“
म्हणून सत्य किंवा परमेश्वर तुम्ही जे काही म्हणाल ते, ही प्रतिक्षणी अस्तित्वात येणारी वस्तू आहे .मन जेव्हा एखाद्या शिस्तीने विशिष्ट आकारात ठेवलेले असते तेव्हा नव्हे, तर फक्त स्वतंत्र स्वयंभू उत्स्फूर्त स्थितीतच हे शक्य होते.परमेश्वर ही मनापैकी वस्तूच नव्हे . स्वआराखडय़ातून ती येत नाही .जेव्हा केवळ सद्गुण म्हणजे स्वतंत्रता असते तेव्हा ती येते.जे काही आहे त्या वस्तुस्थितीला तोंड देणे म्हणजेच सद्गुण.
”