आजची स्त्री कशी असावी
आजची स्त्री कशी असावी
आजची स्त्री ही लाथ मारेन तिथे पाणी काढणारी असावी .ती आहे देखील.सारासार विचार केला तर पूर्वीच्या काळातील स्त्रियांपेक्षा आत्ताच्या स्त्रियांचा दर्जा उंचावलेला आहे ती शिकली नोकरी-व्यवसाय करू लागली. त्यामुळे ती तिच्या पायावर उभी आहे. तिच्या निर्णयावर ठाम आहे तिला कुणापुढे हात पसरावे लागत नाही एकंदरीत ती आत्मनिर्भर आहे. आजची स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी असावी प्रत्येक क्षेत्रात तिच एक पाऊल पुढे असाव कोणत्याही क्षेत्रात तिने बिनधास्त वावरावे तरच समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल मुलगी मुलगी करून तिला चार भिंतीच्या आत ठेवून तिची प्रगती खुंटवू नये मुलांबरोबरं चा अधिकार तिला असावा न मिळाल्यास तिच्या अंगी आपला अधिकार मिळवून घेण्याचे धाडस असावे प्रत्येक गोष्टीत ती निपुण असावी. तो काळ गेला स्त्री फक्त रांधा वाढा उष्टी काढा एवढेच मर्यादित होती. आता तिला सर्व सोयीयुक्त वातावरण उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर फायदा तिने आपल्या सुखकर वाटचालीकरता करावा प्रत्येक गोष्टीचे ज्ञान तिच्या अंगी असावे आई-वडिलांनाही वाटतं की आपल्या मुलीने शिकावे व आपल्या पायावर उभे व्हावे आजच्या काळाचा विचार केला तर ती आत्मनिर्भर असणे खूप गरजेचे आहे काळ बदलला गरजा वाढल्या पैशाशिवाय पान हालत नाही त्यामुळे तिने कमावणंं खूप गरजेचे आहे आणि पैसे कमावन्या करता शिकण.
जरुरीचे आहे तिच्या डोक्यातील विचारांना चालना मिळायला हवी ती जगासमोर व्यक्त व्हायला हवी तिच्या कलागुणांना वाव मिळावा आणि हो अतिमहत्वाचे म्हणजे स्त्रियांवरील होणार्या अत्याचारांना आळा घालण्या करता आत्मसंरक्षण करण्याकरता जुडो कराटे तिला यायलाच हवे कुणावरही अवलंबून राहायला नको आजची स्त्री आकाशाला गवसणी घालणारी असावी.
असावी ती सर्वगुणसंपन्न
घ्यावी तिने उंच भरारी
हीच तिची ओळख
स्त्री जातीची खरी
