आयुष्य...!
आयुष्य...!
मागच्या वर्षी ऐकलेल खरतर लहानपणापासूनच ऐकलेले की jee भारतातील सर्वात कठीण परीक्षा आहे,आणि हे सगळं ऐकूनच मागच्या वर्षी परीक्षा टाळली,पुन्हा प्रयत्न करायचा म्हणून यावर्षी दिली सुद्धा आणि मला personally ती सोपी वाटली. रिझल्ट काही विशेष नाही आता तो विषय वेगळा आहे...
सोप वाटण्याचं कारण की लोक काय बोलतात ह्यापेक्षा आपल त्यावर काय मत आहे हे स्पष्ट असणं, तयारी असेल आणि अडचणींना सोडवण्याची जिद्द असेल तर अडचण ही सोपी वाटते मग रिझल्ट काहीही असो अडचणी ला सामोरं जाण्याचं बळ मिळत हे नक्की.
आणि कदाचित असच काही आयुष्याचं असावं,आपण नेहमी म्हणतो "किती कठीण आहे आयुष्य.?" आणि हा प्रश्न पाडून पाडूनच आपण त्याची भीती करून घेतली असावी.
आयुष्य ना रंगमंचासारख आहे प्रत्येकाचा वेगळा रोल आहे आणि प्रत्येकाच्या कुवती नुसार तो त्याच्या साठी अवघड किंवा सोपा असावा,पण प्रत्येकच जन ज्याच्या त्याच्या गोष्टीसाठी hero आहे आणि असावाच.
आयुष्याला ना एकदा बिन्धास्त,कुठल्याही अडचणींना मनावर न घेत,किती सुंदर आहे आयुष्य म्हणत जगून पाहावं, कदाचीत आपण त्याला करून ठेवलं तितकं ते कठीण नसावं....!
