शाळा सुटल्यावर बंगल्याच्या आवारात खेळत असत. या आठवडयातच गुरूवारी ओमचा दहावा वाढदिवस होता. मार्च एन्ड असल्याने गिरीष व पल्लवी हे देाघेही कामामध्ये अतीशय व्यस्त होती. दोघांनाही त्या दिवशी सुट्टी घेणे शक्य नव्हते. ओमचा दहावा वाढदिवस असल्याकारणाने सुट्टी नसली तरी संध्याकाळी तो जोरात साजरा करावयाचा असे दोघांनीही अधीच ठरवले होते. यासाठी त्यांनी आपल्या जवळ च्या मित्रांना व नातेवाईकांना ओमच्या वाढदिवसानिमीत्त पार्टीसाठी आमंत्रीत केले . पल्लवीने शांताबाईला अगोदरच बोलावुन काही कामांची जबाबदारी सांगीतली. “आई तु चॉकलेट च्या केकची ऑर्डर दिलीस ना? “ ओम ने पल्लवीला विचारले. “हो रे माझ्या सोन्या” पल्लवीने ओमला जवळ घेत सांगीतले.

ओम ला चॉकलेट केक अतिशय आवडत होता. पल्लवीने तिच्या बॅंकेजवळ असलेल्या प्रसिध्द “हॅपी केक” या शॉपी मध्ये अगोदरच केकची ऑर्डर दिली होती. आज वाढदिवस असल्याकारणाने ओम नवीन ड्रेस घालुन शाळेत गेला. चार वाजता शाळेतुन घरी आल्यानंतर त्याने बघीतले की शांताबाई व राजु त्याच्या घरी आले आहेत. “राजु तु आज संध्याकाळी माझ्या बर्थ डे पार्टीला ये” ओम ने राजुला सांगीतले. राजु “हो” म्हणाला “शांतामावशी तु पण ये ओम शांताबाई कडे पाहात म्हणाला". “अरे मीतर पार्टीसंपेपर्यंत येथेच आहे” शांतामावशीने काम करता करता सांगीतले. “आजी मी राजुसोबत येथेच खेळतो तुला टीव्ही पाहायचा असेतर तु पहा” ओम ने आजीला सांगीतले. खेळता खेळता ओम ने राजुला विचारले “अरे राजु तुझा बर्थ डे कधी असतो?” शांताबाई तेथेच साफ साफ सफाई करत होती ती म्हणाली “आजच राजुचा देखील वाढदिवस आहे. “ “अरे व्वा आजच! मजाच की!!” ओम आनंदाने ओरडला. ओम म्हणाला “ये राजु मग तु देखील संध्याकाळी केक कापणार असशील?“ “नाही” राजु हिरमुसुन खाली मान घालुन म्हणाला.“बरं तु संध्याकाळी मात्र माझ्याकडे नक्की ये”. हे सर्व संभाषण शांताबाई दुरून ऐकत होती .राजु चा वाढदिवस असुन देखील आपण त्याचे आपल्या गरीब परीस्थितीमुळे काहीही लाड करू शकत नाही हे समजुन ती अतीशय दु:खी झाली. तु “केक कापणार का ?” हे ओम चे वाक्य ऐकुन व त्यावर हिरमुसलेल्या चेहराने “नाही!” म्हणताना राजुला पाहुन ती अधीकच कष्टी झाली. ओमने आईच्या मोबाईलवर फोन लावला “आई मी ओम बोलतोय ”, “बोल बेटा” पल्लवी म्हणाली “आई तु येतांना एक नाही दोन दोन चॉकलेट केक नक्की आण” पल्लवीला कामाच्या गडबडीत ओम दोन केक आणायला का सांगतोय हे लक्षात आले नाही. तीने गडबडीत “हो नक्की बेटा चल मी कामात आहे ठेवते” म्हणुन फोन ठेवला. ऑफीस मधुन निघतांना ती “हॅपी केक” ठिकाणी अधी ऑर्डर दिलेला केक घेण्यासाठी आली. केक घेतांना ओम चे दोन केक आणण्याचे बोलणे तिला आठवले. हा दोन केक का मागतोय? हे तिला आताही समजले नाही. चॉकलेट केक ओम चा फेव्हरेट केक आहे व मागच्या वाढदिवसाला सगळ्यांना दिल्या नंतर ओमला थोडाच केक राहिला असल्याने तो रूसुन बसला होता हे तिला इतक्यात आठवले. या वेळेस परत तसेच व्हायला नको म्हणुन ओम दोन केक मागत असेल हे समजुन ती मनातल्या मनात हसली. आजतरी ओमला नाराज करायला नको हे समजुन तीने ‘अजुन असाच एक केक आहे का ?’ असे दुकानदारास विचारले. सुदैवाने तो होता. ती दोनही केक घेवुन घराकडे निघाली. सांगीतल्या प्रमाणे दोन केक आणलेले पाहुन ओम आंनदाने उडया मारेल हे समजुन ती सुखावली. पल्लवीला गेटमधुन येतांना पाहुन ओम धावतच तिच्या जवळ आला. तिला बिलगुन त्याने लगेच तीला विचारले “आई तु दोन केक आणलेस ना?” “हो रे माझ्या राज्या” “ओ ,या !!!” ओम आनंदाने उडया मारत ओरडला. थोडयाच वेळात गिरीष देखील आला. “बाबा आईने माझ्यासाठी दोन केक आणले आहेत “ ओम म्हणाला. “आरे व्वा, मज्जाच आहे तुझी” गिरीष मिस्कील हसत म्हणाला. एव्हाना शांताबाई घरातल्या कामवाली बायकांना मदत करत सर्व पार्टीची तयारी करून राजुसह तिच्या घरी “संध्याकाळी येतो” असे आजी आजोबांना सांगुन गेली होती. पल्लवी व गिरीष ने ओम ला तयार केले. संध्याकाळचे ७.३० वाजले.

हळुहळु गिरीष व पल्लवीचे मित्र मंडळी यायला सुरवात झाली. ते दोघे या सर्वाचे हसत मुखाने स्वागत करत होते. ओम ला सर्वजण “हॅपी बर्थ डे“ वीश करत गीफ्ट देत होती ओम त्यांना हसुन “थँक्यू “म्हणत होता. सर्वांची वाट पाहुन ८ वाजता केक कापावयाचा असे गिरीष व पल्लवीने ठरवले. जवळपास सर्व मित्रमंडळी जवळचे नातेवाईक व ओमचे काही मित्र जमले. एव्हाना शांताबाई देखील कामासाठी आली. राजु दिसत नाही हे पाहुन ओम ने विचारले “शांतामावशी राजु आला नाही ?“ “आरे तो तुला काही तरी दयायला घेवुन येतो म्हणाला, मी पुढे आले” शांताबाई म्हणाली. “ठीकय” ओम म्हणाला. घडाळ्यात आठ वाजले. पल्लवीने केक सजवलेल्या टेबलावर आणुन ठेवला. सर्वजण त्या टेबलाभोवती जमा झाली. “ओम चल केक कापु” पल्लवीने ओमला सांगीतले. “आई जरा थांब” ओम गेट कडे पाहात म्हणाला. “अरे ओम तु कुणाची वाट पाहात आहेस?” ओम च्या आजीने विचारले “राजु अजुन आला नाही, तो आल्या शिवाय मी केक कापणार नाही. ” ओम म्हणाला. ओमला राजु गेट पाशी उभा राहिलेला दिसला. आतली सर्व मोठी व चांगल्या कपडयातली माणसे पाहुन राजु आत यायला बिचकत होता. त्याच्या अंगावर साधाच ड्रेस होता. त्याच्या हातात त्याने स्वत:च्या हाताने ओम देण्यासाठी काढलेले एक चित्र होते. राजुला पाहिल्यानंतर ओम त्याच्या जवळ गेला. राजु ने ते चित्र ओमला दिले व “हॅपी बर्थ डे” म्हणाला. चित्र पाहुन ओम आनंदाने उदगाराला “वा छान चित्र आहे ! थँक्यू” ओमने राजुचा हात धरत त्याला आपल्याजवळ बसवले. ओमने राजुला आपल्या जवळ बसवले हे पाहुन गिरीषच्या कपाळावर रागाने आढी पडली. ओम पल्लवीला म्हणाला “आई आज राजुचा देखील वाढदिवस आहे “ “हॅपी बर्थ डे राजु”. “आई तो दुसरा केक आण, मी व राजु एकदम केक कापणार आहोत. ” एव्हाना पल्लवी व गिरीषला ओम देान केक मागण्यामागचे कारण समजले. पल्लवीने दुसरा केक आणला “चल राजु तु व मी देाघेही केक कापु” ओम राजु कडे पाहात म्हणाला. ओम ने व राजुने दोघांनीही केक कापले. सर्वानी “हॅपी बर्थडे ओम अँण्ड राजु” अशी घोषणा दिली. राजु पहिल्यांदाच त्याचा वाढदिवसाचा केक कापत होता. तो खुप आनंदीत झाला. पल्लवीला आपल्या ओमचे मित्रप्रेम पाहुन कौतुक वाटले. गिरीषला आपल्या मुलाचा अभिमान वाटला. ओमचे आजी आजोबातर नातवाचे हे वर्तन पाहुन खुष झाली. शांताबाईच्या डोळ्यात हे सर्व पाहुन पाणी आले. ओमने तिच्या राजुचा आज एक अनोखा वाढदिवस साजरा केला. अशाप्रकारे ओमने लहानवयातच माणुसकीचे व मित्रप्रेमाचे दर्शन घडवत अनोखा वाढदिवस साजरा केला.


Rate this content
Log in