आयुष्य
आयुष्य
जन्म :-
अंधारात आईच्या पोटात दडला एक जीव
कोवळ अंकुर आईच्या पोटात रोज नव्याने वाढतोय एक सजीव
जीव आतल्या आतच पोटात लात मारी
जीवाला जग पहायची घाई आईचे झाले पाय भारी
सात नऊ महिन्याचे सासर माहेरचे पाळणे गाऊन
निवडणूक जीलबी पेढ्यांची होते
निर्णय कोणत्या पक्षाचा लागेल
याच आशेच्या हिंडोळ्यावर आई झोका घेते
घरात नवीन पाहुणा येणार वाट आतुरतेने घरचे बघते
रडत रडत पाहुणा आईच्या उदरातुन बाहेर येतो
चहू बाजूंनी उजीड उजीड पाहून जिवाचा रडच थांबतो..........1
बालपण :-
ह्या हातातून त्या हातात
लेकराचा आयुष्य प्रवास सुरू होतो
बारा दिवसांनी नाव ठेऊन
बाळ त्या नावाची ओळख घेऊन
आयुष्याची गाडी पुढे पुढे ढकलतो
हसत पळत रडत खेळत
बाळाची वाढ होतं
बालपण संपन्न होते........2
तारूण्य :-
तारूण्याची पहाट उगवते
नवीन वाटा नवीन दिशा आयुष्याला मिळते
चौरस्त्याच्या चार वाटेत जीव एकटा
दिशा ठरवताना गोंधळ होते मनाचा
अचूक वाटा गुरूवर्या कडून निवडून
बाळ ज्ञान संपन्न करून
जगाच सूत्र जगण्यात वापरून जगायला शिकतो
त्यात प्रेमाचा विषयही रंगून
आयुष्यही रंगीन होते........3
संसार:-
लग्न होऊन एक गाठ साथ जन्माची बांधते
ईथें संसार वेल फुलवुन
फुले तारुण्यात आले की
आयुष्य उतरत्या वयात येते
जगाची जगण्याची दुनियादारी
नातवंडांना सांगत हातातली काठी टेकत
मृत्यू :-
खाली जमीनीवर लेकराच्या मांडीवर मान टेकवत
मृत्यूला गवसनी घालून शरीर थंड पडते.....
जिवलगांचा रडण्याचा आवाज
सुरू होऊन शांत होत
शरीर स्मशानात आणून जाळल्या जाते
त्या शरीराची राख होऊन
ईथे आयुष्याचा प्रवास संपन्न होतो.....