आई नावाचा महिमा
आई नावाचा महिमा


आज जो तो हात वर करणयात माहीर झाला आहे... हम दो हमारे दो मध्येच पिसत जात आहे.. जिम्मेदारी घ्यायला पुढे पुढे सरसावत चला... माय बापाला पण आपल्या सोबत ठेवत चला... काय आला व काळ आता... कुठे गेला तो आजीने केलेला वरण भाता... नाकातील शेंबूड पुसायला कसे सरसावत होते घ्यायला हात आईचा तो पदर...आज तिच्या सहवासावरूनच होतो गदर... आज मी पाहतो ती वृद्धाश्रम आत भरत आहे तिचे उदर... करा थोडी तरी तिच्या त्यागाची कदर... तिला ममी म्हणा की मॉम का आई म्हणा की माय अजून म्हणा कोणी मदर.... फक्त करू नका अनादर काहीही करा तुम्ही जन्मभर पण माय बापाला सांभाळा अगोदर.... विसरून नका आपल्याला न पाहतासुद्धा जिला कळत होते आपली भावना असताना ती गरोदर... कसे सहन करत असेल वेदना तिचे ते उदर... मारली आपण लाथ पोटी तिच्या, आपल्या जन्मागोदर... तरी तिने केले संगोपन ठेऊन उपाशी आपले उदर....
आईबाबाच्याच नावाचा काय गाऊ मी महिमा आहे मी पामर... देवाच्या अस्तित्वाआधीपासूनच आहे आईबाबाचंचे नाव अमर.... गुलाब अजाण असतो त्याच्या सुगंध पासून... चंदनला ही कोठे माहीत असते त्याच्या गंन्धचा महिमा...हिऱ्याला पण भान नसते त्याच्या अनमोलतेच... तसेच चांगला माणूस पण अजाण असतो आपल्या सद्गुण न बद्दल... स्वतःला स्वतःचा स्वभाव माहीत नसतो फारसा.. म्हणून जीवनात पहावा लागतो आरसा... मग आरसा गुरूचा असो, मित्राचा, शत्रूचा, की आप्तेष्ट.. जो करतो आपल्याआधी दुसऱ्याचा विचार तोच ठरतो श्रेष्ठ... जो नेतो सर्वाना सावरून तोच असतो जेष्ठ... जीवनात रंग रुपाला नाही तर भाव रुपाला द्या तुम्ही प्राधान्य... शून्याचे ही मोल आहे अनमोल... फक्त जीवनात नका जाऊ देऊ तोल.. आज ज्याचे आहे गोड बोल.. त्याच्याच साठी वाजतो ढोल... जीवनाचा विषय आहे खूप खोल...नका करू कसला त्यात झोल मगच ठेवता येईल त्यात समतोल... बदलू शकतो आपण इतिहास... सोडवू कोणते ही जीवनाचे गणित.. हाती घ्या फक्त प्रेम, श्रद्धा, आपुलकी, विश्वास आणि मेहनतचे शस्त्र मग सुखी जीवनात येणार नाही कोणते ही शास्त्र... मग पहा कसे सुटले तुमच्या यशाचे ब्रह्मास्त्र... जीवनात सर्व काही विसरा मात्र आई वडील आणि विसरू नका मित्र... कारण तेच आहेत आपले खरे सूत्र.. त्यांच्यामुळेच बदलते आपल्या जीवनाचे चित्र... वागू नका त्यांच्याशी विचित्र राहा मिळून मिसळून आणि एकत्र....