Priyanka Kardekar

Others

2  

Priyanka Kardekar

Others

अल्लड मना जरा थांब ना

अल्लड मना जरा थांब ना

2 mins
511


प्रिय डायरी,


असं म्हणतात की, ज्याचं कोण ऐकणारं नसतं त्याचं ऐकणार तू असतेस. माझ्या आनंदाच्या क्षणी तूही आनंदी असतेस, दुःखाच्या प्रसंगी तूही गहिवरतेस पण रागाच्या क्षणी मात्र तू मंद हास्य करून कानात हळूच येऊन सांगतेस की, सगळं व्यवस्थित होईल. पण कधीच साथ सोडून जात नाहीस. आम्हीच वेळेनुसार तुझ्याकडे दुर्लक्ष करतो. आज २४ तास घरच्यांसोबत राहूनही वेळ नकोसा वाटतो आणि मग तुझी आठवण येते. तुला ना माझं एक गुपित सांगायचं आहे...


आता सध्या लॉकडाऊन चालू आहे त्यामुळे घरी बसून काम चालू आहे ना आणि तुला तर माहीतच आहे की मी किती चंचल आहे ते म्हणजे सुरुवातीचे ३ दिवस मस्त मन लावून काम केलं. हा ९ टू ५ जॉब असतो ना अगदी तसं पण नंतर मात्र ते भरकटत गेलं. मस्त समुद्रकिनारी, तो असा छान फेसाळलेला समुद्र, ती हातातून निसटून जाणारी वाळू आणि थोडीफार माणसांची गर्दी हा म्हणजे मला इतका काय फरक पडत नव्हता त्या गर्दीचा... पण तरीही मी एकटीच असती तर जास्त आवडलं असतं. हं जाऊ देत पण मी मात्र ह्या सगळ्याच्या खूप आनंद घेत होती. एक खंत उराशी घेऊन हा म्हणजे ह्या सगळ्यात मी माझं हक्काचं माणूस शोधत होती पण नाही सापडला. तरीही मी त्या सगळ्या कल्पनिकतेचा मस्त आनंद घेत होती. कोणीही त्रास देणार नव्हतं ना माझी मीच बागडत चालली होती. अगदी मनभरून फिरुन आली मी समुद्रकिनारी... खूप छान वाटलं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माझी मीच भानावर आले.


हा म्हणजे असं मध्येच कोणीतरी येतं आणि टिचकी वाजवून जातं किंवा मग अचानक धक्का देऊन "काय मॅडम कुठे हरवलाय?" असं विचारणारे... मला वैयक्तिकरित्या अशा लोकांचा खूप राग येतो म्हणजे अक्षरशः त्यांना ना हत्तीच्या पायाखाली द्यावं किंवा ना उंचावरून कडेलोट करावा असं वाटतं... असो जाऊ देत. पण ह्या काल्पनिक सफरीचा मात्र मी मनसोक्त आस्वाद घेतला...सगळेच बंधन तोडून मी माझ्या जगात वावरत होते...


Rate this content
Log in