आई
आई
1 min
196
वात्सल्याचं प्रतीक
जीवनाचं गीत
मायेची छाया
मुलांचं हीत
म्हणजे "आई"
दयेचा सागर
प्रेमाची मूर्ती
आकाशाहूनाही मोठी
अवाढव्य कीर्ती
म्हणजे "आई"
दुःखात सावरणारी
आनंदात ओसरणारी
संस्कृती जपणारी
मने जुळवणारी
म्हणजे "आई"
धरतीची सुंदरता
घराची एकता
सागराहूनही मोठी
कवीची कल्पकता
म्हणजे "आई"
प्रेमाने जवळ घेणारी
शिस्त शिकवणारी
हवीहवीशी वाटणारी
सतत साथ देणारी
म्हणजे "आईच"
