Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

savita Dhakne

Others

2  

savita Dhakne

Others

आजच्या काळापुढील प्रश्न

आजच्या काळापुढील प्रश्न

2 mins
873


  आजची तरुण पिढी देशाची खरी आधारस्तंभ आहे. सर्व तरुण धाडसी, पराक्रमी घडले पाहीजेत. त्यामुळेच देशाचे उज्वल भविष्य सहज घडेल. पण आपण पाहतो की, आजची तरुणाई व्यसनाधीनता, सोशल मिडियाकडेच भरकटली आहे. त्यामुळे युवा पिढी मूळ संस्कृतीपासून दुरावत चालली आहे. तरुण जर वेळीच सावरला नाही, तर आपण देशाला अधोगतीपासून वाचवू शकणार नाही.


     संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीला मानाचे स्थान आहे. कारण आपल्या देशाचा इतिहास, भूगोल, विविधतेतून एकता महान आहे. परदेशातील लोक भारतीय संस्कृतीचा अभ्यास करुन आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आपलाच तरुण मात्र दूरावत चालला आहे. संस्कृती म्हणजे संस्कारक्षम आणि सर्वसमावेशक रुढी, परंपरांचा जीवनात अवलंब होय.


    अगोदर एकत्र कुटूंबपद्धती होती. घरात आजी-आजोबांकडून लहाणपणीच मुलांवर संस्कार केले जात. घरात सण, उत्सव, व्रत,वैकल्ये, होम हवन असे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जात. मुलांना गोष्टींमधूनच संस्कार केले जायचे. एकत्र कुटूंबात सगळे एकमेकांचा आदर, मान सन्मान करत. मुले अनुकरणप्रिय असल्याने संस्कारक्षम जीवनाचे बाळकडू सहजपणेच मुलांना मिळत असे. मुले मोठी झाल्यावर संस्कारक्षम नागरीक बनत. 


     सध्याच्या स्पर्धेच्या आणि स्वार्थी युगात विभक्त कुटूंब पद्धती आली. आई वडील नोकरी करत असताना घरात मुलांकडे लक्ष द्यायला कुणीच नाही. पालकांनाही मूलांसाठी वेळ नाही. आपसूकच मुले टि.व्ही., मोबाईलकडे आकर्षीत होतात. घरात सण, उत्सव साजरे होतच नाहीत. शिवाय चांगले वाईट सांगण्यासही कुणीच नाही. एकलकोंडेपणा, मोबाईल, वाईट संगत, व्यसन यामुळे तरुण संस्कार, संस्कृती पुर्णपणे विसरलाय.

  

  टि.व्ही., मोबाईलवर पाहील्याने आजचा तरुण परकीय संस्कृतीचे अनुकरण करु लागला आहे. मुले- मुली कसलेही कपडे घालतात. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हे कुठेतरी थांबले पाहीजे. नाहीतर भारतीय संस्कृतीचा संपुर्ण -हास होणार आहे.


     पालकांनी वेळीच जागे होणे गरजेचे आहे. स्वार्थापायी आईवडीलांना वृद्धाश्रमात न ठेवता सन्मानाने घरीच संभाळले पाहीजे. लहाणपणापासूनच मुलांवर संस्कार होतील. आपल्या संस्कृतीचे ज्ञान मुलांना मिळेल. मुले बिघडणार नाहीत. शिवाय चांगले वाईट याची कल्पना घरातूनच मिळेल. पालकांनी मुलांसाठी वेळ काढलाच पाहीजे. तरुण मुलांशी मैत्रीचे नाते निर्माण करुन संवाद साधला पाहीजे. 


   पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण न करता आपल्याच संस्कृतीचे जतन केले पाहीजे. कुटूंबात, गावात सर्व सण, उत्सव साजरे केले पाहीजेत. शाळेतही विविध उपक्रमांतून आपल्या संस्कृतीचे दर्शन वेळोवेळी घडवले पाहीजे.


  रक्षाबंधन, दहीहंडी असे उत्सव साजरे करुन बंधुभाव,एकता ही मुल्येही रुजवली जातील. तसेच संस्कृतीचेही जतन केले जाईल.


   पालक, शिक्षक, समाज यांनी सर्वांनी मिळून युवा पिढीवर संस्कार करुन सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले तर निश्चितच आजची युवा पिढी आपल्या संस्कृतीपासून दूरावली जाणार नाही.


चला चला मिळून सारे,

मूळ संस्कृतीचे जतन करु,

तरुणांवर संस्कार करुनी,

देशप्रगतीचे कार्य हाती धरु


Rate this content
Log in