STORYMIRROR

Renuka Pathak

Others

3  

Renuka Pathak

Others

आठवणींच्या विसाव्यावर

आठवणींच्या विसाव्यावर

2 mins
179

दिवस कसे सरतात आणि आपल्या लाडक्या आठवणी कशा उरतात हेच खरं सांगाव्यश्या वाटतात. आठवणी या माणसाच्या आयुष्यातील अमृतच असतात असे म्हंटले तरी काही वावग ठरणार नाही असे मला वाटते. प्रत्येक माणसाच्या जीवनात त्यांच्या आठवणी या उत्कृष्ट भूमिका बजावत असतात आणि त्यांच्या उजाळ्यावर माणसाचे जीवन समृद्ध होत असते. सर्वात सुंदर आणि मनमोहक आठवणी म्हणजे बालपणीच्या आठवणी कारण त्या तुमच्यातील लहान मुलाला जिवंत ठेवण्यासाठी मदत करतात.

मी जेंव्हा लहान होते तेंव्हा मे एकूण एक स्पर्धेत भाग घेत असत. उदा. निबंध स्पर्धा, पोहण्याची स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, नाटकाची स्पर्धा, नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादि. मला खूप पारितोषिकं मिळाली सुद्धा. मला विशेष करून नृत्य स्पर्धेत आणि पोहण्याच्या स्पर्धेत खूप बक्षीस मिळाली. तसेच नाटकात ही मिळाली. 

"कथक" या शास्त्रीय नृत्याच्या मी पाच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या असल्याने मला त्यामध्ये खूप आवड होती आणि आहे. त्यामधील मला शंकराच तांडव, महिषासुरमर्दिनी स्तोत्र तसेच श्रीकृष्णाचे भजन यावर पायात घुंगरू घालून नृत्य सादर करण्यास खूप आवडते. आणि ते मे नक्कीच करायचे आणि आज ही मे बरेचदा करत असते. त्यामध्ये ताल ऐकताल, झपताल असे प्रकार असतात, तोडे, ठुमरी इ. प्रकार असतात. माझ्या गुरूजी चे नाव "कुमारस्वामी" हे होते. कॉलेज मध्ये असताना मला दोनदा नृत्य स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले होते. ते मी आज ही माझया घराच्या भिंतीवर एक माझी आठवण म्हणून ठेवलेले आहे.

लहानपणी मी पोहण्याचा पण खूप सर्व करायचे आणि स्पर्धेत भाग ही घ्यायचे ययाती सुद्धा मला भरपूर पारितोषिके मिळाली. आम्ही खूप जणी असायचो तेंव्हा खूप मजा येत असत. आम्ही बरेचदा आमच्यात ही स्पर्धा लावायचो आणि जो कोणी जिंकेल त्याला बाकीचे सर्व आईस्क्रीम देत असू कारण तरण तलाव बाहेर एक आईस्क्रीम वाला उभा राहायचा.

तसेच कॉलेज मध्ये असताना मी नाटकांमध्ये ही काम करायचे आणि तेंव्हा मला राज्यस्तरीय स्पर्धेत रजत पदक मिळाले होते. ते सुद्धा मी आज माझया दिवाणखान्यात पुर्व दिशेला भिंतीवर लटकावले आहे. मला ते रोज बघून बघून आपण लहान का राहीलो नाही याचे वाईट वाटते पण वाढत्या वयाला काही इलाज नसतो.

खरेच आठवणी म्हणजे माणसाच्या मनाला किती आनंद आणि ओलावा देऊन जातात आणि क्षणभर का होईना चेहऱ्यावर एक स्मित हास्याची लकेर देऊन जातात. काळ2 किती ही पुढे जाऊ द्या पण जसे निसर्ग दऱ्या, डोंगर यांचे रूप पालटू शकत नाही तसेच चांगल्या - वाईट आठवणी सुद्धा माणसाला कपड्याप्रमाणे बदलता येत नाही आणि म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवणीच सोबत येतात आणि अवघड असलेले जीवन अगदी सोपे करून ठेवतात. होय ना?..........



Rate this content
Log in