STORYMIRROR

Satish Nahire

Others

3  

Satish Nahire

Others

100 रुपयाची नोट

100 रुपयाची नोट

4 mins
181

संध्याकाळ 5 ची वेळ ....टन टन टनटन वाजले. शाळेतील सर्व मुले धावतच ओरडतच घरी पळाले.सगळ्या च्या आधी सोहम घरी पोहोचला.आईऽऽ....आलोऽऽ..... आई....... चाललोऽऽ.. अस म्हणत तो लगेच खेळायला मैदानावर पळनार तोच आई ने त्याला हाक मारली "सोम्या......,थांब जाऊ नगंस"

'काय ग आई'

"अर...मला, दुकानावरून साखर अन् चहा पत्ती अाणून दे रे"मग जा नंतर खेळायला"

आई ग..काय ग..खेळायच्या येळी दे ग लवकर

"ही घे शंभराची नोट,1किलू साकर 30 रुपयाचं अन् 20 ची चहापत्ती आण....बाकी 50 रुपये परत घेऊन ये"

हो....गं आई आणुतयं बराबर काळजी नगं करु

अन सोम्या पळतच वाण्याच्या दुकानावर जातो

"काका हो काका" मला 1किलू साकर अन् 20 ची चहापत्ती द्याना लवकर.......द्या लवकर

सामान घेऊन अन् उरलेले रुपये घेऊन सोम्या पळतच घरी आला.आई ग घे तुझं सामान असं म्हनत सामान अक्षरशा फेकतच सोम्या लगेच खेळायला पळत सुटला.आई नं हाक मारली पण ती न ऐकल्यासारखी तो पुढेच पळत राहीला.मैदानावर क्रिकेटचा डाव रंगलेला होता.सोम्या मैदानावर येताच सगळ्या पोरांना आनंद झाला.आता मॅच लावुन खेळुया असं सगळे एका सुरात म्हणाले.

"व्हयं की ....चला दोन टीम करु" सोम्या उत्साहात म्हणाला.

"म्या एका टीम चा कँप्टन अन् आनंद्या दुसर्‍या टीमचा" 

"अरं पण आनंद्या नाही ना आला....मी होऊ का? कॅप्टन'विज्या म्हणाला

बरं बरं...करा टाॅस

खेळ सुरू झाला.खेळता खेळता नकळत सोम्याचा हात पॅन्ट च्या खिसात जातो.हाताला काहीतरी लागतंय म्हणुन बाहेर काढुन पाहतोय तर शंभराची नोट.बापरे! शंभराची नोट....आई न तर मला शंभराचीच नोट दिलत्यात अन् ५० रुपड्याचा सामान घेतल्यावर माह्या कडं तर ५० रुपडंच पाहीज व्हतं....जे म्ह्या आईला द्यायला पाहीजं व्हतं.....मग शंभराची नोट कशी आली....खेळता खेळता तो ईचार करत राहीला..आरंच्या वाण्याने चुकून तर नाही ना दिली..हो नक्किच त्यानं चुकूनच दिली असणार..बरंं झाल भारीचा कजुष आहे तो...आता मी देत च नाय त्यासनं....मग काय करायचं ह्या शंभराच्या नोटेचं

"आरं सोम्याऽ कॅच पकड" समद्यी पोरं ओरडली ,

आरं सोडली की कॅच ...खेळात लक्ष दे .सार्‍यांनी ओरडल्यावर सोम्या खेळात लक्ष घालु लागला.पण त्याच मनच रमत नव्हत.ह्या शंभराच्या नोटच काय करायचं ह्योच विचार त्याच्या डोसक्यात व्हतं.

  आई च ५० रुपये परत करुन बाकी ५० रुपयाची लाकडाची नवी बॅट सुताराकडुन बनवुन घेऊ.....तसं बी तो विज्या त्याची बॅट देताना नाटकंच करतुया....व्हयं की, नवी बॅटच बनवु....ह्यो विचाराने सोम्या एकदमच आनंदीत झाला.

 खेळ संपल्यावर समद्यी पोर घराकडे निघाली.जाता जाता कोण काय बोलतुय ह्याकडे सोम्यांच लक्षच नव्हतं आता फक्त शंभराच्या नोटची ५० -५० करु अन् आईला तिचे ५०देऊन बाकी ५० रुपयाची नवीन बॅट बनवुन विज्याची जिरवु ह्योच विचार करत चालला होता.समदी पोरं त्याच्या घरी निघुन गेली.सोम्याच घर जरा दुरच होत.....

  "आरं सोम्या थांब"

कुणीतरी मागुन आवाज दिल्यामुळे सोम्या जागेवरच थांबला आवाज ओळखीचा होता म्हणुन मागं वळुन पाहतुय तर....हा तर आनंद्या....

  कामुन? नाही आलास रं खेळायला आनंद्या कुठल्या

आनंद्याचा चेहरा रडवलेला होता.....डोळे रडुन सुजले होते.

तसा सोम्या हळु आवाजात त्याला विचारतो 

"आरं काय झालं आनंद्या, कामुन रडतुया?"

तसा आनंद्या जोरानं रडु लागला,अरं सोम्या म्ह्या बापानं म्ह्या वाण्याकडं सामान आणाया पाठवुलं.....

मग रं काय झालं आनंद्या

200ची नोट दिलती म्ह्याकडे .....शंभराचं सामान घेऊन म्ह्या घरी आलो पण राहीलेली शंभराची नोटच रस्त्यात पडली..म्ह्या बापानं लई मारलं...रं सोम्या,अन आता म्ह्या बाप म्हणतुया शंभराचीनोट सापडुन आण नाहीतरी राञभर बाहीरच थांब,

अरं त्या शंभराच्या नोटेलाच शोधतुया...तिच्या बगैर.म्ह्या बाप घरी नाय येऊ द्यायचा....

 आनंद्याचा बाप दारुड्या होता.आनंद्याची आई मेल्यापासुन ती दोघंच घरी राहत होती...आनंद्याला त्याह्याचा बाप लई मारतुया.सगळी कामं त्याला सागतुया.त्याला नीट खायंला द्यायचा नाही हे समद्यांना ठाव होतं.सगळ्या मिञात तो लई हुशार होता.क्रिकेट बी लई भारी खेळायचा....पण बिचारा

 "आरं सोम्या शोधु लागं ना रं म्ह्या शंभराची नोट"

व्हयं व्हयं....आपुन शोधु

अंधार पडुसतं शोधल्यावर बी नाही सापड्यालं मुळं दोघंबी नाराज झालं

आता र सोम्या म्ह्या काय र करु...म्ह्या बाप मला घरात नाय येऊ द्यायचा.कुठं र जाऊ म्ह्या आता.

धीर धर आनंद्या ,रडु नगंस

वीज लखकावी तसा सोम्याचा डोसक्यात आलं , आन् काही न विचार करता पॅन्टच्या खिश्यात हात घालुन शंभराची नोट आनंद्याला दिली

आरं कुठं सापडली?

आरं इथचं पडली व्हती ,आता दिसली मला

आरंं म्ह्या मिञा..... सापडवलीस की तु......अस म्हणत त्यानं सोम्याच्या गळ्यातच हात टाकुन करकचुन मिठी मारली.

आनंद्याच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडुन वाहत होता.

अगदी नाचतच तो घरी पळाला.त्याला असं बघुन सोम्याही आनंदीत झाला.एका क्षणात कसलाही विचार न करता आपली शंभराची नोट मिञाला देऊन तो रिता झाला होता.नविन लाकडाची बॅट सुताराकडुन बनवुन विज्याची चांगलीच जिरवायची ......हा विचारच आता जिरला होता.आई च्या ५० रुपयाचे काय सांगायचे ह्या विचिराने त्याच्या मनात कालवाकालव झाली. ५०रुपये कुठेतरी पडलेत.असं खोटंच आईला सांगु....आनंद्याच्या बापासारखे माझी आई नाही.थोडी रागवेन,थोडं मारेन......मग करेन पुन्हा लाड.

 हो असंच सांगु आईला.असा विचार करुन मिञाच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत तो घरी निघाला. बराच वेळ झाला होता......आई वाट पाहत असेन म्हणुन तो भरभर घराकडे निघाला.

   उशिर झाला म्हणुन आई रागवेन....म्हणुन दबकतच घरात शिरला.....पण आई न ओळखल

 सोम्या इकडं ये"

'काय ग आई'

आई आता रागवेन ,मारेन ही ...,,,,,,हा विचार त्याच्या मनात घोळतच होता.

आरं सोम्या वाण्या आलतं

काय....वाण्या..वाण्या काका 

नक्किच वाण्या काका जास्तीचे ५०रु घ्यायला आले असेन आता काय करावं ,काय आईला सागावं.....

"आरं ऐकतुस नं" आई ओरडली

"आरं वाण्यानं तू दुकनावर ईसरलेले ५०रु आणुन दिलंत.....कसा ईसरला रं तू....

काय! म्ह्या ५०रुपय ईसरलो....व्होतो

अरेच्या!काय हे गौडबंगाल......म्ह्या ५०रुपय ईसरलो...मग ती शंभराची नोट ...कुणाची व्हती ....आनंद्याची व्हती की काय.म्ह्या आधी तो दुकानावर आला असेन आणि त्होच ईसरला असेन वाण्याच्या दुकानावर.अन् मी म्ह्या समजुन उचलून आणली असेन.

  हुश्श...काय गुंता झाला.

ज्याचे पैसे त्याच्याकडे गेले अन् म्ह्या बसलोय नव्या बॅट चे सपन बघत....

 मनातल्या मनात हसत सोम्या आईला बिलगला.....

 "आई गं ....भुक लागलीय.......वांढना

  


Rate this content
Log in

More marathi story from Satish Nahire