आपल्याला काय प्रेरित करते? आणि आपल्याला कशापासून भीती वाटते?
आपल्याला काय प्रेरित करते? आणि आपल्याला कशापासून भीती वाटते?
खरच खूप सुंदर विषय आहे ........
जीवन जगायला प्रेरणा नसेल तर जीवन शून्यवत आहे…आणि जीवनात प्रेरणा असून तीची जाणीव नसेल तर ते निरर्थक आहे! अशा अद्भुत प्रेरणा,पालक ,समाज, व्यक्ती, अनुभव, निर्मिती, बोल, व्यक्तिमत्त्वे , वाचलेले पुस्तक, इत्यादींमार्फत सतत गंगाजलाप्रमाणे आपल्याकडे ओघाने येत असतात! कधी हाक देऊन, कधी नकळत, कधी स्वैर लाटेवरून, तर कधी उत्कट प्रतिक्षेनंतर! मात्र येतात हे नक्की!
असे प्रेरीत करणारे अनंत विचार आपल्या आजूबाजूस आहेत मात्र एखादा विचार कधीकधी सर्वांस पुरून उरेल इतका महान ठरतो! तोच विचार म्हणजे माझे आई बाबा.
खरच मला प्रत्येक क्षणी प्रेरित करणारे माझे आई बाबा, त्यांच्या कडे नुसत बघितली तरी मला प्रेरणा मिळते त्यांचे विचार , त्यांची कामे ,आर्थिक नियोजन , भविष्याची तरतूद, कष्ट करण्याची त्यांची जिद्द या मुळेच तर प्रेरणा मिळते.
प्रेरित होन सोप आहे पण त्यांचे विचार मनात रुजवन कठीण . मी त्यांची मान कधीच खाली जाऊ देणार नाही माझे आई बाबा नेहमी ताठ मानेने जगले पाहिजे.पण मला भीती या गोष्टीची वाटते की माझ्यामुळे माझ्या आई बाबांचं कधि मन दुखता कामा नये . तुम्ही खूप कष्ट घेतले हो माझ्यासाठी भीती वाटते मला की मी पूर्ण करू शकेल का तुमच्या इच्छा ?
मी प्रयत्न तर करतच राहील, तुम्ही माझ्या यशाची खूप आतुरतेने वाट पाहत आहात .भीती वाटते की तुमचा विश्वास माझ्यावरचा कधि डगमगणार तर नाही ना ,पण भीती ही आवश्यक आहे जीवन जगत असताना कारण त्या भीतीमुळे पण आपल्याला एक प्रेरणा मिळते .
तुम्ही जे केलं त्याची परतफेड तर मी कोणत्याच जन्मी पूर्ण करू शकत नाही पण फुल नाही तर फुलाची पाकळी तर करु शकते ......
लोक काय म्हणतील याची मला भीती नाही, कारण लोक तर देवाला पण नावे ठेवतात आपण तर मानस आहे . लोकांच्या पण खूप गोष्टी आपल्याला प्रेरित करतात .बर तुम्ही म्हणाल कस तर लोक आपल्याला नाव ठेवतील तेव्हाच तर आपण समोर जावू ,आता सगळेच आपल्याला चांगल म्हणेल तर कस जमणार आपल्या चुका आपल्याला कडणार नाही ना !त्यांच्यामुळे पण मला प्रेरित होण्याला एक दिशा मिळते .
पाहण्याचा दृष्टिकोन आहे नाहीतर खूप गोष्टी आपल्याला प्रेरित करत असतात .
एकदा कर्तृत्व सिद्ध झाले की
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआपच आदराने झुकतात ????
