“
हिरवळ
तिला आवडत नाही त्याला मात्र खूप आवडतो.
नभ दाटून आले की तिच्या तावडीत सापडतो.
पावसाचं आणि तीच गणित कधी जमले नाही.
पहिल्या पावसात त्यांचं कधी भिजणं नाही.
सखे माझ्या नजरेतून बघ एकदा ,
उदास मना वरची निघून जाईल मरगळ.
डोळ्यात साठवून तर बघ ही हिरवीगार हिरवळ.
----- संगीता देवकर
”