Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Priya Mayekar

Others


2  

Priya Mayekar

Others


आई -संस्काराची खाण

आई -संस्काराची खाण

2 mins 2.9K 2 mins 2.9K

 आई स्वर व्यंजनात,

आई शब्दा-शब्दात

आई संस्काराचा पाया

आई संस्काराची खाण

तिच्यासाठी गं मी खूप दूर

मनी माझ्या हीच हूर-हूर!

आई म्हणजेचं आपलं संगोपन, काळजाचा ठाव घेणारी. हळू-हळू एक-एक घास तोंडी लावणारी, हा चिऊचा! हा काऊचा!अन् क्षणात रडणं बंद करणारी, ती अन्य कोण नसून आईच असते. आईला कधी काय हवं, काय नको हे सांगायचीगरजच नसते ती स्वत:च जाणत असते व आपल्या खाऊ देत असते. मायेच्या ममतेने वाढवित असते. हाताला धरून चालवित असते, कडेवर घेऊन फिरवत असते.

     अशा आईची थोरवी अविट आहे, शब्दात सांगता येत नाही. ओळखता ओळखत नाही. जिवाचं रान करून घर चालविण्यासाठी तिचा हात नेहमीच असतो. काटकसर ही तिच्या कडून शिकायची.  हवे त्या वेळी मदतीचा हात तिच्याकडून घ्यायचा  हे तिच्या कडूनच शिकायला मिळते.अशी ही स्वच्छतेच वसा. आनंदी होऊनी हसा आई ची शिकवण असते. घरात धाक ही असतो, वेळचे बंधन असते, अभ्यासाचे बंधन अशा विचारांची आई बद्दल काय वर्णावं!

आई दुधावरची साय म्हणावं की मायेची छाया म्हणावं हे कधीतरी मनाला टोचत असते, कारण तिच्या सेवेसाठी आपण नसतो. आपल्याला मुक्त करते ती आई, दिल्या घरी तू सुखी रहा. असं हे पहाता पहाता, तिचं ते म्हातारपण खूप खूप त्रासदायक तिला ठरतं, कधी आजारपण, कधी अंग दुखणं, चालता न येण, ऐकू न येणं तिला स्वत:ला सावरता न येणं. असं बर्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं असतं. वहिनीची कधीतरी कटकट, भाऊराया कधी तटस्थ, हे संगळ ती मुकाटपणे सहण करत असते. आई होणे किती कठीण? हे दूर असल्यामूळेआईच्या वेदना मला हाक देत असतात. तिला मुलीकडे रहाणं सुधा पटतं नसतं चार दिवस संपेतोवर माझ्या घरी सोड. माझा मुलगा काय करतोय?  हेच सांगत असते. आईचे जंगणे वेगळं असतं, असेल त्या परिस्थितीत जीवन जगणं स्विकार करीत असते.

          आई ची काळजी आईची आठवण ही मला सतत हाक देत असते. तिचे शब्द माझ्या कानी पडत असतात की मी बरी आहे, तू माझी काळजी करू नकोस, ऐकून खूप बरं वाटतं की ऐवढ्या कष्टात ती किती आपुलकीने बोलते. हे तिचे शब्द मला आज ना उद्या उपयोगी येतील ही सुधा तिच्या ज्ञानाची शिदोरी, आर्दशाची वाणी जपायला हवी जेणे करून आईपणा संभाळताना आई होऊन जगताना, समाजात वावरताना, मुलांचं संगोपन करतानाआई रूप गाभार्यातलं स्विकारणं हे फार गरजेचे आहे.

          आज काल आई वडील नकोच असतात त्यानं कसं जगावं या अवघड समाजात हा मोठा प्रश्न खूप त्रास मनात देत असतो. हे आपण लक्षात घेऊन,

आई ही लक्ष्मीचे रूप आहे.

आई ही दुधाची धार

मायेचा आधार

आई हीच माझी माऊली

ती आपल्या जीवनी सावली

हेच लक्षात आजच्या या पिढीने ठेऊन या समाजात पुढे जायचे आहे. तिचा आशिर्वाद हाच तेवता दिप!

 

म्हणून सांगावसं वाटतंय

आई लक्ष्मी लक्ष्मी

आई मनाची साक्ष्मी

आई आवाजाची वाणी

आई सरस्वतीची गोणी

आई अम्रुरूताची गोडी

आई टाळ म्रुदुंगाची जोडी


Rate this content
Log in